Sunday, July 19, 2009

वेळापत्रक

आयुष्यात आळस आणि अव्यवस्थितपणा भरुन राहिला आहे असे लक्षात आले आहे. आळसपण असा मुरायला लागतो अंगात - ह्ह्या, नाही, असे काही नसते मुरणे बिरणे, माणूस जन्माला येतानाच तो आळशी आहे का अन-आळशी ते ठरलेले असते. आळश्यांचे प्रमाण कमी असावे एकुण जगात. बरेच जण आळशी असल्याचे नाटक करतात पण मनातून खरेतर आळशी नसतात.
आलसस्य कुतो विद्या? आळशी कुत्र्याला विद्या भेटत नाय. म्हणूनच एकुण आळस झटकला पाहिजे आणि शिवाय रोजचा वेळ सत्कारणी लावता आला तर उत्तम, दुधात साखर, सोने पे सुहागा, दुष्काळात तेरावा वगैरे.
(पूर्ण पोस्ट थोडक्यात आटोपायचे आहे - १२८०*८०० नियम)

आत्ताचे वेळापत्रक:

सोमवार ते शुक्रवार (साधारण दिवस, खूप काम नसलेला)
१. उठणे - (सव्वानउ)
उठायचे. इकडे तिकडे बघायचे, ५ मिनिटे बसायचे तसेच अर्धोन्लोळित अवस्थेत. नंतर झोपताना तसेच चालू राहिलेले दिवे बंद करायचे. गॅलरीत जावून उभे रहायचे ३-४ मिनिटे आणि जबडा ऍडजस्ट करायचा. लॅपटॉप सुरु करुन मेल बघणे. कुणी मिळाले ऑनलाईन तर पिळवणूक सुरु करायची. बरोबर फीड्‌स वाचायच्या.
२. आवरणे - (पावणेदहा)
आवरायचे. अंघोळ करताना जे गाणे आठवले असेल त्याच्यावर अंघोळ झाल्यावर रीसर्च, ते बघणे. कालचेच उदाहरण - सुलतन्स ऑफ स्विंगज गाणे बीबीसीवर दाखवायचे नाहीत सुरुवातीला, युएसमधे प्रसिध्द झाल्यावर दाखवायला लागले. सुन्या सुन्या महफिलीतमधे असला भंगार चष्मा असूनपण स्मिता पाटील भारी दिसते.
तर आवरायचे एकुण कसेतरी रडतखडत
३. ऑफिस - (सव्वादहा/दहावीस)
चहा, कॉफी, बारा-साडेबारापर्यंत पाट्या टाकणे. नंतर असाच युट्युब, विकी, गूगल इमेजेस सर्च, चॅट यावर वेळ घालवणे. दुपारचे जेवण. काम, चहा, लोकांशी गप्पा. सोबत काहीतरी दिवास्वप्न किंवा कल्पनाविलास - आपण असू त्या विमानात अतिरेकी घुसले तर, जॅक्सनचे ते भूत खरेच असले तर, कोथरुडमधे कॅसिनो काढला तर, ओबामा हुकुमशहा झाला तर, डायानासोर सापडले कुठे सामोई-बिमोई बेटावर तर. असा टाईमपास.
३.५. खेळ - बरेच लोक मिळाले व सर्वांचीच खेळायची इच्छा असेल तर खेळ
४. घर - (साडेआठ-नउ)
कंपनीतल्या महत्वाच्या माहितीची देवाणघेवाण. मग वाद-विवाद. परत देवाणघेवाण, वाद-विवाद. स्वयपाक/ऑर्डर. हादडणे.
५. पोस्ट्जेवण टाईमपास - (अकरा-साडेअकरा)
एका खोलीत टिव्ही लावून दुसऱ्या खोलीत लॅपटॉपवर टाईमपास.
६. झोप - कधीतरी झोपणे असे मधेच.

