आज अशक्य, प्रमाणाबाहेर निरर्थक.
सवय लागली आहे आजकाल निरर्थकतेची. म्हणजे निरर्थक लिहायची, डोक्यात चक्रे तर कायम अशीच फिरतात. हात दुखेपर्यंत लिहीणार आज - महाभयानक असंबध्द, दुर्बोध झाले तरी हरकत नाही.
टॅगमधे लिहावे सगळे. प्रत्येकानेच टॅगमधे लिहावे खरे तर.
<सुरुवात> <!- जून निरर्थक आणि असंबध्द वैचारीक महिना आहे-->
<नो-नेम>
किती वर्षे, नाम, क्रियापद, विशेषण, कर्मणी, कर्तरी प्रयोग? मेज्जर रिफॉर्मची गरज आहे भाषेला. पुढे मागे मशिन्सनी टेक-ओव्हर केले तर त्यांना टॅग्जमधले वाचायला सोप्पे जाईल हे. मशिन्स खूश होतील, शक्यतो जेत्यांच्या बाजुला असावे आपण. मशिन्स हरली तर नुकसान काहीच नाही.
ढगाळ हवा कारणीभूत आहे असले काहीतरी विचार मनात यायला. मागच्या वेळी पाउस होता, आता ढगाळ हवा, मग कोवळे ऊन कारणीभूत आहे म्हणाल, मग कडक ऊन - आपला मेंदू कारणीभूत आहे शेवट. नाहीतर, जास्त काम केले की असे होत असावे.
काम एक भारीच. पूर्वी चांगले होते, कधी कुणाचा जॉब जाउ नये असे वाटायचे. वामनराव पैमहाराज जसे म्हणतात, सर्वांचे चांगले होउदे, तसे वाटायचे. आता जाता येता, कुणी दिसला तर, हा बरा आहे-हा राहुदे, हा बेक्कार आहे - ह्याला फायर करायला पाहिजे असे वाटते. सॉरी.
</नो-नेम>
<ऑफिसमधे घडलेला प्रसंग>
खोलीत ३ जणं होतो. मी ‘अ’ टीमचा, बाकी दोघे‘ब’वाले. मी निवांत, आमचे सगळे नीट चालायला लागले होते.
ब टीममधला एकजण दुसऱ्याला म्हणाला - "I can see 2 million pending transatcions in the queue".
दुसरा म्हणाला, "Wait...how can it be, I've got 1.5 million pending"
दोघांकडे बघून मी कुत्सितपणे म्हणालो, "So, whose problem is it, yours or yours?"
एकजण काय बोललाच नाही. दुसरा निरागस, तो म्हणाला, "It's our problem, dude"
मीपण काय म्हणालो नाही मग. सगळे मनातच बोललो नंतर - "That's the problem with english".
हा मनुष्य मला म्हणाला, इट्स ‘अवर’ प्रॉब्लेम. अवर शब्द चूक आहे इथे.
टेक्निकली अवरमधे मीपण येतो कारण मीपण आहे या खोलीत. आणि ह्यांची पेंडिंग ट्रॅन्जॅक्शन्स ही काही माझी समस्या नाही - तुम्ही बसा बोंबलत, आयॅम कूल.
हिंदीमधे तो म्हणाला असता, "ये हमारा प्रॉब्लेम है" - इंग्लिशसारखेच
मराठीत तो काय म्हणाला असता, - मित्रा(सारकॅस्टिक) हा ‘आमचा’ प्रॉब्लेम आहे.
‘आम्ही’ आणि ‘आपण’ मधे फरक आहे. नेटवर शोधायला पाहिजे याला काय म्हणतात. मिळाले
</ऑफिसमधे घडलेला प्रसंग>
<नो-नेम>
Long tireless quest is the very essence of any classical Mahakavya. महाकाव्याऐवजी ईपिक म्हणायला पाहिजे होते. असो. हिरोचा वर्षानुवर्षाचा विविधतेने नटलेला प्रवास असल्याशिवाय महाकाव्य होउच शकत नाही. मग प्रवास सुफळ असो वा निष्फळ असो. अनेक उदाहरणे आहेत यावेळेला.
