‘Greetings, carbon-based bipeds!'- लायब्ररीतल्या जुन्या पुस्तकांच्या दुकानात, १ डॉलरमधे आर्थर क्लार्कचे निबंधांचे हे पुस्तक मिळाले आज. १ डॉलरमधे मी ‘कोथरुड परिसर’ची २०० पाने पण घेईन आणि इथे तर सर आर्थर सी क्लार्कचे ५०० पानी निबंध मिळाले. २००८ मधे प्रकाशित झाले नाही म्हणून जुने म्हणावे अशी कोरी करकरीत कॉपी आहे.
आल्यावर ४-५ निबंध चाळले, त्यातला एक अल्टिमेट होता. माणूस आणि मशिन्स ह्या नेहमीच्या विषयावरचा, काय फाडू लिहिले आहे पण. त्यातल्या एका कल्पनाविलासात ट्युरिंग थिअरीविषयी जाम इंटरेस्टिंग चर्चा केली आहे.
जे इंजिनियर नाहीत किंवा आमच्यासारखे छपरी इंजिनियर आहेत त्यांच्यासाठी हा ‘काढा’-
ट्युरिंग थिअरी, मशिन स्वतंत्र विचार करु शकते का नाही हे ठरवते. एक हुशार मानव आणि एक मशिन अप्रत्यक्ष संवाद साधतात, अप्रत्यक्ष म्हणजे बोलणे सोडून कसाही चॅट, चिठ्ठ्याचपाट्या, दुभाषी वाट्टेल ते. जर १०-१५ दिवसांनंतर माणसाला आपण मशिनशी बोलत होतो का दुसऱ्या माणसाशी हे सांगता आले नाही तर मशिन विचार करु शकते. (दि एंड ऑफ थिअरी ! असल्या अजून ४-५ टिपी थिअरीज शिकल्या की झालात कॉम्प्युटर इंजिनियर)
तर क्लार्कंनी लय भारी विश्लेषण केले आहे. त्यांचे म्हणणे आहे कि जेव्हा मशिन पूर्णपणे स्वतंत्र विचार करायला लागतील तेव्हा आपल्याला ही थिअरी टेस्ट करणेच अवघड होउन बसणारे कारण मशिनला प्रॉप्पर माहित असेल की ते विचार करु शकते पण माणूस मशिनला सरावला असेल, (माणूस+मशिन) हे प्रचंड कॉमन झाले असेल त्यामुळे बऱ्यापैकी हुशार माणूसपण ओळखू शकणार नाही आपण मशिनशी बोलतोय का, माणसाशी ते ! मॅट्रिक्समधल्याटाईप, पब्लिकला कळणार पण नाही काय चालू आहे आसपास
आता हे सर्व जर कुणाला अतिफालतू वाटले तर त्याला आमचे लिखाण कारणीभूत आहे - एक तर मूळ निबंधात सविस्तर चर्चा आहे आणि ती क्लार्कसाहेबांनी केली आहे.जरा अतिशयोक्ति आहे पण अगदीच अशक्य नाही, शिवाय क्लार्क यांचे असल्या भाकितांचे रेकॉर्ड लक्षात घेता हे खरे होण्याची दाट शक्यता आहे.
ह्या माणसाने ६० साली लिहिलेले अजून मला झेपत नाही म्हणजे मी महामंद का ते जरा प्रमाणाबाहेर हुशार?
आल्यावर ४-५ निबंध चाळले, त्यातला एक अल्टिमेट होता. माणूस आणि मशिन्स ह्या नेहमीच्या विषयावरचा, काय फाडू लिहिले आहे पण. त्यातल्या एका कल्पनाविलासात ट्युरिंग थिअरीविषयी जाम इंटरेस्टिंग चर्चा केली आहे.
