Monday, January 26, 2009

कोरिअन वेव्ह

कोरिअन वेव्ह विषयी नुसतेच ऐकुन होतो. पाश्चिमात्य देश, चीन, जपान आणि इतर बऱ्यापैकी प्रगत आशियाई देशांमधे आधीच कोरियन वेव्ह धडकली आहे. वेव्ह धडकणे म्हणजे तिथली जनता बऱ्यापैकी कोरिअन संस्कृतीमधे रस दाखवत आहे, कोरिअन उत्पादने, कोरिअन सिरियल्सने लोक प्रभावित होत आहेत etc etc.
असो. जास्त विश्लेषण करण्यात काही अर्थ नाही, माझी बौध्दिक दिवाळखोरी जगजाहीर होइल. तर आता माझ्यापर्यंत ही कोरिअन वेव्ह धडकली आहे आणि मी आनंदाने तिचे स्वागत करत आहे.
टाळ्या, शिट्ट्या, फेटे, झांजा, ढोल, ताशे.

गेले २-३ आठवडे मी नुसता भारावून गेलो आहे कोरिअन सिनेमे बघुन. ‘My sassy girl’, ‘My little bride’, ‘Classic’, ‘Too beautiful to lie’, ‘Welcome to Dongmakgol’...अनेक. खूप मोठी यादी आहे .

‘My sassy girl’ची तर पारायणे सुरु केली आहेत मी. ह्या सिनेमावर माझी परीक्षा घ्या हो, कुठलाही प्रश्न विचारा - एका वाक्यात उत्तरे, सविस्तर उत्तरे, जोड्या लावा, संदर्भासहित स्पष्टीकरण, काहीही विचारा, ८० टक्क्यांच्यावर मार्क नाही मिळाले ना तर गाड्यांच्या मागे भूंकत धावणे बंद करीन.
एकतर ए टू झी(झेड वगैरे ते भारतात राहणारे लोक म्हणतात, आम्ही झी म्हणतो) सगळ्या कोरिअन पोरी निरागस वाटतात आणि सगळे हिरो एकदम सज्जन दिसतात. सॅसी गर्ल मधे तर पोरगी दारु पिउन ओकते तरी निरागस वाटते - साधरण १०-११ सिनेमे पाहिले आत्तपर्यंत पण मनात क्षणभरसुध्दा वैषयिक विचार आले नाहीत, देवाशप्पथ.
आत्ता मोजुन १७ सिनेमे डाउनलोडला लावले आहेत.

जब तक सूरज चांद रहेगा, कोरिअन सिनेमाका नाम रहेगा .
एक दोन तीन चार, कोरिअन सिनेमाचा जयजकार.
तानी नानी नानी, इय्या इय्या, कोरिअन सिनेमा इय्या इय्या.
अर्रे आवाज कुणाचा....बास आता.

***

12 comments:

Maithili said...

wonderfull blog ofcource as usual. mi pan baghin aata hya saglya KORIAN MOVIES.
Aani ho mi aata tuzya blogchi brand ambassador zali aahe
( arthat svatahoonach). mazya friend circle madhye mi tuzya blog chi tond fatestovar stuti keli aahe. aani tehi tuze fans banat aahet. yowning dog dada rocks...(shee kahitarich chhapari vatate na aikayala yownin dog DADA??)

Jaswandi said...

ह्याच कोरिअन कलाक्षेत्रामुळे आज प्रीतम सारख्या संगीतकारांना नाव आहे...

तानी नानी...जे काही आहे..कोरिअन सिनेमा...

साधक said...

Ya movies online kuthe pahayla miltil..asel tar ithe links deu shakal ka?
thanks.

Unknown said...

yea me too downloading and watching korean movies... they are cool...

@Sadhak.. u can download them with torentz...

Bhagyashree said...

are va, pahile pahijet!!

Yawning Dog said...

@मैथिली, थांकु - लय कौतुक करु नकोस ग...सवय नाही :)

@जास्वंदी, प्रीतम जब वी मेट वालाना? तो उचलेगिरी करतो हे माहित नव्हते राव - हम्म.. ज्ञानात भर

साधक, केदार, भाग्यश्री तुम्ही बघाच रे सगळे सिनेमे.
ज्यांना टोरेंट वरुन नाही घ्यायचे ते youku.com वर पाहू शकतात. तिथे जगातला कुठलापण गाजलेला सिनेमा online streaming ला मिळेल, क्वालिटी मात्र जरा okay type आहे.

Sneha said...

sahiye.. baghalach havet

Bhagyashree said...

youku.com mahit navti.. sangitlyabaddal dhanyu!!

preetam jordar uchalegiri karto.. google maar.. awaak hoshil !

Nandan said...

nehmi pramaNech zakas blog, jru. bha. rao :). Youku var jaun sassy girl pahila pahije aata.

Dk said...

ye bhi dekhna padenga btw mulgi dari piun okte??? i la kiti daru phukt ghaalvli asel :P

आल्हाद said...

Did u really like Sassy Girl?

Yawning Dog said...

ho re dumpya, tp hota to picture