राम, पांडवांचा प्रवास. सुमेरियन महाकाव्यामधे, ग्लिग्मेश आणि एंकिदुचा प्रवास. होमरचा युलीसीस तर भटकतच राहीला लेकाचा. फिनीश कालेवला वैनामेननच्या सफरीने भरलेले आहे. म्हणजे साधरणपणे एकच सूत्र असते. सगळे चांगले चालू असते, घराबाहेर पडायला लागते काहीतरी चांगल्यावाईट कारणाने. मग अथक प्रवास, कोण कोण लोक भेटतात. चित्रविचित्र प्राणी-पक्षी. राक्षस मारा, नद्या दुभंगा, वेश पालटून रहा, पोरी मागणी घालतात त्यांना नाकारा. वैनामेननसारखे कधी स्वत:च पोरीला मागणी घाला. मित्र मरतात, ग्लिग्मेशसारखा दिवसेंदिवस शोक करत बसा. मासे मारा. असे करत करत शेवट मग मोठ्ठे युध्द होते.
आणि आयुष्याचा प्रवास वगैरे काही रुपक नाही चालणार - ऍक्च्युअल फिजीकल प्रवास पाहिजे, तरच सारखे काहीतरी होत राहते.
आपल्यासारखे नसते राव ह्या महाकाव्यातल्या नायकांचे. मला पुणे-कराड-तासगाव प्रवासात प्रश्न पडणार, वाटेत अतीत येते का? तेथे एस्टी थांबली तर चहा टाकावा का कोल्ड्रींक, बास संपले.
मधेच खंबाटकी घाटात दहा तोंडांच्या अजगराने विळखा घातला आहे. तिथे गाडी थांबते. कंडक्टर म्हणतो, ज्याच्याकडे LG चा फोन आहे आणि ज्याने शिरवळला पाव किलो अंजीरे विकत घेतली तोच या अजगराची खांडोळी करु शकेल. मग आपल्या अंजिराच्या पिशवीकडे जनता बघणार. ठीक आहे, असे म्हणत उठायचे मग गाडीतून उतरुन अजगर बघुन ह्याचे दहातले एकतरी तोंड कुठे आहे हे शोधताना, एक जख्खड म्हातारा येणार आणि हातात एक तंबाखुची चंची देणार जी पुढे कुठतरी क्लायमॅक्सला उपयोगी पडेल.
हे असले व्हायला पाहिजे काहीतरी.
पण असले काही होत नसते म्हणूनच वाचायला बरे वाटते. असो ज्यांना ज्यांना महाकाव्य किंवा दर्जेदार फिक्शन लिहायचे आहे त्यांनी हे पुढचे लक्षात ठेवावे.
Long tireless quest, that's the crux - हर्क्युलीस, फ्रोडो, पांडव, अहब कुणाचीच प्रवासातून सुटका नाही झाली. कालपरवाचा तो अल्केमिस्टवाला सँटिगोपण फिरत होता येड्यागत - महानायकाने प्रवास हा केलाच पाहिजे.
</नो-नेम>
<वरच्या टॅगविषयी>
हा वरचा टॅग शो-ऑफ करणारा होता. वाचणाऱ्याला वाटायचे लिहीणाऱ्याने सगळे वाचले आहे खरंच एवढे काय काय.
.<अचानक रुममेटशी झालेला संवाद>
सुन, तेरे आँखोके सामने कभी अचानक हवामें धुंदलीसी आकृती बनती है कभी?
लहानपणी व्हायचे असे कधी कधी मला. कधीपासून दिसायला लागल्या तुला डोळ्यासमोर आकृत्या?
अभी, गॅलरीमें खडा था तभी हुआ.
काय करत होतास?
कुछ नही, सिगरेट पी रह था यार.
गेट आउट
.</अचानक रुममेटशी झालेला संवाद>
हां तर, हा वरचा महाकाव्यवाला टॅग शो-ऑफ करणारा होता, पण कुठल्याही विषयावर एक पान लिहायला, त्या विषयाचे चार ओळी वाचन पुरेसे असते.
महाकाव्याविषयी खरे आहे वरच्या टॅगमधले बरेचसे. पुरेसे पुरावे दिले आहेत.
</वरच्या टॅगविषयी>
<रुममेटशी झालेला संवाद_परत>
यार, ‘तुमसा कोई प्यारा, कोई मासूम नही है’ ये गाना किस मूव्ही का है?
शोधायला पाहिजे, करिश्मा आहे त्यात एवढे आठवते.
ढूंढ ना यार, मेरे मशिनपे पंगा है.
ह्म्म.
हा बघ व्हिडीओ, खुद्दार पिक्चर - अजून बरीच गाणी आहेत तिची इथे.