जे इंजिनियर नाहीत किंवा आमच्यासारखे छपरी इंजिनियर आहेत त्यांच्यासाठी हा ‘काढा’-
ट्युरिंग थिअरी, मशिन स्वतंत्र विचार करु शकते का नाही हे ठरवते. एक हुशार मानव आणि एक मशिन अप्रत्यक्ष संवाद साधतात, अप्रत्यक्ष म्हणजे बोलणे सोडून कसाही चॅट, चिठ्ठ्याचपाट्या, दुभाषी वाट्टेल ते. जर १०-१५ दिवसांनंतर माणसाला आपण मशिनशी बोलत होतो का दुसऱ्या माणसाशी हे सांगता आले नाही तर मशिन विचार करु शकते. (दि एंड ऑफ थिअरी ! असल्या अजून ४-५ टिपी थिअरीज शिकल्या की झालात कॉम्प्युटर इंजिनियर)
तर क्लार्कंनी लय भारी विश्लेषण केले आहे. त्यांचे म्हणणे आहे कि जेव्हा मशिन पूर्णपणे स्वतंत्र विचार करायला लागतील तेव्हा आपल्याला ही थिअरी टेस्ट करणेच अवघड होउन बसणारे कारण मशिनला प्रॉप्पर माहित असेल की ते विचार करु शकते पण माणूस मशिनला सरावला असेल, (माणूस+मशिन) हे प्रचंड कॉमन झाले असेल त्यामुळे बऱ्यापैकी हुशार माणूसपण ओळखू शकणार नाही आपण मशिनशी बोलतोय का, माणसाशी ते ! मॅट्रिक्समधल्याटाईप, पब्लिकला कळणार पण नाही काय चालू आहे आसपास
आता हे सर्व जर कुणाला अतिफालतू वाटले तर त्याला आमचे लिखाण कारणीभूत आहे - एक तर मूळ निबंधात सविस्तर चर्चा आहे आणि ती क्लार्कसाहेबांनी केली आहे.जरा अतिशयोक्ति आहे पण अगदीच अशक्य नाही, शिवाय क्लार्क यांचे असल्या भाकितांचे रेकॉर्ड लक्षात घेता हे खरे होण्याची दाट शक्यता आहे.
ह्या माणसाने ६० साली लिहिलेले अजून मला झेपत नाही म्हणजे मी महामंद का ते जरा प्रमाणाबाहेर हुशार?
7 comments:
:)
या विषयावर उपक्रमवर
यंत्र आणि मानव या नावाने झालेली चर्चा आठवली.
अरे वा!
छान वाटला पोस्ट. वरच्या link मधली उपक्रम वरची चर्चापण वाचली. तू अनेकदा माझ्या जिव्हाळ्याच्या विषयांवर लिहीतोस रे!!!
तर मला असं वाटतं ---
सध्याचे computers ही नावाप्रमाणेच computational machines आहेत. कितीही मोठ्ठा डब्बा बनवला, तरी basically, तरी शेवटी तो एक ALU आणि clockच राहणार. त्यामुळे बेरजा-वजाबाक्या, आणि AND, NAND, OR, XOR इ.इ. हून जास्त
काही त्याला करता यायचं नाही.
आपल्याकडे हल्ली Decision Support Systems, Expert Systems, Inference engines वगैरे वगैरे असतात. मीही अगदी अलिकडेच credit default ची शक्यता काढण्यासाठी neural networks वापरून पाहिले होते. पण data mining किंवा इतर
कोणत्याही बाबतीत आपण मारे म्हटलं की artificial intelligence वापरलाय - तरी खरंच तो artificial intelligence असतो का? जरी समजा एक computer application स्वत:हून data मधून patterns शोधतंय, तरी त्याला intelligent कसं म्हणणार?
कारण त्यासाठी त्यामागचे regression वगैरे फंडे program करायला लागलेच ना!
ही computational machines आहेत, ती finite possibilities मधे जबराट perform करतील. बुद्धीबळाचंच घासलेलं उदाहरण घेऊ. Einstein बुद्धीमान होता अशी सर्वसाधारण समजूत आहे. पण एखादा राष्ट्रीय पातळीवरचा खेळाडूनेही त्याला कदाचित सहज
हरवलं असतं. बुद्धीबळात patterns, चाली वगैरे माहित असणं महत्वाचं. माझ्या मते बुद्धीबळात analytical ability पेक्षा स्मरणशक्तीच जास्त लागते.
