Monday, January 18, 2010

तात्कालिक स्वप्न

माणसाच्या स्वप्नात पँडोरा ग्रहावरच्या विलोभनीय सृष्टीपासून ते दोरीवर वाळत घातलेल्या खांद्यापाशी फाटलेल्या बनियनपर्यंत, काहीपण येवू शकते. कशाचा कशाला धरबंदच नाही.
मूळ मुद्दा वेगळा आहे पण,परंतु आपण जरा नमन करु -
आमच्या स्वप्नात एकदा खवल्या मांजर आल्याने मी त्याचे चित्र काढले होते - हे हटकून सांगावेच लागते दरवेळी.
प्राणीवर्गातून मधे एकदा एक वाघ आला होता स्वप्नात. मी अवतार सिनेमा पाहीला आणि त्या रात्री मला स्वप्न पडले की - मी ताथवडे उद्यानात झोका घेत आहे आणि मागे रांगेत आपल्या पाळीची वाट बघत एक वाघ उभा आहे. थोडा वेळ वाट बघून तो मला म्हणाला, "बराच वेळ झाला की मला दे ना आता", मी त्याला "ए चल हल्ल" असे झिडकारले (हड्‌ नाही हो, आम्हाला हड्‌ शब्द आवडत नाही, कारणे वैयक्तिक आहेत) तेव्हा वाघ रडावयास लागला. त्यामुळे मला दया आली आणि मी त्याला "रडू नकोस, बस. मी तुला झोका देतो" असे म्हणालो, मग तो छान हसला आणि ‘फिटे अंधाराचे जाळे’ गाणं म्हणंत म्हणंत झोका घेवू लागला.
तर हे आईशप्पथ खरं स्वप्न आहे. दुसऱ्या दिवशी उठून मी सर्वांना स्वप्न सांगितले वर हेही सांगितले की निसर्ग# व मानवाचे आज संबंध कसे आहेत, ते कसे असावयास पाहिजेत ह्याचे एक रुपक आहे माझे स्वप्न म्हणजे. आपण सामाजिकदृष्ट्या लय सेन्सिटीव्ह सोल आहोत ना त्यामुळे असली स्वप्न पडतात.
नमन जास्त काही तेलकट झालं नाही. सिनेमात मूळ गोष्टीतला सहभाग दाखविण्याआधी हिरो/व्हिलनचे कॅरॅक्टर बिल्डप करतात तसे आम्हाला आमच्या स्वप्नाचे कॅरॅक्टर बिल्ड करायचे होते.
*
काल माझ्या स्वप्नात शिक्षण आले होते. मी तसा अभ्यासात जरा कच्चाच असल्याने व पूर्वी शिक्षणाला कधी असे समोरासमोर पाहिले नसल्याने थोडावेळ मला झेपलं नाही की हे शिक्षणमहाराज आहेत.
माहीत असावं म्हणून सांगून ठेवतो - शिक्षण जे आहे, ते राष्ट्रवादीच्या जिल्हा लेव्हलच्या कार्यकर्त्यासारखं दिसतं; स्वच्छ पांढरा सदरा, खिशाला न गळणारं शाईपेन आणि हातात दोन फाईली. पँट. बुशपँट हा काय प्रकार आहे ते मला आजवर नाही कळाले. अनवाणी - पायात चपला नव्हत्या. खोटं कशाला बोला, आपल्याला तर स्वप्नातपण प्रश्न पडला की वाण्याने चपला नाही घातल्या तर त्याला अनवाणी तरी कसे म्हणणार? असो. शिक्षण सुशिक्षित असल्याने, त्याने पायातल्या वहाणा काढून कुणाला हाणले असण्याची शक्यता कमी आहे, देवळातंनं चोरीला गेल्या असतील बिचाऱ्याच्या. तर या अवतारातले शिक्षण आले आणि थेट रडू लागले. ओक्साबोक्शी नाही अगदी, मुसमुसणे का काय ते.
या पॉईंटला शिक्षण, त्याचे अपकमिंग मनोगत हे सर्व वाचून कोणाला लहानपणीचे निबंध आठवले, हा प्रकार बाळबोध वाटला, कोणी बोर झाले तर दोष माझा नाही, परिस्थितीचा आहे. (किंवा बोर झालेल्याचा असेल, आमचा नाही. बास्स.)
बरं. मी विचारले की, "का बाबा का रडत आहेस उगाच भरल्या घरात?"
ते म्हणाले की, "येड्या रडू नायतर काय करु? जनता लय पाठीमागे लागली आहे माझ्या. अर्थ नाही म्हणतात, मला स्टिरीओटाईप करतात, लोकं आईवरनं शिव्या देतायत की राव. तूपण शिव्या घालतोस मला"
"शिव्या द्यायलाच पाहिजेत लेका, त्रासच तसा देतोस तू. गृहपाठ काय, अभ्यास काय, दप्तराची ओझी काय, जनता ओरडेल नाहीतर काय?" असे वाक्य संपवायच्या आतच त्याने आपली गाडी रेटली,
"पण मी तुझ्याकडे हे विचारायला आलो की, साल्या तू तर अभ्यासाच्या नावाखाली काय केलेस ते माहिते मला, तसं बघायला गेलास तर खेळातपण काही तेंडुलकर नव्हतास, पालकांनी काही निर्णय लादले वगैरे नाहीत. लादायचेच असते तर पहिले तुला शाळेतून काढून पंतप्रधान रोजगारहमी योजनेला लावले असते. एकूण काय सामान्य मुलगा आहेस एक; तरीपण आज पोटापुरता खातोस, संध्याकाळी खेळतोस, नेटवर च्यायला नट्यांचे फोटो-बिटो बघतोस, मजा करतोस. माझा एकदम कमी सहवास लाभला तुला तरी मग तू का मला शिव्या देतोस? बाकी लोक देवू देत"
"मी सामान्य ईंजिनीयर राहीलो ना भाऊ" - असे मी स्पष्ट सांगितले एकदम, न लाजता, बाणेदार, उभी आठी घालून.
"मंग, तेच तर म्हणतोय ना? सगळ्यांनाच जेम्स बाँड व्हायचे आहे, एजन्सी कोट्यात सात नंबरचा बिल्ला एकच आहे की पण, माझा काय दोष?"

