कुठल्यातरी डास का झुरळ मारण्याच्या स्प्रेची जाहिरात होती ती. जाहिरातीत ती बाई कुठे कुठे कानाकोपऱ्यात स्प्रे मारायची आणि नंतर शेवटी एकदम कॅमेरासमोर उभे राहून डासांना असे काहीतरी म्हणायची - "यहाँ न आना....घर मेरा है". आणि ती हे म्हणते तो शॉट, लो-अँगल घेतला होता, मग स्प्रेची बाटली पकडलेला तिचा हात मोठ्ठाआ दिसायचा. त्यामुळे तर मला जास्तच राग यायचा. यायचा नाय, अजूनपण आठवून आठवून येतो. ती स्प्रेची कंपनी बंद पडूदे, दिवाळं वाजूदे त्यांचं. नको कुणीतरी टेकओव्हर करा.
मूळ मुद्दा ते विधान. माझा आक्षेप आहे तो भाग - "घर मेरा है"
यापुढचे माझे मत बऱ्याच लोकांना विनोदी, फालतू, मूर्खपणाचे वाटते, पण माझे ते "गंभीर" मत आहे. त्याच्यावर जास्त वाद घातल्यास मी मैत्री तोडण्याचा निर्णय घेवू शकतो. तशाच वॉर्निंगापण दिल्या मी बऱ्याच लोकांना, तेव्हा ते ताळ्यावर आले.
"घर मेरा है"
काय संबंध? ती बाई हे वाक्य आपल्या नणदेला, सासूला, वाटल्यास भावजयीला सुनावू शकते आमची काही ना नाही. नवरापोरांना पण ऐकव तशीच वेळ आली तर. वसुली अधिकाऱ्यांना पण ऐकवू शकता. म्हणजे घर खरंच तुमचे असो नसो तुम्हाला हे उच्चारायची परवानगी आहे. कारण कायदेशीररीत्या चुकीचे वाटले तरी बोलण्यात काहीतरी तथ्य असू शकते.
उदाहरणार्थ,
भाउबंदकीतले नवऱ्याचे वडिलोपार्जित घर असेल आणि दीर/चुलता अचानक हक्क मागायला आला, त्याचा घरावर कायदेशीर अधिकार असला तरी एखादी खमकी बाई म्हणू शकते -
"तुम्ही होतात परदेशी उंडारत, अधेमधे विचारपूस करायची राहिलीच, कधी सणासुदीचा एक फोन नाही.
सासूबाईंची तब्बेत एवढी बिघडली होती, पगार व्हायचा होता म्हणून एक हजार मागितले तर हा बाबा म्हणतोय...वहिनींच्या माहेरून आणा तात्पुरते !
बाहेर संडास बांधला, झालचं तर नवी टाकी, एवढी डागडुजी केली नियमित...खस्ता खाल्ल्यात या घरासाठी.
आता आलेत हक्क सांगायला, वडिलोपार्जित घर आहे म्हणे...काही मिळणार नाही हक्क - पोलिसात जा नाहीतर कोर्टात जा.
घर माझं आहे"
आता वरील उदाहरणात, घर नक्की कुणाचे आहे ह्या समस्येला अनेक पैलू, आयाम, अँगल वगैरे आहेत. त्यामुळे "घर माझं आहे" हे विधान चालून जातं. पण लक्षात घ्या, हा भावाभावातला वाद आहे.
[परदेशी राहणाऱ्या भावा, मला माफ कर. तुझी बाजू नाही मांडली. तूपण कदाचित भावच्या शिक्षणासाठी वगैरे खस्ता काढल्या असतील, पैशांवरुन वहिनीच्या माहेरुन कधीतरी तुझा अपमान झाला असेल etc etc,
पण आत्ता आपला मुद्दा तो नाहिये. त्याहून महत्वाचे आहे आपले.]
सारांश काय, तर माणसांमाणसात असे विधान कधीही करा, माझी काही हरकत नाही. कायदेशीर, नैतिक, सामाजिक दृष्ट्या चुकीचे असले तरी करा हे विधान, बघु कोण अडवतोय ते?
