Monday, December 22, 2008

संपले Boston Legal

संपले Boston Legal

फार फार वाईट्ट म्हणजे..ट ला ट ला ट असे हजारो ट, वाईट वाटले. हा शेवटचा सीझन असेल असे आधीच सांगितल्याने मी ते मनात ठेवूनच पाहत होतो - बहुतेक केलीने पण ते मनात ठेवूनच यावेळचे विषय निवडले होते, एकसुध्दा भारी विषय सोडला नाही - सिगारेट कंपन्या, औषध कंपन्या, खाजगी तुरुंग सगळ्यांना धारेवर धरले, आणि नेहमीच्य स्टाईलमधे ऍलनने a-z सगळे खटले जिंकले. शेवटचा भाग तर अफलातूनच होता.

श्या, यावर काय लिहायचे अजुन, कुणी कान पकडला नाहिये लिहीच म्हणून पण ४ शब्द अर्पण वगैरे करायची भावना आहे मनात.
विनोद, सद्यपरिस्थिती, सत्यपरिस्थिती, आणि साहजिकता यांचा सुरेख मिलाप आहे यात [आयला हे फारच अलंकारिक होते आहे यार] मनात साहजिकपणे ज्या गोष्टी येतात पण उघड बोलू शकत नाही त्या तर झाडून सगळ्या असायच्या ऍलन शोअरच्या क्लोजिंग्जमधे - जावूदे झेपत नाहीये याच्यावर लिहिणे
.

फार मस्त मालिका होती, तिला एकुणच cynical look होता, प्रचंड विनोदी व अर्थपूर्ण होती ती आणि ती संपली - मला वाईट वाटले, खल्लास्स्स, गेम ओव्हर.

कधी कधी प्रचंड confuse होतो मी - मला ‘ऍलन शोअर’ व्यक्तिरेखा जास्त आवडते का ‘जॉर्ज कस्टॅंझा’? गारंबीच्या बापूमधला बापू जास्त आवडतो का राधा या प्रश्नाएवढाच जटिल आहे हा प्रश्न.
***
कुणी सांगितली आहे तुलना करायला - आम्ही करणार, काय म्हणणे आहे?

***

1 comment:

Meghana Bhuskute said...

कसला खतरनाक ब्लॉग आहे रे बाबा! तुझा कंटाळ्याचा ब्लॉग वाचला होता, तेव्हा हा का नाही वाचला काय माहीत. गाजरवाणे प्रकार, गांगुलीची वही, रीफील संपली, आज्जीबाई, शेतकरी, जिम मॉरिसन... खतरनाक. सॉलिड धमाल आली वाचून. एकदम मस्त लिहितोस तू.