Wednesday, June 3, 2009

...

धो धो पाउस पडतोय. पाउस पडला की पब्लिक रोमॅंटिक होतं. सगळेजण म्हणतात भजी आणि चहा पाहिजे. लोक म्हणतात चांगली गाणी लावा. मग गाणी लावली की पब्लिक पाउस आहे म्हणून शांत गाणी लावा म्हणते. शांत गाणी बरेचदा उदास असतात. गझल फिजल. गझली हा प्रकारच उध्वस्त. संस्कृतात सगळीकडे सज्जन, दुर्जन , चंदन, गुलाब तर उर्दूत सगळ्यांचे प्रेमभंग आणि दारु. पावसात, चिकचिकीत कुठे जायचा कंटाळा येतो म्हणून नखरे सुचतात असले.
प्रेम, देशभक्ती आणि थेअरी ऑफ रेलेटिव्हिटी हे पूर्णपणे कळाले आहेत का कुणाला? मागचे लिहिले तेवढे सेंटी वाक्य मी लिहीले आहे याच्यावर विश्वासच बसत नाहिये. प्रेम म्हणजे किल-बिल मधले बिल आणि बेट्रिक्सचे प्रेम, तेच खरे. देशभक्ती म्हणजे, मागच्याच्या मागच्या वाक्यात देशभक्ती शब्द टाकायलाच नको होता, उदाहरण आठवत नाही लगेच.

लाईफमधे फंडे क्लिअर असणे फार महत्वाचे आहे. फंडे योग्य असोत किंवा अयोग्य, ते क्लिअर असणे महत्वाचे आहे. आपण बरोबर आहोत का चूक ते माहित असणेपण महत्वाचे आहे. बिलचे फंडे क्लिअर आहेत एकदम. तो म्हणतो - "बॅट्मॅन हा मूळात ब्रुस वेन आहे, स्पायडरमॅन हा मूळात पीटर पार्कर आहे. पार्कर, वेन यांना वेश चढवून स्पायडरमॅन, बॅटमॅन बनायला लागते. पण सुपरमॅन हा मूळातच सुपरमॅन आहे, त्याला वेश बदलून क्लॉर्क केंट बनायला लागते. हा महत्वाचा फरक आहे. तशी तू मूळातच नैसर्गिक असॅसीन आहेस..." आपल्या छोट्याश्या पोरीलापण मृत्यू समजावून ठेवला आहे बिलने. तडफडणारा मासा दाखवून.
कंपनीमधे मलिक म्हणतो, "मैं चंदू नही हूं", श्रीनिवासन नंतर म्हणतो, "मैं भी चंदू नही हूं".
हे सगळे असंबध्द आहे पण फंडे असे क्लिअर पाहिजेत माणसाचे.

मातीचा वास वगैरेपण येतो पाउस पडल्यावर. त्याचा परफ्यूम काढायला पाहिजे, लय पैसा मिळेल. पाउस पडतोय बेक्कार, एक जोडी गाडीवरून जाताना दाखवायची - टेबल लॅंडटाईप कुठेतरी. स्म्म्म्म करुन श्वास घेवून, मातीचा वास मला आवडतो म्हणणार हिरॉईन. मग हीरो आयलव्हयू म्हणणार, समोर लगेच आपला परफ्यूम. मुलगी, जिंगल आणि परफ्यूमचा आकार योग्य असेल तर चालेल परफ्यूम. असेलच असा एखादा परफ्यूम बाजारात.

पाणी बिळात भरते पावसाळ्यात म्हणून साप बाहेर येउन फिरत बसायचे चिपळूणला. इतकी वर्ष पाउस पडतोय, इतकी वर्षे बिळे बनतायत, सापांनी काहीतरी विचार केला असेल का? का अजुनपण चारपाच साप बुडुन मरतात?