पुढे आमचे लय संभाषण झाले खाजगीत. आठवत नाही सगळे, मला असे तोंडावर कुणी सामान्य म्हणाले तर माझा मूडॉफच जातो.
एक होतं पोष्ट, संपली आमची गोष्ट.
**
इन जनरल पब्लिक आमच्या स्वप्नात येवून रडते व मग माझे मत बदलते असे एक लक्षात आले आहे माझ्या. समोरचा माणूस रडल्यास पर्स्युएबल आहे मी - Crysuable थोडक्यात.

***
#टाईप करताना ‘निसर्ग’ शब्दाचे चुकून ‘निसर्गा’ झाले - मुलीचे नाव म्हणून चांगले आहे की हो.
***

21 comments:

Jaswandi said...

सहीच स्वप्नं पडतात तुला! शिक्षण वगैरे यायला लागलं स्वप्नात तुझ्या..क्या बात है!वाघाचं स्वप्नपण भन्नाट आहे हं.. ’फिटे अंधाराचे जाळे’ काय? काहीपण! काहीपण.. :D

वाणी-अनवाणी अफाट प्रकार आहे!

Unknown said...

"मी सामान्य ईंजिनीयर राहीलो ना भाऊ" - असे मी स्पष्ट सांगितले

मला असे तोंडावर कुणी सामान्य म्हणाले तर माझा मूडॉफच जातो.

Contradiction!!

Yawning Dog said...