तर सध्याच्या technology वरच आधारित एक खूप मोठा डब्बा आपण बनवू शकतो, ज्यात आपण बुद्धीबळाच्या पटावर शक्य असलेली प्रत्येक move साठवू. सध्याचे बुद्धीबळ खेळणारे programs असतात त्यात एक depth define केलेली असते. तेवढ्या
पुढल्या शक्य खेळ्या-प्रतिखेळ्यांचा विचार करून मग तो program निर्णय घेतो. आता असं यंत्र बनवणं, आज नाही तर उद्या नक्कीच शक्य आहे, की जे डावाच्या शेवटापर्यंतच्या सगळ्या शक्यतांचा विचार करेल. ह्या शक्यतांची संख्या खूप जास्त असेल, पण
त्या नक्कीच finite असतील. समजा हे यंत्र पांढरी प्यादी घेऊन खेळतंय, तर ते पटावर जे जे होऊ शकतं, त्या प्रत्येक गोष्टीचा विचार करून पहिली खेळी खेळेल.
Given a capable enough computer, which we shall soon build if Moore's law holds true, हे अगदी सहज शक्य आहे. पण एवढं लांब जायची गरज नाही. 3x3 फुल्लीगोळा आणि बुद्धीबळात qualitatively काय फरक आहे? 3x3 ऐवजी 8x8
चा पट आहे, आणि वेगवेगळ्या प्रकारे हलू शकणारी जास्त प्यादी आहेत बस. फुल्लीगोळा खेळताना सुरूवातीला आपल्याला सगळ्या शक्यता डोक्यात येत नाहीत, पण जरा सवयीने सगळं डोक्यात बसतं, आणि whether you win or I win merely
depends upon whether I go first or you go first. फुल्लीगोळ्यात कायम जिंकणारं यंत्र तू आणि मीसुद्धा 8086 वरही बनवू शकतो. आपलं यंत्र तीन वर्षाच्या पोराला सहज हरवेल, तरी त्याला झाट कोणी intelligent म्हणणार नाही. पुरेसा मोठा डब्बा असेल, तर बुद्धीबळ will be reduced to फुल्लीगोळा! मग deep blue किंवा त्याच्या पुढल्या versionला, त्यांनी जरी गॅरी कास्पारोव्हला हरवलं, तरी intelligent म्हणणं मूर्खपणा आहे!
Human mind is non-computational. त्यामुळे आपण अनेक गोष्टी करू शकतो ज्या computers करू शकत नाहीत. Emotions वगैरे मरून देत. पण can we build a theorem-proving machine? ४०० ते ५०० मधे एकाही संख्येचा घन येत नाही,
हे कदाचित एखादं computational machine सिद्ध करू शकतं, पण आपण असं एखादं यंत्र तयार करू शकतो का, की ज्याच्या पुढे नुसते त्रिकोण ठेवले, आणि काहीच सांगितलं नाही, तर ते trigonometry चे नियम स्वत:हून शोधून काढेल? आपल्या
computers च्या सध्याच्या computational आणि algorithmic approach मधे हे अशक्य आहे! Probably some day आपण अशी यंत्रे तयार करू, लोक भावना भावना करतात त्याही कदाचित ह्या machines ना असतील, but they will have to
be fundamentally different than today's computers. Internal combustion engine आणि gears वर चालणारं यंत्र intelligent असणं जेवढं अशक्य आहे, तेवढंच silicon transistors वर चालणारं यंत्र intelligent असणं अशक्य आहे.
अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे intelligence आणि consciousness मधला फरक. मला वाटतं की आपण जेव्हा artificial intelligence असं म्हणतो, तेव्हा बहुतेक वेळा आपण artificial consciousness बद्दल बोलत असतो. Intelligence आणि
consciousness च्या wikipedia definitions:
Intelligence (also called intellect) is an umbrella term used to describe a property of the mind that encompasses many related abilities, such as the capacities to reason, to plan, to solve problems, to think
abstractly, to comprehend ideas, to use language, and to learn.
Consciousness is a type of mental state, a way of perceiving, particularly the perception of a relationship between self and other. It has been described as a point of view, an I, or what Thomas Nagel called the
existence of "something that it is like" to be something.
