Thursday, December 17, 2009

बाकी काय?

बाकी काय?

बाकी पाण्याची टाकी
तीही कोरडी, ठणठणीत
नावातच पाणी

बाकी केवळ सिमेंट
उन्हाच्या खपल्या मिरवणारं
दगडी रंगाचं सिमेंट

बाकी आत एक प्लॅस्टिकचा फुटबॉल
एककाळ गर्द शेवाळलेला
आता हवेतच तरंगणारा
गोळे आलेला, पांढरे पांढरे तंतू लोंबवणारा

बाकी शेजारी एक झाकण,
एककाळ रडतखडत गंजणारं
आता अक्राळ टोकं पारजणारं

बाकी आत बारकी मुलं
गच्चीवर जाण्यासाठी फटकावलेली
आता आतमधे लपंडावणारी

बाकी एक पाईपलाईन,
सुतळ्यांच्या बुशिंगची, भिंतीला चिकटवलेली
आता अँटिने लावलेली

बाकी खालीपण एक टाकी,
खालीपण खालीच
जाळीतल्या लालहिरव्या बटणाकडे
एकटक बघणारी

बाकी काय?
बाकी सगळीच टंचाई

*

आज बाकी काय प्रश्न विचारणाऱ्या व पूर्वी अनेकदा बाकी काय विचारणाऱ्या सर्व व्यक्तिंचे आभार.
***

16 comments:

Unknown said...

mastach..
baki kaay?!

Anonymous said...

हाहाहा, मस्तच आहे. जेंव्हापासून मी तुझा Blog वाचला, मी त्याची fan आहे. पण comments कधी टाकली नाही, कारण ज्या level चे posts आहेत, तितक्या चांगल्या कॉम्मेंत्स देता येतील का याची जरा शंकाच आहे मला. पण आज मात्र राहवलं नाही. May be कारण मी तुझ्या नवीन post ची खूप वाट पाहत होते.
ह्या post बद्दल काय बोलू, नेहमीप्रमाणे सुंदर आणि मस्त,
"बाकी खालीपण एक टाकी,
खालीपण खालीच"
हि line तर खूपच आवडली
बाकी काय.....
(ह्या post ला मिळणाऱ्या प्रत्येक comment चा end "बाकी काय" असाच असेल ह्याची १००% खात्री बाळगू शकतो :P )

अमृता

Tejaswini Lele said...

Bhaaaarrrreeeee!

साळसूद पाचोळा said...

आता बाकि काय?.. काहिच नाय..

Maithili said...

Sahich aahe ekdam.... nehami pramane
Yawning dog rocks..........

सर्किट said...

आप्पा, जरा वैतागलेलेच दिसताये तुम्ही! ;-)

छानच आहे कविता. बाकी अजून काय चाललंय? :-p

Dk said...

बाकी काय? बाकी काय? बाकी काय? ;)

Anonymous said...

arey yaar...kiti chhaan boltos re..

Baki barach kahi kahi asata..jitaka baghava titaka sagala bakich asata..

Khara tar sagalach baki asata ani baki nasalela asa kahi nasatach..

Jhakan,football,cement..jasajasa baghat jau tasa saarach baaki asalyaacha disel..

Jau de..mastch re..mast ch..

Sonal Waikul M.D.(Alt.Med.) said...

Akshrshah chitrakala keli aahes tu. hi apratim!
itke lekh wachun je dokyat gel nahi te ya chitrane nakki dokyat shirel lokanchya...tehi nahi shiral tar baki kaich nahi urnaar. Shunya!

Yawning Dog said...

@Yog, Sachin, Deep - :D

@Amruta - LOL, kaheehe kay aga level bivel. Thanks

@Lele - Thanks, ashirvaad asudyat

@Maithili - Thanks :)

@Circuit - Nahee re vaitaglo naheeye, asach tp :D

@Nachiket - Thanks :)

@Sonal - Thanks :)

Ajay Sonawane said...

अप्रतिम कविता, किती हलकीफुलकी , २-३ वेळा वाचली तर मन नाही भरलं...बाकी काय मग :-)

Anonymous said...

मित्रा, लय्य्य्य्य्यय्य्य्य्य्यय्य्य भारी रे,
मला पण "बाकी काय" विचारणार्‍या लोकांचा आजकाल फार राग येऊ लागलाय !!!!!!!
स्वतःच फोन करतात आणि पहिला प्रश्न "बाकी काय"
" अरे सांडा, कंटाळल्यासारखा पहिलाच प्रश्न हा , मग तू मला कॉल कश्याला XXXX मारायला केला?" - इति मी, मनातल्या मनात

a Sane man said...

awesome!

Anonymous said...

बाकी काय?
प्रश्न छोटाच आहे पण दरवेळेस काय नवीन उत्तर द्यायचं? ही सगळीच उत्तर छान.....

अमृता लेव्हलचं म्हणतेय ते खरंय!
antenna चं अनेकवचन अँटिने, परत वाचल्यावर कळलं!

मी बिपिन. said...

baaki shunya !!!! ;)

Anup Barve said...

baki kay?
..saglach andhaar
andhaarat kay?
..aple routine
routine madhe pahije kay?
..kahi timepass kshan
timepass kuni karun deil kay?
..bashkal badbad

hay kay an nay kay !!