Thanks Jaswandi :)
Hehe Yogesh, I know :D

Raj said...

mood off jato warun 'bad luck hi kharab hai' athawale. :D

masta TP. shikshan ha shabda title madhye asalelaa ek nukatach pradarshit jhaalela cinema baghanyat aala aahe ka? :p

Unknown said...

अरे खोटे वाटेल पण काल मी अगदी याच विषयावर ब्लॉग लिहिण्याचा विचार करत होतो... मला पडलेली विचित्र स्वप्ने...पण लिहिले नाही.
खर्र्र्र सांगतो... अगदी माझ्या स्वप्नात येणार्‍या कॅटि होमस्‌ आणि कॅतरीना कैफची शप्पथ !!!!!!!

रोहन... said...

मस्तच स्वप्न रे ... माझ्या स्वप्नात साप - नाग येतात बरेचदा. लिहेन त्यावर कधी...

बाकी 'लेजंड ऑफ प्रिन्स धृमण - धृमणाची धर्वणाश्रम भेट' या नंतर तुझा मोठा पंखा झालो मी... हेहे... :)

Maithili said...

he..he... sahich swapne padatat tula sudha. Mhanaje ekach jamatitale zalo ki aapan.
Vaagh- zoka-phite andharache jale-shikshan.....baap re......
Lay bharri post.

आल्हाद said...

lolz
लवकरच वाघीण स्वप्नात येउन "यमुनाजळी खेळू" म्हणायला लागेल !!
nice punch dude...
liked it

Mugdha said...

sahhii!! maja aali wachtaannaa..

Anonymous said...

changle ahe..

आनंद पत्रे said...

आवडले...

Anuja said...

हा हा YD, दोन्ही स्वप्नं एकदम झक्कास !!! "फिटे अंधाराचे जाळे" म्हणत म्हणत झोके घेणारा वाघ माझ्या डोळ्यासमोर तरळतोय.. आज रात्री आमच्या पण स्वप्नात येणार वाटतं तो :)

Abhijit Bathe said...

Correct me if I am wrong. Tiger and al if fine - so is NCP, but the dialogue with 'education' didnt sound like 'dreamy stuff'. Maybe you wanted to say more about something. I wonder what!

Bhagyashree said...

hahaha... mala vaghache swapna lai mhanje lai ch awdle buva !! kasli hastiy mi !!! :)))))))))))))

सर्किट said...

shikshanache swapn tula nakkich 3I pahun zalyavar ratri padale asanar. to reference dyayala pahije hota.

3I nantar tula he swapna padala asel, tar mag mala ekdum BHA.PO.

chyayala, to Aamir 400+ patents gaThishi asalela asala genious dakhavala ahe, ki tyachyashi swat: la 'identify' karayachi ch laaj vaTate. aaNi mag tyane shikshaN paddhati var odhalele taashere suddha aapalese vaaTat nahit.

"khuppp hushshar lokanchya drushTine asatil buwa shikshaN paddhatit kahi faults. paN apalya sarakhya samany students na hi ch paddhat bari paDali ek nokari miLavaNyasaThi." ase kahise vichar yevun gelele manaat (aaNi swapnaat).

baaki post nehemipramaNech dilkhechak. ;-)

ओहित म्हणे said...

भाऊ ईंजीनीअरला सामान्य म्हणून ऊगाच भावना दुखवू नका राव. ऊद्या "ईंजीनीअरींग" पण स्वप्नामधे येऊन रडकथा ऐकवेल!

बाकी मजा आली - हे वेगळं सांगायला नकोच.

Salil said...

Jinkalas! Lai bhari...

मी बिपिन. said...

daaraabaaher paaTi laav aataa....

"aamache yethe hasavun hasavun marale jaail"

Anonymous said...

YD saheb..kiti vaat pahayachi amhi..ati hotay..liha ata kahitari..

Yawning Dog said...

@Nachiket- Sadhya kaam jordaar anee jara dhandal chalu ahe re ekoonch :S

Nandan said...

Yaw. Do. raav, naveen lekh yeu dya ki. Vaat pahto aahe.