आता, नावच बाष्कळ बडबड असल्याने, हा ब्लॉग का सुरु केला वगैरे जास्त काही टीपी लिहीण्यात अर्थ नाही.मला ओळखणाऱ्या ९० ट्क्के लोकान्च्या मते [त्यात आमचे पालक आघाडीवर] मी फ़ालतू बडबड फ़ार करतो... फ़ालतू असले तरी काय झाले, माझ्या मते हे अमूल्य विचार लिहीणे आवश्यक आहे. मोठया माणसान्चे असेच असते हो - ते एकदम वेळेच्या पुढे असतात. वर्तमानाला नाही, भविष्याला त्यान्ची कींमत कळते.
कंटाळादर्शन
-
या जगात, फक्त आणि फक्त कंटाळाच(if and only if, iff, फक्तक्त) सेक्यूलर आणि
सर्वसमावेशक आहे.
हिंदू, मुस्लिम, सीख, इसाई,
कंटाळ्यात फरक नाई.
डावे, उजवे, अधले...
4 comments:
एक्दम सही ब्लॉग चाललाय. पहिल्यांदाच वाचला आणि आता रिव्हर्स घेत इथे आले. लिखते रहो.
प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद :)...बघतो माझा सुरुवातीचा उत्साह किती काळ टिकतो ते !
सगळ्याच ब्लॉग च्या बाबतीत हे असच होतंय .. रीव्हर्स गिअर :)
पण एक नंबर लिहिलय !!
अरे दादा..
माझेही असेच होते रे.
सगळ्यात दुखद गोष्ट अशी की माझे PJ झेपताच नाहीत लोकाना. पण तीच लोक फालतू जोक्स वर फिदी फिदी हसतात साले.
कधी कधी वाटते आयला उगाच जास्त डोके चालते आपले.. तुझ्यासारखे.
मज्जा येते यार तुझी बाष्कळ बडबड वाचताना..
Post a Comment