निरर्थक -३, दिवसेंदिवस निरर्थकचे शेपूट वाढतच आहे.
*
देव आणि आठवणी या दोन विषयांवर बरीच पोस्टस वाचली मी मधे. लगेच आपला शहाणपणा दाखवायला मला "भूत आणि भविष्य" अशा सामाईक विरुद्ध विषयावर पोस्ट लिहावेसे वाटले.
पण भूत शब्दाचा अर्थ स्केअरी घोस्ट असा न घेता भूतकाळ असा किंवा भूतदया मधला भूत असापण घेतला जाउ शकतो. मग माझे टायटल ‘पूर्ण’ विरुद्धार्थी होणार नाही. भूत शब्द मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर की शिकार है.
"दानव आणि भविष्य" पण नको कारण दानव हेच बऱ्याच लोकांना देव वाटतात.
सगळा गोमकाला झाला, मेंदूमधे अशी धड्डाधड्ड validation exceptions येत गेली आणि अल्गोरिदमच गंडले फुल्ल मग असला काही आचरटपणा करण्याचा विचार मी सोडून दिला.
*
तर एकुण मला आठवणीच कमी असल्याने असे उलटे काहीतरी लिहायची इच्छा झाली असा मी निष्कर्ष काढला. तशा मोठमोठ्ठ्या आठवणी चिक्कार असतात प्रत्येकाला. पण सूक्ष्म म्हणावे असे काहीतरी आठवले पाहिजे. पूर्वी कसे आवडते शब्द लिहीले होते तसे बाकी पण सटरफटर काय काय आवडते ते लिहायला पाहिजे. भविष्यात सूक्ष्म आठवणी कमी पडू नयेत म्हणून आत्ताच पाउले उचलणे गरजेचे आहे. भविष्यासाठी तजवीज करणे मला फार आवडते. मी नोकरी करतो.
*
आवडती आडनावे
देवधर, पाटील, ढसाळ, ठाकरे, स्मिथ, पेज, पटाटा, ज्ञानसागर.
आवडती नावे
एप्रिल, समर(युध्द, वॉर, तबाही नव्हे - उन्हाळा), टँजरीन, केतकी, शंकर, अण्णा, काका, बापू, मन्या.
[अण्णा, काका, बापू ही नावे नाहीत सर्व/विशेष नामे आहेत असा गैरसमज होण्याची दाट शक्यता आहे - ही सगळी नावं पण असतात प्रगतिपुस्तकात. अण्णा का आण्णा ? ]
आवडते चौक
जुना संगम ब्रिज आणि आरटीओ रस्ता, नळस्टॉप, बिनखांबी गणेश मंदिराचा चौक, विंडसर आणि नीलचा चौक, मंडईतल्या दत्तमंदिराचा चौक - हा तर जीवनाचे कटू सत्य वगैरे सांगणारा चौक आहे, देव आहे, भाजी आहे, मिठाई आहे, ...
आवडते रस्ते
सिंहगड रस्ता, वाडिया कॉलेजच्या इथून ब्ल्यू डायमंडकडे जायचा रस्ता, ओंकारेश्वराचा पूल - हापण डेडली आहे, इकडे कार्यालय तिकडे स्मशान - लढा !
आवडत्या ओळी:
As we wind on down the road, our shadows taller than our soul
(Stairway to heaven)
बोर झाल्या सूक्ष्म आठवणी.
देव राहिलेच की यार. माईल्ड धार्मिक लोकांवर फार अन्याय होतो या जगात. माईल्ड सायन्सवाल्यांवरपण होतो. माईल्डपणावरच अन्याय होतो इन जनरल.
**

सौम्यस्मरणी
निबीड चकवणी
वेताळी आडवळणी,
वाट गारठवणी,
खर्ज घुबडगाणी
भूतांच्या आठवणी
काळजाची ठारचाळणी
रुधिराची साखळवणी
पापाची धमकावणी
पुण्याची चाचपणी
देवांची आळवणी
आर्त विनवणी
राउळाची ओळखणी
ज्योतीची तेजळणी
घंटेची किणकिणी
शक्तिची उजळणी
धाकधुक थांबवणी
मनाची शांतवणी
सौम्यस्मरणी
निबीड चकवणी
वेताळी आडवळणी,
वाट गारठवणी,
खर्ज घुबडगाणी
भूतांच्या आठवणी
काळजाची ठारचाळणी
रुधिराची साखळवणी
पापाची धमकावणी
पुण्याची चाचपणी
देवांची आळवणी
आर्त विनवणी
राउळाची ओळखणी
ज्योतीची तेजळणी
घंटेची किणकिणी
शक्तिची उजळणी
धाकधुक थांबवणी
मनाची शांतवणी
सौम्यस्मरणी
अरेरेरे, सरस्वतीदेवी कधी भेटली तर दोन कानसुलात देईल मला आणि म्हणेल - "शब्दांची नासवणी, काय ही फळकवणी".