कुछ भी बोल साला, करिश्माने राज कपूरपे रिव्हेंज लिया है ना पूरा? This is poetic justice.
शंभर टक्के !
</रुममेटशी झालेला संवाद_परत>
<आयुष्य_जीवन>
अजून काहीतरी लिहीणार होतो, पण अचानक रुममेटने एन्ट्र्या मारल्या आणि विसरलो आता. म्हणून शेवटच करतो.
एकुण जीवन असे असंबध्द आणि नॉर्मल आहे. महाकाव्यातल्या नायकांप्रमाणे काही महत्वाच्या टास्कस नाहीयेत. खरेतर, महानायक लहानपणापासूनच महानायक होणार हे कळते. लहानपणीच ते राक्षसांना मारतात, न्यायनिवाडा करतात etc etc. आजुबाजुच्या गुरुजनांना व वडिलधाऱ्यांना माहित असते की हे प्रकरण भारी आहे. नाव काढणार.
मी लहान असताना गुरुजन कन्फ्यूज होते. एक सर बाबांना बँकेत भेटले, ते म्हणाले ह्याला सायन्सला घाला पुढे, गणित बरे आहे याचे. भुगोलाच्या एक बाई आईला मंडईत भेटल्या, त्या म्हणाल्या, ह्याला डॉक्टर बिक्टर नका करु हो, झेपायचे नाही. घरमालक आजोबा म्हणायचे, काय कळत नाही मला याचे. म्हणजे I was never destined to be a mahanayak.
त्यामुळे सारांश काय? आणि आयुष्य_जीवन टॅग सुरु केल्याचे कारण काय? तर, एकदा कळाले माणसाला की आपल्याच्याने काही भारी होणार नाहीये की ते नीट लक्षात ठेवावे. मग कशाचेच वैषम्य वाटत नाही. आणि जीवन सुखी होते. झेपेल ते, हळू हळू करत रहायचे मग.
</आयुष्य_जीवन>
</सुरुवात> <!-- इथे गोची आहे, <शेवट> असे पण चालेल >
***

19 comments:
जबरी! तुझी मधली बर्रीच पोस्ट वाचायची राहून गेली होती आणि आता आज समोर तुझा ब्लॉग उघडून बसलेय,तुझी इतकी अफ़लातून पोस्ट्स समोर दिसताहेत ती सोडून ऑफ़िसात जायची तयारी,अंघोळी बिंघोळी असल्या फ़ालतू गोष्टी, सोमवार सकाळचे बाय डीफ़ॉल्ट भयंकर वातावरण वगैरे उदास गोष्टी जर मला दिसल्या तर माझ्यासारखी बोर मुलगी मी च. तेव्हा तसं नाय होऊ देणार : ))).
परत एक्दा: ज-ब-र-द-स्त डोकं चालतं तुझं. लिखते रहो.
my god...kaay kaay suchat tula..show off tag tar ekdam bhari.
Saaransh tar ekdam philosophical...
kal paryant mi table fan hote tuzi aaj ceiling fan jhaliye..
शेवटचा टॅग एकदम philosophical!..मला वाटतं अगदी खंबाटकी घाटात अजगराचा विळखा पडत नसला तरी बर्याच भलत्या टाईपच्या घटना घडतात कधीकधी आजुबाजूला. आणि थोडं me too philosophical बोलायचं झालं तर, आयुष्यात रॅंडम गोष्टी घडण्यासाठी बरीच सोय दिसते, thankfully सगळंच defined नाहीये. त्यामुळे आपल्यालाही महानायकगिरी करायला थोडी statistical gap आहे असं गृहित धरायला काय हरकत आहे?
बाकी निरर्थक पार्ट मस्त as usual :)
-Nivedita
भयंकर लिहिलयस !!
महानायका बद्दलचे विचार पटण्याजोगे आहेत ...
लहानपणी क्रिकेट ची ब्याट घेउन जर फोटो काढला नाही तर सचिन तेंडुलकर होणं जमायच नाही
LG चा फोन .. शिरवळचे अंजीर .. तंबाखूची चंची ..सगळच भीषण क्रिएटीव :)
तू वेडा आहेस का रे? नाही तर मग एकदम महानच. दोन्हीपैकी एक काहीतरी नक्की. मधलं अधलं नाहीच.
केवळ अशक्य आहेस... लिखते रहो... हम वाचने को बैठेलेच हय!!