खरेतर वरचे वेळापत्रक आत्ता वाचल्यावर तितकासा आळशीपणा केलेला जाणवला नाही. पण आजूबाजूला घराची दुरावस्था पाहून तो जाणवतो.
एक प्लॅस्टीकची पिशवी दिसते आहे जी कित्येक दिवस आहे त्या कोपऱ्यात, काय आहे त्यात देव जाणे. स्टीलचे एक भांडे दिसते आहे, ते मी मागं एकदा पाणी पिता पिता खिडकीत ठेवले होते तिथेच आहे अजून. मागच्या महिन्यात एक जुना एमपीथ्री प्लेयर आतून कसा दिसतो ते बघायला स्क्रू ड्रायव्हर सेट आणला होता, तो आणि खोललेला प्लेयर दिसत आहेत टेबलावर.
हे सगळे आळशीपणामुळेच आहे असे, नीट जागेवर ठेवले पाहिजे.

नवीन वेळापत्रक:
१. उठणे - नउला उठायचे रोज, सव्वानउ वगैरे लाड नाही चालणार.
२. आवरणे - पटापटा आवरायचे साडेनउच्या आत.
३. खोली आवरणे - पुढची १० मिनीटे खोली आवरायची रोजच्या रोज. जागच्या जागी गेले पाहिजे सगळे. जिथल्या तिथे, नीटनेटके.
३. ऑफिस - दहाला ऑफिसला पोचायचे आणि तिथेच दिवसात पहिल्यांदा ईमेल-बिमेल चेक करायचे.

नंतर सगळे तसेच पूर्वीसारखेच ऍक्च्युअली, आवरणे फक्त नवीन, बाकी ठीके.

काहीही झाले आहे हे. पण असे लिहीलेले बरे असते छोटे छोटे, आत्मपरिक्षण वगैरे होते आपोआप.

****

14 comments:

Unknown said...

aala ya vishayavar lihaychi kalpana changli aahe.aalas ha mulatach asto.
kuto ya shabdacha artha kuthe(?) asa aahe, kutra navhe. aalshi mansala vidya kashee milel?(karan to prayatnach karnar naahee.

सर्किट said...

हे..हे..हे.. :) मस्त झालंय. बाकी ते १२८०x८०० चं जरा मिटवून घ्या राव. १६००x१२०० रिझोल्यूशन निवड, आणि फ़ॉण्ट साईझ ८ किंवा ६ घे. लिहीताना काय टायपतोयेस ते वाचता येणार नाही, पण तसंही तू स्वत:चं पोस्ट वाचणाऱ्यातला वाटत नाहीस, मग कशाला घोर.

बाकी अनेक विद्वत्प्रचुर जेम्स आहेत ह्या पोस्ट मध्ये, ज्या मनाला हेलावून गेल्या ..

अर्धोन्लोळित, कोथरुडमधे कॅसिनो, एक प्लॅस्टीकची पिशवी काय आहे त्यात देव जाणे, खोललेला प्लेयर टेबलावर, नंतर सगळे तसेच पूर्वीसारखेच ऍक्च्युअली.

!!!!!!

बाकी सर्वासाठी हशा आणि टाळ्या. पण त्या प्लॅस्टिकच्या पिशवीसाठी मात्र यू डिझर्व्ह _^_/\__

:-))

Maithili said...

Post nehamipramanech the best.
btw tu kon aahes? aalashi, un aalashi, ki aalashyachi acting karnara???

सर्किट said...

ऑन द सेकण्ड थॉट, नव्या टाईमटेबलने जर दररोज १० मिनिटे रूम आवरत गेलास, तर काही दिवसांनी आवरण्यालायक काही उरणारच नाही तिच्यात - एक्सेप्ट, पांघरूणाची घडी करण्याचे! पण जे पांघरूण १२/१४ तासांनी पुन्हा वापरायचेच असते त्याची रोज सकाळी घडी कशाला बरं घालायची?

Anonymous said...

"उठणे - नउला उठायचे रोज, सव्वानउ वगैरे लाड नाही चालणार."
LOL! :D
Good One.

P.S. Hyala jar Aalashi mhanat aasatil tar mala Aalashanchi MaharaNi mhanave lagel re... Mazya roomvar aashya aanek goshti aahet jya aastitvat aahet hech mala mahit nahi. Tyat eka Udarane uchchhad madala aahe!