असो. मीपण माईल्ड धार्मिक आहे, अंधाऱ्या निर्मनुष्य रस्त्याने मी एकटा चाललो असलो तर येडं लागते मला, मग मी एकदम मनापासून धार्मिक वागतो - पुढचे २-४ दिवस शिव्या देत नाही.
**
देवधर्म ज्यांना आठवला ते -
संवेद, मेघना (ह्या बिचाऱ्यांनी धर्मावर लिहिले आहे पण चालतयं की वो)
आठवणींवर लिहिणारी देवमाणसे -
भाग्यश्री, राज, अनिकेत
***
10 comments:
LOL LOL LOL !!!!
ani devmanase ?? baapre ! mi apla dev-mase vachla ! tech thik ahe, demanse peksha! :D
sarswati uwach ekdam khaas...
माईल्डपणावरच अन्याय होतो इन जनरल.
ha mild cha fund apan afaat. :D
धड्डाधड्ड validation exceptions येत गेली आणि अल्गोरिदमच गंडले फुल्ल..solid punch. I can understand your feelings. Eka programmer chi wyatha ek programmerch samju shakto
aani last but not the least
भविष्यासाठी तजवीज करणे मला फार आवडते. मी नोकरी करतो :P LOL...
कविता ही देखणी
जय हो डॉगवाणी
असेना का सौम्यस्मरणी
कणखर ही शब्दवाणी
सुचते कसे हे आडवळणी???
देवाची करणी आणि नारळात पाणी
भाग्यश्रीशी सहमत. मी देवमाणूस तर सुनील शेट्टी अभिनेता आहे. :))
वाडिया-ब्लू डायमंड हा रोड ११वी ते बी.एसस्सी असा पाच वर्षे (सायकलीवरून) तुडवल्यामुळे चांगलाच लक्षात आहे.
btw stairway to heaven chi aaThavan karun dilyabaddal thanks. aattach aikale.
ha..ha.. sahee re.
mi suddha mild dharmik. tyamuLe ti 2 posts vachun gapp basayala zala hota. tu mild-panavar honarya anyayala vacha fodalis. ;-p
"भूत शब्द मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर की शिकार है"
हे फारच भारी! खरंतर भूत हा शब्द फारच deep आहे! त्याविषयी चांगलं भाष्य केले आहेस!
बाकी पोस्टही मस्तच!
@भाग्यश्री, राज -
थॅंक्स
एकबारी अपने गिरेबान मे झांक के देखो, फिर पता चलेगा लोक तुमको देवमाणसे क्यों बुलाते है :)
@सोनल -
थॅंक्स. बऱ्याच दिवसांनी उगवलीस तू :)
@स्नेहल -
भारी आहे तुझी शीघ्रकविता :D
स्पेशल थॅंक्स ! माझे नाव कवितेत :)
@सर्किट -
थॅंक्स. हा हा, सर्व माईल्ड धार्मिक लोकांनी आवाज उठवलाच पाहिजे :)
@निवेदिता
थॅंक्स :)
सूक्ष्म आठवणी तजेलदार आहेत एकदम ... आणि कविता(णि) पण उत्तम :-)
तसा कोथरुड डेपोचा चौक ही काही वाईट नाही..तीन ही बाजूंनी बसेस आल्यावर मोठा विहंगम दृश्य दिसत ..
आणि डेडली च म्हणशील तर आमच्या हपिसा इतका कुठलाच नाही ...
एक बाजूला मेंटल हॉस्पिटल ... दूसरी कड़े सेंट्रल जेल आणि तीसर्या बाजुस हिन्दू स्मशान भूमी ...
:)
Post a Comment