Friday, December 12, 2008

आवडते शब्द

कोलबेर रिपोर्ट पाहत होतो, नेहमीप्रमाणे त्याने ‘Today's Word’ भाग दाखवला. कार्यक्रम संपल्यावर मला उगाचच माझे आवडते पण मी सध्या फार क्वचित वापरतो असे सगळे मराठी शब्द आठवायला लागले.
सगळे उतरवून काढतो इथे, न वापरता हळू हळू विस्मरणात गेले तर रेकॉर्ड असावे - की बाबा हा शब्द आपल्याला आवडत होता आणि आपण निष्काळजीपणाने त्याचा वापर थांबवला !
सगळे शब्द काही लगेच आठवायचे नाहीत पण शिव्या सोडून सध्या जेवढे आठवतात ते सर्व उतरवतो [आवडती एकपण शिवी नाही विसरायचो मी त्यामुळे त्या आघाडीची चिंता नाही]

घनतारडा - फालतु, छपरी, रद्दड

उंदिरतोंड्या - मराठीतले टारझन वाचले होते, त्यात सही शब्द होते एक एक, उंदिरतोंड्या मात्र मनात घर करुन राहिला
लिबलिबीत - नारायण धारपांच्या गोष्टीत पहिल्यांदा वाचला होता हा शब्द तेव्हापासून फिदा आहे मी याच्यावर















अगडबंबकुपीअलबतखलबतपटांगण
इमारतकुटिरोद्योगआगगाडीमाळानिर्मनुष्य
अंगरखापुस्तीअंकगणितवळकटीनिलाजरा
आचरटउकिरडानिजणेउरफाटाकानफाट्या
घोटिवगोंदकफल्लकगोमकालामेकुड

बास लय झाले, ह्याच्याहून जास्त फालतूपणा केला तर वैतागून गुगल बंदी घालेल माझ्या ब्लॉगवर.

***
नावडते शब्द लिहिले नाही तर त्यांच्यावर अन्याय होईल, पण ‘बिलकूल’ सोडून एकपण नावडता शब्द आठवत नाहीये - बिलकूल काय शब्द आहे का, यक्क...

***

4 comments:

Chinmay 'भारद्वाज' said...

"क्षीण" लोकांच्या हिशोबानी या शिव्या असतील पण नागपूरी (प्रमुखतः पूर्व नागपूरी) भाषेत या शब्दांना चांगल्याच अर्थाने वापरतात!

"सन्नाट्या"

"बोवार्‍या"

"भाकर्‍या"

"बावन बावन" करणे

("ए सन्नाट्या असा काऊन बावन बावन करून राहिला तू?")

यातील एकाही शब्दाला समानार्थी शब्द नाही. त्यामूळे याचे अर्थ समजावुन सांगणे कठिण आहे.

मुंबईकरांच्या तोंडून " ढकन्या" आणि "बोटचेप्या" शब्द ऐकलाय. पण बोटचेप्या म्हणजे नेमक काय हे माहिती नाही.

मला स्वतःला "ढेकुण" शब्द फार आवडतो. मागल्या वर्षी ज्या घरात रहात होतो तेथे या मित्रांनी माझी फार काळजी घेतली होती!

असल्या प्रचंड अर्थ असलेल्या निरर्थक शब्दांची यादी प्रांतांनुसार करायल हवी.

Tulip said...

lol.. a very interesting post! mi suddha athawun pahatey magaspasun ase barech shabd:P.

'bavan bavan' mhanje nakki kay pan? bavalatpana karane/gondhal karane/agavupana karane? kahitari javalacha meaning aslech na. majeshir term ahe baki hi. bavan bavan:)))

ऋयाम said...

>उंदिरतोंड्या - मराठीतले टारझन वाचले होते
mi pan wachalay मराठीतले टारझन 365 wela. pan wisaralo hoto ha shabd. dhanyawaad. ; )

tyatach parat "HABASHI" hote. te parat kuthech nahi wachale...

आल्हाद said...

chinmay .. ते बोवार्‍या नाहीये .. बोआर्‍या आहे ..