मिस्टर इसाप, पूज्य विष्णु शर्मा आणि मुल्ला नसरुद्दिन ह्या प्रभृतींविषयी मला प्रचंड आदर आहे. इसाप आणि नसरुद्दिनच्या गोष्टी खरच त्यांचे अनुभव होते का नाही ते देवच जाणे. पण छोट्या छोट्या अर्थपूर्ण गोष्टी लिहायला फार कसब लागत असावे असा माझा आपला अंदाज. हा अंदाज पडताळून पाहण्यासाठी मी स्वतःच एक अर्धा डझन गोष्टी लिहू म्हणतो#
मला इसाप आणि पंचतंत्रामधल्या गोष्टीत सगळ्यात आवडणारी बाब म्हणजे - तात्पर्य ! १० ओळी आणि लगेच तात्पर्य, सही वाटते. कधी कधी तर तात्पर्य आधी ठरवले आणि गोष्ट नंतर रचली असे वाटते :) काहीका असेना मूळ गोष्ट फंडू असते और हमभी ऐसी बोधकथा संरचित करनेकी चेष्टा जरुर करेंगे.
एकदा काय होते की टॉम्या आपल्या हाताखलच्या वाघ्याला एक अवघड काम देतो - जाम अवघड काम, १०० खोट्या हाडांच्या फोटोमधून एका खऱ्या हाडाचा फोटो शोधुन काढायचा ! आपला वाघ्यापण घाबरत नाही, तो दिवसाखेरीस ६० हाडफोटो संपवतो आणि टॉमीसाहेबाला म्हणतो, साहेब उरलेले ४० उद्या तपासतो. टॉमीसाहेब जाम खुष, त्याला तर आधी वाटले असते कि दिवसाखेरीस १० हाडफोटो तपासले गेले तरी चिक्कार, तो मनात म्हणतोसुध्दा "हा वाघ्या आहे म्हणून माझे सगळे काम कसे झटपट होते, नाहीतर तो शेरु - आळशी लेकाचा".
टॉमीसाहेब वाघ्याला म्हणतो, "शाब्बास, आता जायच्या आधी एक काम करायचे, चावरान सेंटरमधे आता दिवस सुरु होइल, उरलेले ४० हाडफोटो शेरुला पाठव, त्याने दिवसभरात ५ तपासले तरी डोक्यावरुन पाणी!"
खरे तर वाघ्याला रागच येतो टॉमीसाहेबाचा, टॉमी कायम कारण नसताना शेरुला मंद समजत असतो आणि कमी लेखत असतो. टॉमीसाहेबालाही माहित असते की शेरुच्या सेंटरमधे इतर टिम्सचे पूर्ण सहकार्य मिळत नसल्याने शेरुच्या कामाला वेळ लागत असतो. असो. वाघ्या उर्वरित कामाबद्दल शेरुला मेल टाकून देतो आणि कटतो.
दुसऱ्या दिवशी वाघ्या येउन बघतो तर काय, उरलेल्या ४० मधला एकही हाडफोटो शेरुने तपासला नसतो! तेवढ्यात टॉमीसाहेब येउन स्टेटस बघतो आणि भडकतो, वाघ्याला विचारतो, शेरुचा काही निरोप ? का नाही तपासला एकपण हाडफोटो त्याने?
वाघ्या जरा चरकतो, त्याला माहिती असते शेरु कामचुकार नाही आणि तो जाणूनबुजुन असे करायचा नाही, दुसऱ्या एखाद्या कामाच्या गडबडीत नेमका त्याने हा मेल वाचलाच नसेल; पण वर्षाच्या शेवटचे दिवस आहेत व ह्या घटनेचा शेरुच्या पगारवाढीवर परिणाम होउ शकेल - तसे नको व्हायला !
वाघ्या बिनधास्त थाप मारतो साहेबाला -
"टॉमी,
bonephotos were transferred via Bonesoft proprietary MarrowTrans software, but the photos were marked with wrong MT version which was not compatible with current vesrion of MarrowTrans hence bonephotos got corrupted - Sheru has already engaged MT team to fix latest version meanwhile he recovered the original photos and sent back to me"
वाघ्याच्या अपेक्षेप्रमाणे टॉमीला तांत्रिक भाषेतले ओ की ठो कळाले नाही पण शेरुची चूक नव्हती एवढे उमजले.
