Monday, March 2, 2009

डाकू मंगलसिंग

दुष्ट दिसणाऱ्या माणसांची चित्रे काढायला फार आवडते मला - हा पहा डाकू मंगलसिंग. मंगलसिंग कधी डाकूचे नाव असू शकेल का, कुणी वापरले असेल हे पहिल्यांदा?माझ्या पेन्सिलमधली लेड/लीड जे काय असते - बारकुळे शिसे ते संपल्याने पूर्ण नाही होउ शकले चित्र . खूप प्रॉब्लेम झालेत त्यामुळे - दाढी दाट नाही आली, त्याच्या चेहऱ्यावर दुष्ट्पणा पूर्ण उतरला नाहीये, बंदूक अशी बिनापट्ट्याची आहे, डायरेक्ट पाठीवर मागे लोंबकळत [ एका हाताने त्याने ती पाठीमागे धरली आहे असे समजावे] नेव्हर्दलेस्स तो पूर्ण दुष्ट डाकू आहे, त्याच्या चेहऱ्यावर जावू नका, क्रूर आहे तो - शंका नसावी.

ऍक्च्युअली मंगूला लहानपणापासूनच बंदूक अशी एका हाताने पाठीमागे धरायची सवय आहे. त्यामुळेच लोक त्याला "मंग्या रे मंग्या, एका हाताला मुंग्या" असे चिडवतात. जन्मतःच लाईट-हार्टेड व्यक्तिमत्व असल्याने मंगल ते हसण्यावारी नेतो - पण चिडवणारा डाकू/पोलिस असेल तरच हां.
एकदा एका सामान्य पण आगाव माणसाने, आगाव म्हणजे बिल्लू बार्बर मधले बिल्लूटाईप एखादे आगाव कॅरॅक्टर असते ना, अशा माणसाने त्याला चिडवले होते - तेव्हा मंग्याने त्याला ऑल्मोस्ट ठोकलाच होता, पण तो माणूस टिंगलसिंगचा बालमित्र निघाला म्हणून वाचला यडा.
***

15 comments:

Jaswandi said...

मंग्या रे मंग्या, एका हाताला मुंग्या
:D :D :D :D :D

mahaan ahes rao tu!

Maithili said...

arrey ho chitrabaddal lihayach rahilach. chitr lay bhari aahe. kala aahe tuzya hatat.....

Bhagyashree said...

hehe mast chitra !!

Sneha said...

he he he
मंग्या रे मंग्या, एका हाताला मुंग्या

bharichhh

MuktaSunit said...

अहाहाहाहा ...फारा दिवसानी ब्लॉग पाहिला. कृतकृत्य का कायसासा झालो आहे ! ;-)

Yawning Dog said...

सगळ्यांना मनापासून थांकु - माझ्याकडून आणि मंगलसिंगकडूनपण. अब मंगलसिंग उपरके पांच लोगोंके फॅमिलीमे कभी दरोडा नही टाकेगा.

me said...

best! ekadam rok thok! chyayala , ek character ch ubha kelas re! hit aahes! animation kartoys kay?

सखी said...

:D :D :D
मंगल मंगल मंगल हो :D
छान आहे पोस्ट!!!

Yawning Dog said...

धन्यवाद सखी आणि मी

Shraddha Bhowad said...

गालावरची वाटाण्याएवढी मस राहिली...त्या मसीतून बाहेर डोकावणारे केस दाखवले असते तर एकदम ब्येस!मग एकदम माझ्या स्वप्नांमध्ये येणारा मंगलसिंग उर्फ़ ’मॅन्गी’ वाटला असता...
हा कुत्रा तुम्ही काढलात असे कळले...एकदम पोलो नेक टी घातल्यासारखा वाटतोय!

Yawning Dog said...

@श्रध्दा - हा हा, मे पहिल्यांदाच आमच्या कुत्र्याकडे पाहिले आणि खरच पोलो नेक टी वाटला, असुदे आता :)
मंगलाला मस आणि त्यात २/३ केस पण दाखवायचे होते पण पेन्सिल खपली ना

Manjiri said...

आमच्या सरदारांची तसबीर अशी दिवसाढवळ्या सर्वास्नी दावुन तू लय वंगाळ काम केलयसा! कुटं फेड्शीला ही पापं!असन तुज्या धंद्याला मंदी पण
दुस-याच्या प्वाटावर पाय देचा हा कुटला न्याव?
ब-या बोलनं वडाच्या ढोलीत नजराणा ठेव नायतर अंगाला कश्या मुंग्या येतात ते बगशिला!
-XXX
जंगल मे दंगल टोळी

:) :) :)
- मस्तच!

Dhananjay said...

1 number post!

Yawning Dog said...

Thanks Dhananjay.

Thanks Manjiri.
Comment vachoon hasson hasoon purevaat zalee- vadhachya dholeet najaraana thevla ahe... :)

आल्हाद said...

बन्दूक थ्री नॉट थ्री च असावी लागते ह्या मंडळींकडे ... गणवेशात तिचाही समावेश होत असावा