आल्हाद said...

बरंय कि मग ...
पसार्‍याची घडी अशी नीट बसली की YD ला वेळच वेळच आणि आपल्याला ब्लॉग च ब्लॉग
:)
आणि कोथरुडात कॅसिनो म्हणजे त्यासाठी मराठी नाव शोधणं आलं ...
छान जमलय !!
असं अधुन मधुन आत्मपरिक्षण करणे गरजेचं आहे मित्रा ..
निदान आपल्याला असल्या गोष्टींची जाणीव तरी आहे याचं सात्विक समाधान मिळतं :D

Bhagyashree said...

wah wah.. maza awdta vishay!
mazya gharatala pasara awrayla kadhla, ani raddee chalali tar tyat he asach lihlele kagad sapdtil! asankhya atma-parikshana karunahi kahi hot nahire! alashi mansane alashich rahave.. tyala tech jamata! :D

bharri post! alashi kutryakade vidya kuthun yenar he vachun fissssskarun hasu ala!!! kuthun yetat he asle punches???

Anonymous said...

हाहाहा!
अर्धोन्लोळित............... काय पण शब्द लिहीलात राव! कुठून शोधला?

Sonal Waikul M.D.(Alt.Med.) said...

hahahahahha अर्धोन्लोळित...atti aahe ha shabd.
simply hilarious post. mala asa saunshay yeto kadhi kadhi ki tu je kahi wichar karat astos te aapoaap type hotat bahutek..tag sakat. itkya sahaj bhashet asat na sagal ki kaay sangu tula aata!
aalshi pan khup kelay mi aani majhya nawryane. tevha calcuttyala hoto doghech. sasu bisu koi nahi tha. Anthrune paanghrune ghadi ghaalnyasathi nastaat asa tham wishwas hota. shaniwaar aani rawiwaar paalaycho aamhi..anghol n karta. aani ravivari ratri angholun jhopal ki lagech somwari kashala karaaychi anghhol? double aalas.

Anonymous said...

kya baat hai YD..arey majhya kholeet bed khali, kapatamage vagaire shiv kaliin, saatvahan kaliin,buddh kaliin vastu sapadataat..

Vastu haravali tarach sapadnyacha anand hoto na?
AC cha remote 6 mahinyapoorvi bed khali padala aahe..me va patni padalya padlya paayaane laath maroon AC chaloo band karto..ek temprature set karoon thevley..pan khali vakoon remote kon kadhnaar?

Laptop anekada dhunyachya kapdyachya dhigaat asato..

Car chya gear leverkhali asalelya khaddyaat McDonald chi pakite,chocolate chi covers ani vadapav che kagad komboon basavale ahet..maagchya car servicing pasoonche..

Laaj vatate..pan kadhitarich thodach vel..

सखी said...

श्वाना.... बाबा,’अर्धोन्लोळित’हा असा शब्द तूच शोधू जाणे :)
बाकी मला ते टेबलावर कोपर्‍यात पाणी ठेवलेला ग्लास वाचून कसंकसंच झालं....म्हणजे एक्झॅटली सेम नाही पण शाळेचा डबा आठवला. लागोपाठ दोन-तीन दिवस सुट्टी होती तेव्हा एकदा आदल्या दिवशी नेलेल्या डब्यातून एकदा फन्गस डब्याबाहेर येणं बाकी राहिलं होतं :D :D

Dk said...

Hmmm mag he asech kantaallele lok HR la salri/ appraisalchya velles shiwya ghaaltaat! pan tyana he mahit nast ki tyana pan kantala yeu shkto! :D :D

ऋयाम said...

एका खोलीत टिव्ही लावून दुसऱ्या खोलीत लॅपटॉपवर टाईमपास.

--> he ekdam perfect asta bagh!!! :D

Unknown said...

Post chanach aahe.
Pan aata ekach post baryach vela wachun KANTALA aala. Navin post chi vat pahat aahe :)

Bhitri Bhagu