Terminatorचं character कदाचित turing test मधे pass होईल. Terminator स्वत: independently निर्णय घ्यायला समर्थ आहे, आणि interaction मधे - अगदी बोलूनही तो माणूसच वाटेल. (अर्थात, गोळ्या खाऊन याला काही होत नाही म्हटल्यावर
पितळ उघडं पडेल ;) ). पण तरीही Skynet हुषार वाटतं, Terminator नाही. याऊलट I, robot मधे V.I.K.I. आणि Sonny दोघेही हुषार वाटतात, तर NS-5 गाढव वाटतात.
Terminator ला intelligence ची व्याख्या लागू पडते. Consciousness ची नाही. जर Terminator ला कुठलंच mission नसेल, तर तो गप्प बसून राहील. Skynet, V.I.K.I. आणि Sonny यांचं तसं नाही. ते काहीतरी करतील. त्यांना Asimov चे तीन
नियमही लागू नाहीत. They put themselves first. Consciousnessचं मूळ कुठंतरी self-interest मधे आहे. आपण माणसंच कधी कधी माणसासारखी स्वार्थी जात नाही असं वगैरे म्हणतो. Skynet, V.I.K.I. आणि Sonny सुद्धा स्वार्थीच आहेत. पण
ह्या स्वार्थीपणामुळेच आपण एवढे conscious आहोत, एवढा विचार करू शकतो.
आपल्याला artificial intelligence ची भिती वाटत नाही, artificial consciousness ची वाटते. माझ्या computer नं मी न शिकवता काहीतरी आकडेमोड करून मला trading strategies सांगितल्या, तर एवढी मोठी गोष्ट त्यानं केल्याची मला काही भिती
वाटणार नाही. पण जर उद्या माझा computer मला म्हणाला, की "आज कंटाळा आलाय रे...तू दारू बिरू पी आणि झोप. उद्या बघू." तर माझी जबर फाटेल. आपण असे computers बनवू शकतो का? How do we teach someone not to listen to you? How do we ask them to develop their own judgement and basis for decision-making? आजच्या computational technology मधे आपण साधा एक random number सुद्धा generate करू शकत नाही. आपले pseudo random number generating algorithms हे time-seed किंवा इतर कुठल्यातरी गोष्टीवरच अवलंबून असतात.
शेवटी, we are miles away from artificial intelligence, and light years away from artificial consciousness. सध्याची computer technology अशी आहे की ती वापरून artificial intelligence साध्य करणंही अशक्य आहे. Someday we might achieve artificial intelligence, but it will be with a technology that is fundamentally different from today's computers. जर कधीकाळी आपण artificial consciousness निर्माण करू शकलोच, तर त्यानंतर we'd not really care if the machines destroy us. कारण if we manage to figure out and create consciousness, we'd have figured out God in the process. नाहीतरी वेदांतात consciousness ची अखेरची पातळी मोक्षच म्हटली आहे ना...जर आपणच कधीकाळी consciousness तयार करू शकलो, तर देवाचंच ज्ञान झालं आपल्याला! मग यंत्र मारून टाकोत की काही होवो...काय फरक पडतो?
P.S.
1. माझ्यावर Roger Penrose चा खूप प्रभाव आहे.
2. I'm not a CompSci guy...so pardon any errors...
विदग्ध ह्या लिंकवरची चर्चा मस्त आहे, मराठी internet वर अश्या चर्चा होताते ते पाहून सही वाटते.
***
अनिकेत,
कमेंटवर परत कमेंट टाकणे विचित्र वाटते, पण who cares
आइन्स्टाईन आणि बोहर चे पण जिव्हाळ्याचे विषय सेमच होते की ;) आणि कॉम्प्युटरवाल्यांच्या पेकाटात घालेल अशी प्रतिक्रिया आहे त्यामुळे error birror जावूंद्याल हो
---
आता खाली काही मुद्देसूद नाही, आधी क्लार्क काय म्हणाले होते ते लिहीले होते पोस्ट मधे. आता मला काय वाटते ते लिहीतो, बरेचदा अशा
गोष्टी लिहीता लिहीता मी भरकटतो...त्यामुळे असंबध्द होईल अधे मधे... :)
मला तु पहिल्या ४-५ परिच्छेदात म्हणतोस ते १००% पटते. माझ्या मते की सध्याची सगळी intelligent मशिन्स म्हणजे एक तर बुध्दिबळ खेळणारी किंवा
rule based data mining करणारी softwares आहेत - in short, प्रचंड मोठ्या प्रमाणात कुठलातरी specific data घेवून
domain specific output देणारे प्रोग्रॅम्स - पण ह्याला कारण आहे माणसाचा ‘cut the crap' ऍपरोच. आपली वृत्ती अशी आहे की मला फालतू कामात वेळ घालवायचा नाही - म्हणूनच ते करायला आम्ही मशिन वापरणार. Programming languages चे evaluation पण ह्याच थिमने झाले - procedue, object मग आता service oriented.