सगळी भानगड संपली आणि आपण शेरुला संकटातून वाचवले असे वाघ्याला वाटते व तो उरलेले काम संपवतो. वाघ्या खुष, शेरु खुष, टॉम्यापण खुष. दिवसाखेरिस वाघ्या आणि टॉमीसाहेब हसतखेळत घरी जाणार तेवढ्यात शेरुचा मेल येतो - "टॉमी, काल माझा छोटासा अपघात झाल्याने कामाला येउ शकलो नाही, गडबडीत तुम्हाला निरोप पण देता आला नाही" - CC वाघ्या.
टॉमीसाहेब वाघ्याकडे फक्त एक कटाक्ष टाकतात. वर्षाच्या शेवटी, शेरुला १५ टक्के पगारवाढ मिळाली तर वाघ्याला १० टक्के.
आमच्या गोष्टींना स्वतःचे असे समांतर विश्व असते[प्यारेलाल युनिव्हर्स] त्यात कायबी घडू शकते [उदा. उद्या कुत्रा हा जंगलाचा राजा असेल आणि वाघ, सिंह पाळीव प्राणी]
पण तात्पर्य चांगले असेल हे नक्की.
माझ्या इतर सर्व संकल्पांप्रमाणेच एखादी गोष्ट लिहून झाल्यावर माझी ही येडेगिरी बंद होइल असा ठाम विश्वास आहे. ३-४ महिन्यापूर्वी टोलेकिनच्या ‘Lord of the ring’ टाईप आपणपण एक ५-६ खंडांचे काल्पनिक पुराण रचावे असे मनात आले होते आणि तर्राट २० पाने खरडली, आज त्यातले एक पान सापडले तरी शप्पथ.
*
मला इसाप आणि पंचतंत्रामधल्या गोष्टीत सगळ्यात आवडणारी बाब म्हणजे - तात्पर्य ! १० ओळी आणि लगेच तात्पर्य, सही वाटते. कधी कधी तर तात्पर्य आधी ठरवले आणि गोष्ट नंतर रचली असे वाटते :) काहीका असेना मूळ गोष्ट फंडू असते और हमभी ऐसी बोधकथा संरचित करनेकी चेष्टा जरुर करेंगे.
***
कथेचे नाव
वाघ्या, शेरु आणि पगारवाढ
कथा
वाघ्या आणि शेरु हे एकमेकाचे जीवलग मित्र असतात [नावावरुनच कळेल की हे २ प्राणी भूभू वर्गातले आहेत]. ते दोघेही बोनसॉफ्ट ह्या नावाजलेल्या संगणक कंपनीत एकाच टिममधे काम करत असतात पण शेरु ‘चावरान’ सेंटरमधे तर वाघ्या ‘कावरान’ सेंटरमधे. दोघांचा साहेब एकच - टॉम्या, तो ‘कावरान’मधे असतो वाघ्यासोबत.वाघ्या, शेरु आणि पगारवाढ
कथा
एकदा काय होते की टॉम्या आपल्या हाताखलच्या वाघ्याला एक अवघड काम देतो - जाम अवघड काम, १०० खोट्या हाडांच्या फोटोमधून एका खऱ्या हाडाचा फोटो शोधुन काढायचा ! आपला वाघ्यापण घाबरत नाही, तो दिवसाखेरीस ६० हाडफोटो संपवतो आणि टॉमीसाहेबाला म्हणतो, साहेब उरलेले ४० उद्या तपासतो. टॉमीसाहेब जाम खुष, त्याला तर आधी वाटले असते कि दिवसाखेरीस १० हाडफोटो तपासले गेले तरी चिक्कार, तो मनात म्हणतोसुध्दा "हा वाघ्या आहे म्हणून माझे सगळे काम कसे झटपट होते, नाहीतर तो शेरु - आळशी लेकाचा".
टॉमीसाहेब वाघ्याला म्हणतो, "शाब्बास, आता जायच्या आधी एक काम करायचे, चावरान सेंटरमधे आता दिवस सुरु होइल, उरलेले ४० हाडफोटो शेरुला पाठव, त्याने दिवसभरात ५ तपासले तरी डोक्यावरुन पाणी!"
