Friday, January 16, 2009

सत्यघटना

एकदम मन हेलावून टाकणारा वगैरे अनुभव - नॉन क्रॉनोलॉजिकल क्रमाने लिहिण्यात येइल, असा टॅरॅंटिनो इफेक्ट येण्यासाठी.
--
स्थळ: आमच्या घरासमोरची जागा, वेळ: घटनेपूर्वी २४ तास, म्हणजे साधारण काल सकाळाचे ११.००

आदल्या दिवसाचा अनुभव लक्षात होता, त्यामुळे अतिकाळजीपूर्वक आणि मन एकाग्र करुन स्केटिंग स्टाईल मारण्यात आली. [ऑफिसमधे गेल्यावर काय काय काम करायचे आहे, कुठल्या टिमवर कुठला इश्यु ढकलायचा आहे असल्या विचारांनी चित्त विचलित होउ दिले नाही]
आणि एकदम व्यवस्थित स्केटिंग करत गाडीपाशी पोहोचलो. कालच्या आजीबाय आजपण होत्या पायरीवर बसलेल्या, कुत्र्याशी खेळत. त्यांनी पाहिले आणि हसल्या, मीही हसलो आणि कटलो.
पण मला एक कळत नाही स्वत: एवढे कपडे घातले असतात, कुत्र्याला का कुड्कुडवतात?
*
स्थळ: आमच्या घरासमोरची जागा, वेळ: घटनेपूर्वी ४८ तास, म्हणजे साधारण परवाचे सकाळाचे ११.००

आमचे वय विसरुन नेहमीप्रमाणे उड्या मारीत आम्ही सक्काळ सक्काळ ऑफिसला चाललो होतो. तोंडानी झूSSम असा आवाज काढत बर्फावरुन स्केटिंग टाईप करत चाललो होतो आणि आता आपटणार एवढ्यात एका झाडाने आधार दिला आणि वाचलो. [लहानपणी बाबांबरोबर जावून एक झाड लावले होते २६ जानेवारीला, केलेले प्रेम झाड कधीच विसरत नाही]
आमच्या समोरच राहाणाऱ्या आजीबाई, एकदम म्हणजे एकदमच काळाजीच्या सुरात "Be careful" म्हणाल्या. आपल्या फजितीच्या त्या एकमेव साक्षीदाराला "I will" असे म्हणून आणि सभ्य हसू देवून मी गपचूप गाडीत बसलो आणि सटकलो.
*
स्थळ: आमच्या घरासमोरची जागा, वेळ: घटनेची ऍक्चुअल वेळ , म्हणजे आज सकाळाचे ११.००

काल स्केटिंग जमल्याने हालचालीत एकप्रकारची सहजता आली होती, झूम आवाज काढत स्केटिंग करत निघालो, तोल गेला, आधाराला झाड पाहिले तर त्याने पण आपल्या फांद्या झटकल्या.[ बाबांबरोबर जावून झाड तर लावले, पाणी कोण घालणार हो रोज त्याला? आं?]. असो. शेवट आपण आता १०० टक्के पडणार आहोत हे लक्षात आल्यावर टॉमसारखा चेहरा केला आणि दाण्णदिशी आपटलो...जास्त लागले नाही.
पायरीवर बसलेल्या आजीबाई पटकन उठल्या. आता खरी घटना सुरु होत आहे -

मी उठून उभा राहिस्तोवर, त्या जवळ आल्या आणि माझी दोन्ही खांदे पकडले, टिपिकल अमेरिकन आया मुलांना ओरडायला जसे जवळून त्यांच्या डोळ्यात डोळे घालतात तसे माझ्यावर डोळे रोखले आणि लय म्हणजे लय ओरडल्या,
"तुला काय झाले असते म्हणजे, गंमत वाटते का तुला? थोडक्यात वाचलात, हातपाय मोडले असते तर कितीला पडले असते? स्केटिंगच करायचे असेल तर स्केटिंग अरीना मधे जा, ही जागा नव्हे त्याची". मी तसाही घाबरलोच होतो पण असे सगळे ओरडल्यावर एकदमच खालच्या स्वरात मी सॉरी म्हणालो तर त्या म्हणाल्या "प्रॉमिस मी, यु वोन्ट डू धिस अगेन, इव्हन इफ ऍम नॉट वॉचिंग यु". प्रॉमिस दिले आणि सटकलो बाबा.
*

आईला सांगितले तर तिला मी आपटल्याचे जेवढे वाईट वाटले तेवढाच आज्जीबाई ओरडल्याचा आनंद झाला. त्यांना माझ्यातर्फे थॅंक्यु सांग म्हणे - वर नंतर फोन करुन विचारत होती, सांगितलेस का?
कायपण बोलतात कधीकधी आया, आता काय खरंच वेगळे जावून थॅंक्यु सांगायचे का काय त्यांना.
***

7 comments:

Jaswandi said...

:D

sahich lihilay...

ganitat kahitari locha ahe ka? 36taas ki 24taas? ..mahit nahi maza ganit kachchaa ahe :P

यशोधरा said...

LOL! :D

Bhagyashree said...

lol... kaslya cute ahet ajjibai!!

Meghana Bhuskute said...

माझापण वरील पोस्टशी संबंधित नसणारा प्रतिसाद (कारण तुझा इ-पत्ता नाहीये.) -

मूळ कल्पना अभिजित बाठेची आहे. आणि तिघं नाही. चौघं. ट्युलिप, मी, संवेद आणि निमिष. आभारी आहे बरं का. :)

Yawning Dog said...

ओय जास्वंदी बरोबर आहे तुझे, खरंच की लाजच निघाले माझ्या गणिताची...
२४ आणि ४८ पाहिजे, काय म्हणून ३६, ६० लिहिले मी देव जाणे.
थांकु :)

Maithili said...

kitti sahi lihitos yaar tu, mi tar tuzi fan ch banaley.

Dk said...

तेवढाच आज्जीबाई ओरडल्याचा आनंद झाला hahaha kaay mag saangitles na aajibaaina? :D :D