Tu jaraa lahan pani blog kadhala asataat aani mi jar to jara aadhi paahila asata tar me tu mahanayak honaar he sangun takala asata tula! ;)
mazi comment alich nahi kal?? :(
aso.. natamastak.. sashtang namaskar.. sarva puraskar bahaal ityadi ityadi.. :)
अरे...
पाव किलो अंजीर आणि तंबाखुची चंची काय....
अल्टिमेट...
तोसि ग्रेट हो सरजी.....
:-)))
ashakya ahes, mahaan ahes, gurudev ahes, veda ahes, asa darveles tuzya blog var yeun lihun lihun te shabd puchaaT zalet.
ata tuch navin kahitari creative suchav amhi tuzya post cha koutuk karayala.
gr88888
@ट्युलिप
भारीच, सगळी कामे टाकून पोस्टस वाचलीस तू [परत अशी चूक करु नकोस]
धन्यवाद :)
@सोनल
ही ही ही, सीलींग फॅन :D थँक्स
@निवेदिता
"आपल्यालाही महानायकगिरी करायला थोडी statistical gap आहे असं गृहित धरायला काय हरकत आहे?"
ह्म्म, मान्य आहे. पण आपलीपण अशी एखादी दंतकथा सांगितली जावी पुढेमागे एवढीच छोटेशी इच्छा आहे माझी :)
@आल्हाद
थँक्स :)
@बिका
महान बिहान नाही हो मी [वेडा आहे म्हणवत नाही :)]
@अनामिक
थँक्स
@नावात काय आहे
हा हा हा, लहानपणी गृहपाठ लिहिण्यातच खूप वेळ गेला, ब्लॉग लिहायला वेळ नाही मिळाला :)
@भाग्यश्री
थँक्यु सर्व पुरस्कारांसाठी :)
@स्नेहल
थँक्युजी, असि ग्रेट शेट कुछ नस्सी [गंडले आहे बहुतेक हे]
@सर्किट
थँक्यु :)
काय सुचवू, येडपट म्हणालात तर चालेल :)
"पण कुठल्याही विषयावर एक पान लिहायला, त्या विषयाचे चार ओळी वाचन पुरेसे असते."
पण ते चार ओळी वाचणे, आणि त्या लक्षात राहणे आणि एकमेंकाशी लिन्क करता येणेही तितकेच महत्वाचे आहे!!!
You can do that.That's great!
टॅगची कल्पना एकदम भारी.... आपल्याला जाम आवडली.
"शक्यतो जेत्यांच्या बाजुला असावे आपण."
Indelibly burned into the memory.
हे हे हे... पुरतं गंडलय... असुन्दे पण...
भावना पोचल्या...
तेच महत्त्वाचं... नाही का??
आणि हो... तुझ्या ब्लॉगवर कमेन्ट टाकायच्या आधी ती इंग्रजी अक्षरं टाईप करायची परिक्षा का द्यावी लागते?
___ (साष्टांग नमस्काराची स्मायली) :)
धन्य धन्य शिवाजी राजा, धन्य त्याची प्रजा....
भयानक "सुंदर", भीषण, अफलातुन, मला पंख फुटलेत, अजगराने गिळल्यावर होईल तसं झालाय...
आसं खुप काही वाटलं ही पोस्ट वाचुन :D
तुम्ही महान आहात...
आपण धन्य आहात! विनोदाचे महंत आहात :)
अरे, मी वाचायला घेतलं आणि आज ’एकच पोस्ट वाचेन’ चा अट्टाहास तू मोडायला लावलास.अभ्यासाला ट्यॅंव केलं मी :D
Aho Yawning Dog, yawn karta karta jhopla ki kaay? Ki Nirarthak 5 chi tayari chalu aahe? :-) Jaam bore hotay kahi tari vachayla havay mhanun tumchi athavan jhali. :P
-Vidya.
@स्नेहल
हो भा. पो. महत्वाचे. वर्ड व्हेरीफिकेशन काढले मी.
@पिलूरायटर, नंदन, जास्वंदी
थँक्स.
@सखी
थँक्स. पण अभ्यासाला ट्यँव नको करत जावूस, u'll end up like me :)
@विद्या
वेळ कमी मिळतो बाई हल्ली. मंदी आहे, रात्र वैऱ्याची आहे :)
अप्रतिम फारच छान वाटलं वाचुन. लय भारी लिवता राव तुमी...! ते तंबाखुच पटलं आपल्याले..!
Post a Comment