Sunday, May 31, 2009

नवीन म्हण

नवीन म्हण

"आई आजारी, बाप पुजारी"

शब्दार्थ - आई आजारी पडली असताना तिची शुश्रुषा करण्याचे महत्वाचे काम सोडून, बाप देवाची पूजा करत बसला आहे.
भावार्थ - सर्वांच्या दृष्टीने महत्वाचे व तातडीचे काम करणे सोडून आपलेच काहीतरी कमी महत्वाचे काम करत बसणे.

ही म्हण वापरता येईल असे बरेच प्रसंग असतात. दोनचार उदाहरणे बघू.

उदाहरण १.
सुरेश आणि रमेश आपले सामान नवीन घरी नेत होते. दोघांनी सोफा उचलायला हात लावला, अचानक रमेशने हात काढला आणि म्हणाला,
"सोफ्याच्या लेदरवर डाग कसले पडलेत? सुरेश थांब, तू धर सोफा असाच, मी लांबून बघतो जरा, हे डाग किती ठळक आहेत ते"
यावर सुरेश म्हणाला, "रम्या लेका, एकट्याने एवढा जड सोफा धरला आहे मी, आता धड खालीपण ठेवता येत नाही, तुला आत्ता या क्षणी, टोचतायत का ते डाग? तुझे म्हणजे, आई आजारी आणि बाप पुजारी"

उदाहरण २.
"महाराज, गुप्तहरांनी वार्ता आणली आहे की, वायव्यदिशेने सम्राट पश्तुनकेतू सात अक्षौहिणी सैन्यासह आपल्या राज्यावर चालून येत आहे", प्रधानजी त्वरेने बोलत होते.
"ह्म्म, बरं एक सांगा प्रधानजी, वसंतोत्सवाची सर्व तयारी झाली ना?", महाराज वदले.
"होय महाराज, सर्व तयारी झाली आहे, आज्ञा असावी, निघतो आम्ही", प्रधानजी चरफडतच राजमहालाबाहेर आले व मनात म्हणाले, "आई आजारी, बाप पुजारी"

तिसऱ्या उदाहरणाची खरेतर काही गरज नाहीये, पण असुदे, आमच्या क्षेत्रातले आहे.
उदाहरण ३.
काहीतरी गडबड झाली असल्याने सर्व इंटरनॅशनल कॉल्स फुकट जात होते, त्यामुळे कस्टमरने इंटरनॅशनल कॉल सुविधा बंद केली होती. गणेशने दोन तास खपून यावरचा फिक्स प्रॉडक्शनमधे पाठवला. फिक्स टेस्ट करायला प्री-प्रॉडक्शन टीम इतका वेळ का घेते आहे याची चौकशी करता त्याला कळाले की टेस्टर आपली टाईमशीट भरण्यात व्यस्त आहे. गणेश त्याला म्हणाला, "गाढवा आधी हे टेस्ट कर, नंतर भरा तुम्ही किती तास काम केले ते, अवघड आहे कंपनीचं आपल्या, इथे आई आजारी अन्‌ बाप पुजारी"

***

17 comments:

Unknown said...

hehe sahi examples!!
ani mhaN hi mahit navti..

-भाग्यश्री

Meghana Bhuskute said...

aga, tyachya creativity la dad de na, mhan mahit nawhati kay mhantes saral?!

सर्किट said...

apalya sarakhya vicharvantanich ya adhichya mhani pracharat analya asanar.

marathi bhaashetarfe man:purvak aabhaar! :)

sahi ahe mhan, ani examples hi.

Vidya Bhutkar said...

haha....sagali kaame sodun vachat basley me pan.... Aai Aajari,baap pujari.... :DDDD
-Vidya.

Shardul said...

अजून एक उदाहरण:

जेव्हा तिला वाटत असतं, तुम्ही जवळ यावं
जवळ यावं याचा अर्थ, तुम्ही जवळ घ्यावं !
अशा क्षणी चष्मा पुसत, तुम्ही जर शुद्ध काव्य बोलत बसला,
व्यामिश्र अनुभूती, शब्दांनी तोलत बसला !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !

जेव्हा ती लाजत म्हणते, “आज आपण पावसात जायचं”
याचा अर्थ चिंब भिजून, तिला घट्ट जवळ घ्यायचं,
भिजल्यामुळे खोकला होणार, हे तुम्ही आधीच ताडलंत,
भिजणं टाळून खिशातून, खोकल्याचं औषध काढलंत !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !

तिला असतो गुंफायचा, याच क्षणी श्वासात श्वास,
अनंततेवर काळाच्या, तुमचा असतो दृढ विश्वास,
तुम्ही म्हणता थांब जरा,
आणि होता लांब जरा,
तुम्ही चिंतन करीत म्हणता, “दोन श्वासांमध्ये जे अंतर असतं,
काळाच्या पकडीत ते कधीसुद्धा मिळत नसतं !”
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !

भाषेच्या ज्ञानाने तर, तुम्ही महामंडित असता,
व्याकरणाचे बारकावे, त्याचे तुम्ही पंडित असता,
ती ओठ जवळ आणते, व्याकरणात तुम्ही शिरता,
ओठ हे सर्वनाम? त्याचा तुम्ही विचार करता !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !


कवी - मंगेश पाडगावकर

Yawning Dog said...

सर्वांना धन्यावाद :)

मेघना, ती म्हण खूप प्राचीन आहे गं, तुमच्यासारख्या आजकालच्या पोरींना काय माहीत जुन्या म्हणी :)

Vidya Bhutkar said...

Hey Shardul,
Me hi kavita aikali navti adhi. Mast aahe.

-Vidya.

Anonymous said...

arey tya bapaache hriday tumhi konich jaanale nahiit..bichara aai bari vhavi mhanoon dev panyaat thevoon basalaay..ani tumhi tyala mhanicha mhanajech tuchchhatecha vishay tharavata? Bayko bari vhavi mhanoon devala dharevar dharanara navara? Nakkich juna kaal asanaar..at ev mhanahi junich asavi..
Mast..by the way..

Yawning Dog said...

ha ha ha, hee zalee "Nachiketi" comment :)

MuktaSunit said...

"आई आजारी नि बाप पुजारी " : हे म्हणजे , भाटीयाच्या खाडीत बुडणार्‍या दालद्याला , विश्वेवराच्या घाटीवर बसून नमाज वाचून दाखविण्यासारखें ! त्याचा ह्यास नि ह्याचा त्यास , उपयोग क्काय ! ;-)

Sonal Waikul M.D.(Alt.Med.) said...

marathi saahityat molachi bhar ghatalyabaddal maay marathi tujhi kayam runi raahil.;-)

Snehal Nagori said...

हेहेहे!!! सॉलिड आहे....
आई आजारी आणि बाप पुजारी...

Bhagyashree said...

arr meghana.. YD chya creativity la afaaT dokyaalaa daad deun mi kantalale ata.. ENO ghyava lagel ani! :D
tyaamuLe jara khadus pana kela. :)

Monsieur K said...

tulaa saglyanni standing ovation dila paahije.. kinvaa "hail YD" kela paahije!
absolutely fantastic!! :)

मी बिपिन. said...

वा!!! क्या बात है!!! झबर्डस्ट.

a Sane man said...

सातवीच्या स्कॉलरशिपच्या नवनीतच्या मराठीच्या गाईडमध्ये समाविष्ट करण्यासाठी श्री. विकास ह्यांच्याकडे का नाही पाठवत? :D

Yawning Dog said...

@केतन, बिका, सेन
थँक्स :)