Friday, November 14, 2008

॥अजी म्यां गरूड पाहिला॥

आज साक्षात गरुड पाहिला तो पण ५-६ फूटाच्या अंतरावरुन !
दुपारी तळ्याजवळच्या बाकड्यावर बसून आम्ही एकमेकाच्या मॅनेजर्सची मापे काढत होतो. चॉकलेटी रंगाचे २,३ ससे पण चिल मारत होते जवळच. आमच्या मेंदूला काय कुठुन ट्रिगर मिळाला देव जाणे, तिघांच्या पण माना एकदम ऑटोमॅटीक सश्यांच्या दिशेला वळाल्या. २ ससे बोल्ट्च्या वेगाने पळत होते आणि उर्वरित एक ससा जिवाच्या आंकांताने पळत होता - गरुडाने थेट त्याच्या पाठीवर असले स्मूथ लॅंडिंग केले कि हा ससा(कै.) गेली चार वर्षे त्याच जागी पडिक आहे असे वाटावे.

ह्या असल्या प्राण्याला(पक्षी नाहीये तो, पंख असलेला प्राणी आहे) ते पण शिकार करताना लाईव्ह पहाणे म्हणजे काय यार...च्यायला, मेकॅनिक्स पहिल्या अटेम्प्टमधे सुटल्यावर पण एवढा भारावून गेलो नव्ह्तो मी.

त्याचे पाय तर आरामात माझ्या मनगटाएवढे असतील, चोच म्हणजे लिटरली धारदार आकडा, एकेका पंखात पन्नास एक चिमण्या सहज मावतील. वर बापाची बाग असल्यागत माजात होता.
एकुण हा ईयत्ता ५ वीतला निबंध होतोय याची कल्पना आहे मला पण cann't help, आख्खा दिवस काम नाही करु शकलो मी.

एकाची सुध्दा मोबाईल त्याच्याकडे रोखून फोटो काढायची हिंमत नाही झाली, तो ससा समोर दिसत होता अजून :S त्याला मनसोक्त बघून झाल्यावर गपगुमान जागेवर आलो आणि रोज मॅनेजर्सची मापे काढणे कसे अत्यावश्यक आहे ते कळाले.

चिऱ्याचा मॅनेजर म्हणाला, "अरे घ्यायचा की एक स्नॅप, गरुड भित्रे असतात"

***


3 comments:

Bhagyashree said...

aaishapath kahi tari kay.. garudalaa shikar kartana pahaycha?? :O :O
video kadhayla hava hotas!

अनिकेत भानु said...

नशीबवान आहेस बाबा...
मी एक पाल पाळलीय. ती लपून बसते आणि ट्यूबजवळ कीडा बसला की फाटकन येऊन खाते.
बाकी उंदीर पकडणारी मांजरही कधी दिसली नाही :(
तुला डायरेक्ट गरूडच!
सहीये!

Yawning Dog said...

व्हिडीओ नाहीये पण कंपनीतल्या विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की एका अमेरिकन पोराने खिडकीआडून max zoom मारुन त्याचा फोटो काढला आहे - तो फोटो मिळवण्याच्या मागे लागलो आहे मी आता, मिळाल्यावर ब्लॉग, ऑरकुट जिथे कुठे म्हणून फोटो टाकता येतात तिथे तात्काळ