पुस्तकांचा वासपण आवडतो लोकांना. नवीन पुस्तकांचा चांगला येतो. किंडल ई बूक रिडर घेतला तर तो वास येणार नाही. किंडलच्या प्लॅस्टिकचा वास आवडेल की नंतर. रेनकोट आणि छत्र्या पण येतात लगेच. काय अर्थ आहे वर्षानुवर्षे छत्र्या, रेनकोट वापरण्याला?
स्व-रुप पहा विश्वरुप नको, असा एक धडा होता विनोबांचा. त्यात एक राजपुत्र आणि राजा उन्हातून जात असतात. राजपुत्र म्हणतो चटके बसत आहेत पायाला, चामडे अंथरुया सगळ्या राज्यात जमिनीवर. राजा म्हणतो वेड्या त्यापेक्षा तु तुझ्या पायात चपला घाल. स्व-रुप पहा.
राजपुत्र जे म्हणाला तेच जर एडिसन, आईनस्टाईन किंवा गांधीजी म्हणाले असते तर.
त्याच धड्यात होते का हे?

पावसाळ्यात सर्दी होते लगेच लोकांना. सर्दीचे एक आहे, कुठल्याही ऋतुमधे पन्नास टक्के लोकांना गाठतेच ती. इतके वर्षे सर्दी होत आहे माणसाला. कुत्रीपण शिंकतात कधी कधी. इतकी प्रगती झाली, एक साधी गोळी नसावी की जी घेतल्या घेतल्या घसा खवखवायचा बंद होईल, सर्दी जाईल पाचेक मिनीटांत. काहीपण घ्या ३-४ दिवस असतेच.

पाउस बरा असतो, पिकांना पाणी , पोरांना होड्या etc. पावसाला लाच द्या. बेईमानी का धंदापण ईमानदारीत नाही. पैसा झाला खोटा !
*

हे लिहायची काही गरज नव्हती खरे तर. नाव योग्य आहे ब्लॉगचे.
***

20 comments:

Anonymous said...

मजेदार :-)

Monsieur K said...

ashakya lihila aahes!! :))

Vibhavari said...

majeshir ahe, extempo lihilya sarkha :)

Anonymous said...

आम्हाला मेडिटेशनच्या कॅम्प मध्ये एक प्रकार शिकवला होता. That was something of this sort, "You should not stop on any perticular thought keep changing thoughts at regular interval.". तसंच काहीसं वाटलं हे वाचताना. Nice thing is, you have capacity to write them.

सर्किट said...

height aahe tuzi height!!

post chya title madhe te paNyache 3 themb (...) pahun lagech lakshat aalach hota ki he post pavasabaddal lihilela asaNaar mhaNun. :-p

kuchh zyada bol diya kya?

Snehal Nagori said...

काय टाकावी कमेन्ट या तुझ्या पोस्टवर??
खरं तर टाकली नाही तरी हरकत नाही कारण असं काही ठोस सुचत नाहीये...

काहिपण आहे हे!!
मला मजा आली पण वाचायला....
तू वेडा आहेस यात काहीच शंका नाही...


मला पण आवडतो पाऊस....
खूप....
पुर्वी त्याची मी वाट बघायचे ...पण हल्ली नाही होत ...
जाउनदे... मी पण काहीपण लिहिलं आहे...

Unknown said...

hilarious!
sapanbaddal chi kalji jaam avdli! tu sudharega nahi! :D

saglach post avdla.. bharpur hasle!:D

matichya vasache perfume kadh ch tu! mi pahilyanda vikat ghenar! :)

अनामिक said...

भारी आहेस बाबा... अशी बडबड्पण करता आली पाहिजे... आवडले तुझे पावसाचे थेंब...!!!

-अनामिक

Yawning Dog said...

@Aniket, Monsieur K, Vibha, Pilluwriter, Anamik:
धन्यवाद, माझी वैतागवाडी आवडेल कुणाला असे वाटले नव्हते :)

@सर्किट: कुछ ज्यादा नही बोल दिया.
बोलले तरी काय थोडेसे आणि :)

@स्नेहल: धन्यवाद :)
फार भारी आहे कमेंट तुझी, तू वेडा आहेस यात
"मला पण आवडतो पाऊस....खूप....
पुर्वी त्याची मी वाट बघायचे ...पण हल्ली नाही होत ..."
हे खूप डीप आहे, फिलॉसॉफिकल !


@भाग्यश्री: परफ्युमची पहिली बाटली डिस्काउंटमधे मिळेल, तोच पुरवून वापरायला लागेल. नंतर खूप म्हणजे खूपच महाग असेल हां(सेलिब्रीटीच घेउ शकतील फक्त एवढा) :)

Anamika Joshi said...

