दारधार
दार उघडा दार
लागलीय रक्ताची धार
केलेत सपासप वार
गळ्यात चपलांचा हार
आणि फासलय तोंडाला टार
तासभर गाढवावरच भार
आणि कुत्र्यागत मार
होतेकी आमचेपण दोस्त चार
बसलेले उबवत पार
दोघे झाले फटफटीवरुन फरार
बाकी दोघे कडेलाच गप गार
दार उघडा दार
खरंच लागलय हो फार
आता अगदी मेलो ठार
तरी नको ती नासकी धार
आणि नको बा चरसी तार
लांबनच बरी ती नटवी नार
बाप्पा, आता कायमचा बंद तो बार
दार उघडा दार
लागलीय रक्ताची धार
केलेत सपासप वार
गळ्यात चपलांचा हार
आणि फासलय तोंडाला टार
तासभर गाढवावरच भार
आणि कुत्र्यागत मार
होतेकी आमचेपण दोस्त चार
बसलेले उबवत पार
दोघे झाले फटफटीवरुन फरार
बाकी दोघे कडेलाच गप गार
दार उघडा दार
खरंच लागलय हो फार
आता अगदी मेलो ठार
तरी नको ती नासकी धार
आणि नको बा चरसी तार
लांबनच बरी ती नटवी नार
बाप्पा, आता कायमचा बंद तो बार
*
देजा वू सारखे वाटते आहे, माझीच ताजी ताजी गरम कविता आहे का मी आणि कुणाची कुठे वाचली होती पूर्वी?यमकपाऊस अलंकारात आहे ही कविता.
गस्त, फस्त, त्रस्त, ध्वस्त, मस्त, चुस्त - नको चुस्त नको
13 comments:
Evadhe divas kuthe hotas?
btw post nehmi pramanech sahi. :D
i was waiting for ur next post!!
sahiye!!
pan chusta ka nako?
सुस्त? ;)
अरे डॉगा... मस्तच रे भाऊ. खत्तरनाक, ऍज युजुअल.
चुस्त एकदम सॉलिड्डच. बाकी कविता आणि यमकपाऊस अलंकार एकदम सिद्धहस्त. ;)
’यमकपाऊस अलंकार ’ चांगला शब्दप्रयोग आहे! बाकी कविता झकास रंगली आहे... उत्सुकता ताणत जाते, वाटतं की finally दार उघडलं की नाही!
ha..ha.. sahiye.. sadhi sopi kavita pan kasa jeevanacha artha samawala aahe tyat. :-)
tumacha blog awadya apalyala!
@मैथिली आणि बिपीन - नेहमीप्रमाणेच थॅंक्स :)
@स्नेहल - थॅंक्स, चुस्त चालतोय तसा पण नको वाटला एकदम कारण उकार आला :)
@गौरी - थॅंक्स, सुस्तला चुस्तच्या गटात टाकायला लागेल ;)
@सर्किट - थॅंक्स :)
@पिलूरायटर - माझ्यापण लक्षात आले नाही,finally दार उघडलं की नाही ते :)
पण असे जाहीर कबूल करणे चांगले नव्हे म्हणून ऑफिशियल खुलासा आहे -
दार उघडते का नाही ते महत्त्वाचे नाही, ठोठावणाऱ्याच्या भावना महत्त्वाच्या आहेत ;)
'दार उघडा दार
लागलीय रक्ताची धार'
या दोन ओळी लहानपणी सांगण्यात येणारया गोष्टींपैकी एका गोष्टीमधे ऐकल्या होत्या.
पण तिथे त्या दोनच ओळी होत्या.
बाकी तुझी 'यमकपाऊस' अलंकारात सजलेली कविता छानच आहे.
tareech...mala deja vu type zale.
Goshta mahite ka?
यॉ.डॉ, नेहेमीप्रमाणे मस्तच!
हो ती गोष्ट थोडी-थोडी आठवतीये. थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते.
एका माणसाला २ बायका असतात. एक नावडती अन एक आवडती(नेहमीसारखच).
एकदा त्या दोघींच भांडण होत आणि नावडतीला घराबाहेर हाकलल जातं. ती बिचारी अंधाराला घाबरुन एका झाडाखाली बसून रहाते. तिथे झाडावर एक चोर चोरी केलेला माल घेऊन बसलेला असतो. नावडतीच्या बांगड्यांचा आवाज ऐकून तो, झाडाखाली भूत असाव या भीतीने सगळा माल तिथे टाकून पळून जातो. आणि मन हुशार नावडती तो माल घेऊन घरी जाते. तेव्हा तिथे दार ठोठावताना तीपण काहीतरी गाण म्हणते. नीटस आठवत नाही पण 'दार उघडा दार, सोन्या-चांदीचे हार' अस काहीसं.. आणि पैसे, दागिने बघून नवरा तिच्यावर खूष होतो. नावडतीकडून सगळी हकीकत कळल्यावर आवडतीच्या डोक्यातही एक कल्पना येते. दूसरया दिवशी ती स्वतः घरातून बाहेर पडते, त्याच झाडाखाली जाऊन बसते. नेमका तो चोर आपला कालचा माल शोधण्यासाठी तिथे आलेला असतो. त्याला संशय येतो की त्या आवडतीनेच आपल्याला काल भीती दाखवून आपला माल पळवून नेला असावा. तो रागाने तिचे नाक कापतो. मग ती रडत रडत घरी जाते. तेव्हा दार ठोठावताना ती म्हणते, 'दार उघडा दार, नाकाला लागली रक्ताची धार'.
अच्छी ब्लॉग हे / मराठी और हिन्दी मे टाइप करने केलिए आप कौनसी टाइपिंग टूल यूज़ करते हे...? रीसेंट्ली मैने यूज़र फ्रेंड्ली इंडियन लॅंग्वेज टाइपिंग टूल केलिए सर्च कर रहा तो मूज़े मिला " क्विलपॅड " / आप भि "क्विलपॅड" www.quillpad.in का इस्तीमाल करते हे क्या..?
'दार उघडा दार, नाकाला लागली रक्ताची धार'.
gosht athvali mala pan :)
pan post lay bhari!
ani kuthe gayab hotas re Shawn?
Post a Comment