पण
प्राणीपक्षी, किटक यांना कुठल्या अधिकाराने तुम्ही म्हणता की "घर मेरा है"? घराचे जे काय सेलडीड झाले ते दोन माणसांच्यात झाले आहे, का आजुबाजुच्या चिमण्या, कावळे झुरळंपण चार सह्या ठोकून गेले? आपले वाद, आपला व्यवहार आपल्या जगात. त्यांच्या विश्वात तुमची का घुसखोरी? असे त्यांना खडसावणे चूक आहे. त्यांच्या जगात त्यांनीपण कदाचित विकत घेतले असेल ते घर. मूर्खासारखे त्यांना काय सांगता "मेरा है" म्हणून.
त्यांना मारता ते मारा, स्वच्छतेसाठी वगैरे मारायला लागते. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, जीवो जीवस्य समथिंग. पण हे असले असंबध्द, ऍक्रॉस द स्पेसीज हक्क गाजवणारे काहीतरी बरळू नका. स्वत:ला ज्ञानी समजणाऱ्या माणसाकडून असे बोलणे अपेक्षित नाही - जाहिरातीतसुध्दा !
*
लोकांना हे पटत नाही, पण प्राण्यापक्ष्यांना हे मनापासून पटते म्हणून ते मला न घाबरता बेधडक दिवाळी साजरी करायला येतात माझ्याबरोबर.
**
बास आता, या आठवड्यात जरा जास्तच झाले, आता महिना, दोन महिने ब्लॉग नाही.
***
11 comments:
gap re... nimutpane udya parwa blog lihi!! :)
he post mastay !!jaam awdla! :)
dev karo aaNi tula ashyach raag aananarya jahiratee disot...
tula khoop kantala yevo...
tula jagatalya saglya wishayanwar etake kahi sucho ki tu lihile nahis tar tula zop na lago...
bas zale Shap!! baghu kasa thambtos mahina don mahine!!
धन्यवाद मित्रांनो.
१-२ महिने थांबणे असेच म्हणले होते - उगाच अडवाणींआजोबांसारखे.
बडबड करण्याशिवाय दुसरे काम काय आहे आपल्याला :)
*
महाफालतूपणा असाच सुरु ठेवीन जमेल तसा :)
mitra kon disle ithe tula? saglya maitrini ch tar ahet! :D
bar bar...dhanyavaad mitra-maitrinino.
mothee feminist ch ahes kee janu :D
Here comes another female friend! Hey, I liked this off-bit post a lot more than others ... and this reminded me a fight with my cat, for a computer chair ...
Here comes another female friend! Hey, I liked this off-bit post a lot more than others ... and this reminded me a fight with my cat, for a computer chair ...
अगदी हीच जाहिरात मला नडायची रे! एकदम अस्सेच भाव यायचे मनात. आयला हे सगळे की्टक लोक इथे मिलियन्स ऒफ़ इअर्स आहेत, विंचू वगैरे तर डायनासोरच्यापण आधीपासून! आणि ही कालची बया उगीच छाडमाड स्पे घेऊन ’मेरॆ घर है!’ म्हणे! जळ्ळं मेलीच ल़क्षण! एकदम सही पोस्ट लावलं आहेस.
(काही दिवस पोस्ट नाही म्हणून खाली कॊमेंट टाकायची काय जरुर होती? असं कुठं असतंय का? तुला तसं बरं राहू देऊ आम्ही! ;) )
चतुरंग
लेका जृंभ्या, लै चढला रे तू? थांबायच्या वगैरे गोष्टी करून र्हायला बे तू? माघार घेतली ते चांगलं केलं तू, नाहीतर तुजं काय खरं न्हवतं बघ. असो. पोस्ट आवाडलं...
Aare hi vaait jahiraat kiti divas vachaychi? :-P Kantala aala.
-Vidya.
@vidya
Kantala ala he uttam, enjoy it...breathe it, live kantala :)
Vel milana zalay vo :(
Post a Comment