प्रेम, थिअरी ऑफ़ रिलेटिव्हिटी सोबत देशभक्ती ऐवजी देवाचं अस्तित्त्व हा तिसरा आयटम पाहिजेल होता. उदाहरण म्हणून संवेद, मेघना आणि टॅंजंट वर कोहम च्या पोस्ट्स च्या लिंक्स देता आल्या असत्या. त्या ही बाबतीत आपापले फ़ण्डे योग्य/अयोग्य कसेही असले तरी क्लिअर असणे महत्त्वाचे आहे - म्हणजे मग असे ब्लॉग वाचून पुन्हा पुन्हा बुचकळ्यात पडायला होणार नाही!

Snehal Nagori said...

डीप, फ़िलॉसॉफ़िकल वगैरे मला माहित नाही.... आयुष्यात मेजर पकायला झालं तरच असं काहीतरी लिहावसं वाटतं आणि जमतं पण... तुझ ब्लॉग वाचला तेव्हा मला असंच वाटलं. आणि मी कमेन्ट टाकली तेव्हा पण मी अशीच जाम पकले होते...

MuktaSunit said...

शेवटी प्रवास होडी सोडण्यापासून , चिखलात खेळण्यापासून "आषाढस्य प्रथम दिवसे " आणि "किती चातक चोचीने पिऊ वर्षाऋतु तरी ! " मधे जातो. आणि मग क्रमाक्रमाने , "टिप टिप बरसा पानी" सारख्या गोष्टींमधे डी-जनरेट होत होत "यंदा नवी छत्री घेतली पाहिजे , बगुनाना !" येथपर्यंत होत जातो. नॉस्टाल्जिया इज ओव्हररेटेड मॅन.

आल्हाद said...

खो खो ...
फंडे क्लीअर असण महत्वाचं
एकच लेखात किति फ़न्दे क्लिअर झालेत ...
गज़ल फ़ज़ूल आहे ... संस्कृतात सदैव चांगल्या-वाइटची तुलना.. असंबद्ध कम्पनी , किल-बिल ..etc etc
आपल्याला थेओरी ओफ़ रिलेटिविटी कळत नाही याचं फारसं वाईट वाटलं नाही पण प्रेमातलही कहिच कळत नसेल हे वाचून दू:ख झाल ... माझ्या उरल्या सुरल्या वाटाही बंद झाल्यातच जमा आहेत. :( *

खतरनाक लिहिलय गड्या ..एवढ्याश्या ब्लॉगमधे एक-दोन बिजिनेस आयडियास .. सापांची अक्कल काढणे .. प्रिंट मिडिया जिवंत राहण्याच आणखी एक कारण कळलं :-)

* कमेंट पण बाष्कळ्च झाली आहे बहुदा ..
काय फरक पडतोय म्हणा !!

मी बिपिन. said...

मस्तच... ब्लॉगच्या नावाला जागलास... यु वॉक्ड युवर टॉक. व्हेरी गुड.

a Sane man said...

मज्जाच मज्जा...

स्वरूप पहा मध्ये एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय करून स्वतः शस्त्रधारी झालेला परशुराम होता..स्व-रूप पहा! बाकी पब्लिक पण होतं काय? आठवत नाही.

Yawning Dog said...

अनामिका:
थॅंक्स :)

मुक्तसुनीत, आल्हाद, बिका:
माझा बाष्कळपणा दिवसेंदिवस वाढतो आहे तरी तुम्ही चांगले म्हणता !
थॅंक्स एनीवेज :)

सेन मॅन:
तोच धडा तो,मला तो धडा आजिबात आवडायचा नाही :D

स्नेहल:
फिलॉसॉफिकल म्हणले की बरे असते, जरा संभ्रम राहतो :)

Snehal Nagori said...

hummm barobar ahe:)

Changdeo Patil said...

Too much weed!!

Dk said...

saayba sahii lihilys aata ek karu ha sugandh baatlyaat bhrun vikuya plant mi taakto mktg. tu karaaych! :P

Anonymous said...

Mast ch lihilay...
:D