Wednesday, November 19, 2008

...

सकाळपासून डिप पर्पलच्या ‘Perfect Strangers’ गाण्याने डोक्याचा भुगा केला होता. झोपेतून पूर्ण जागा व्हायच्या आधीपासून जवळजवळ तासभर गाणे डोक्यात वाजायला लागले होते. असली परिस्थिती सगळ्यात वाईट राव, एक तर झोप पूर्ण झाली नसते, मेंदूचा निम्मा भाग गाणे वाजवण्यात व्यस्त असतो उर्वरित भाग ते बंद करुन झोपण्याचा प्रयत्न करत असतो. शेवट एकदा उठून ते लावले तेव्हा कुठे जिवाला शांती मिळाली.
एक तर ह्या गाण्याच्या ओळी असल्या तूफान आहेत...

And if you hear me talking on the wind
You’ve got to understand
We must remain Perfect strangers...

डिप पर्पल रॉक्स यार...

दिवसभर मनात बॅकग्रॉउंड्ला हे गाणे सतत चालूच होते - आज कळाले पार्श्वगायन शब्द कसा आला असावा.
वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल कोर्टात उभा होतो तेव्हा पण हेच गुणगुणत होतो, जज्ज बाईपण म्हणाल्या - ‘Young man, if you have any concerns, open up, don't murmur’
मग जरा चपापलो मी, पण त्या यंग म्हणाल्या तेव्हा जर बरे वाटले. उगाच नाही म्हणत लोक, अमेरिकेत माणसाची कदर होते म्हणून :)


***


2 comments:

अनिकेत भानु said...

कुत्र्या,

याहून मोठी complement मी तुला देऊ शकत नाही.
मी जर gay असतो, तर तुझ्यावर लाईन मारली असती.

Meghana Bhuskute said...

हिहिहिहिहिहिहिहिहिहिहिहि! अनिकेतची कमेण्ट कम कॉम्प्लिमेण्टपण जाम भारी आहे. कुत्र्या... कीप इट अप.