खरे तर वाघ्याला रागच येतो टॉमीसाहेबाचा, टॉमी कायम कारण नसताना शेरुला मंद समजत असतो आणि कमी लेखत असतो. टॉमीसाहेबालाही माहित असते की शेरुच्या सेंटरमधे इतर टिम्सचे पूर्ण सहकार्य मिळत नसल्याने शेरुच्या कामाला वेळ लागत असतो. असो. वाघ्या उर्वरित कामाबद्दल शेरुला मेल टाकून देतो आणि कटतो.
दुसऱ्या दिवशी वाघ्या येउन बघतो तर काय, उरलेल्या ४० मधला एकही हाडफोटो शेरुने तपासला नसतो! तेवढ्यात टॉमीसाहेब येउन स्टेटस बघतो आणि भडकतो, वाघ्याला विचारतो, शेरुचा काही निरोप ? का नाही तपासला एकपण हाडफोटो त्याने?
वाघ्या जरा चरकतो, त्याला माहिती असते शेरु कामचुकार नाही आणि तो जाणूनबुजुन असे करायचा नाही, दुसऱ्या एखाद्या कामाच्या गडबडीत नेमका त्याने हा मेल वाचलाच नसेल; पण वर्षाच्या शेवटचे दिवस आहेत व ह्या घटनेचा शेरुच्या पगारवाढीवर परिणाम होउ शकेल - तसे नको व्हायला !
वाघ्या बिनधास्त थाप मारतो साहेबाला -
"टॉमी,
bonephotos were transferred via Bonesoft proprietary MarrowTrans software, but the photos were marked with wrong MT version which was not compatible with current vesrion of MarrowTrans hence bonephotos got corrupted - Sheru has already engaged MT team to fix latest version meanwhile he recovered the original photos and sent back to me"
वाघ्याच्या अपेक्षेप्रमाणे टॉमीला तांत्रिक भाषेतले ओ की ठो कळाले नाही पण शेरुची चूक नव्हती एवढे उमजले.
सगळी भानगड संपली आणि आपण शेरुला संकटातून वाचवले असे वाघ्याला वाटते व तो उरलेले काम संपवतो. वाघ्या खुष, शेरु खुष, टॉम्यापण खुष. दिवसाखेरिस वाघ्या आणि टॉमीसाहेब हसतखेळत घरी जाणार तेवढ्यात शेरुचा मेल येतो - "टॉमी, काल माझा छोटासा अपघात झाल्याने कामाला येउ शकलो नाही, गडबडीत तुम्हाला निरोप पण देता आला नाही" - CC वाघ्या.
टॉमीसाहेब वाघ्याकडे फक्त एक कटाक्ष टाकतात. वर्षाच्या शेवटी, शेरुला १५ टक्के पगारवाढ मिळाली तर वाघ्याला १० टक्के.
तात्पर्य
खोटे बोलण्याने एखाद्याचे चांगले होणार असेल तर खोटे अवश्य बोलावे पण त्या नादात स्वतःचे वाईट होत नाही ना ह्याचे भान ठेवावे.***
वि. सू.आमच्या गोष्टींना स्वतःचे असे समांतर विश्व असते[प्यारेलाल युनिव्हर्स] त्यात कायबी घडू शकते [उदा. उद्या कुत्रा हा जंगलाचा राजा असेल आणि वाघ, सिंह पाळीव प्राणी]
पण तात्पर्य चांगले असेल हे नक्की.
***
#अर्धा डझन गोष्टी :Sमाझ्या इतर सर्व संकल्पांप्रमाणेच एखादी गोष्ट लिहून झाल्यावर माझी ही येडेगिरी बंद होइल असा ठाम विश्वास आहे. ३-४ महिन्यापूर्वी टोलेकिनच्या ‘Lord of the ring’ टाईप आपणपण एक ५-६ खंडांचे काल्पनिक पुराण रचावे असे मनात आले होते आणि तर्राट २० पाने खरडली, आज त्यातले एक पान सापडले तरी शप्पथ.
*
5 comments:
ajun lihi re!
बडबड बाष्कळ नाहीए हो!
laiiiiiiiii bhaari rav management kaay kart hech phkt! :)
bhavaaaaaa phone bin kahitari vaaprayach naa vaagyane
chan gosht ahe.tatpary ghenya sarkhe ahe
Post a Comment