काळाच्या ओघात आपण जाणूनबुजुन वा उत्सुकता म्हणून किंवा at one point गरज म्हणून wholesomely intelligent अशा
मशिनची developmenet सिरियसली सुरु करु. क्लार्क यांचे म्हणणे आहे, ३-४०० वर्षांनी external electronic accessories जवळजवळ नाहीश्या होतील. आपल्या शरीरातच आपण हे सर्व implant करु. हे मला बरोबर वाटते - मनुष्याच्या जन्माबरोबरच त्याच्या शरीरात मशिन्स implant केली
जातील आणि ती मनुष्याबरोबर मोठी होत जातील , त्याच्या/तिच्या प्रत्येक अनुभवात ते सहभागी होतील, प्रत्येक विचार register करुन ठेवतील etc etc.
काही प्रमाणात त्यांच्यामधे आपले character उतरेल आणि मग आपण काही trivial tasks साठी त्याना आपला substitute म्हणून
seamlessly वापरू.
E.g. मी कुठल्याश्या conf. bridge वर आहे आणि मला आवडती मुलगी gtalk वर online दिसली तर मी आपोआप bridge वर बडबड
करण्याचे काम मशिनकडे सोपवीन आणि मी तिला ping मारुन चॅट्वर concentrate करीन. आता bridge वर किती actual माणसे कामे करत
आहेत आणि किती जणांचे machine substitues आहेत ते आळखणे कठिण होईल, शिवाय मी पण चॅट्वर खरच मुलीशी बोलतोय का तिच्या machine
substitue शी तेपण कळायला मार्ग नाही ! एकुणच turing theory चा सगळा गोपालकाला होईल.
अर्थात, हे वर्तमान आणि भविष्य यांचे एकत्रित उदाहरण झाले त्यामुळे ह्याला जास्त काही weightage देता येणार नाही - पण fictional secene
आवडला त्यामुळे राहवले नाही :)
*
हे तर मला एकदम पटले :))))
"आपल्याला artificial intelligence ची भिती वाटत नाही, artificial consciousness ची वाटते............तर माझी जबर फाटेल "
मेंदुच्या तोडीस तोड machine बनवायला आपल्याकडे पुरेसे raw material - memory, processing power, size असेल तेसुध्दा
नजिकच्या भविष्यात, ह्याबाबत दुमत नसणारच.
पण consciousness आणि emotions शिवाय ह्या सगळ्यालाच काही अर्थ नाही, आपण machine मधे consciousness आणि
emotions टाकू शकू का ह्याच्यावर यं वर्ष वाद घालता येइल.
Scientifically prove वगैरे करणे अवघड आहे आणि वाटते पण खरोखर बाष्कळ - पण माझ्या मते आपल्याला हे जमायला पाहिजे, एक दिवस आपण
conscious machines बनवू शकू.
आपल्या emotions म्हणजे काय आहेत शेवटी - मला असे वाटते, तसे वाटते, हे आवडते ते आवडते. आपण
कायम असे समजतो की, सर्व माहित असूनही चुका करु
शकणे, त्याच त्याच चुका करणे, unpredictable असु शकणे, intuition आणि instinct असणे, हे सगळे human consciousness चे USPs आहेत. पण आपण जेव्हाही असे करतो तेव्हासुध्दा त्याच्यामागे काहीतरी कारणे असतातच. Joker ला total psycho म्हणले तरी त्याच्या भूतकाळात घडलेल्या घटनांमुळॆ तो झाला psycho. आता तो काही कृती करतो तेव्हा ती unreasonalble वाटते पण ती त्याच्या past environment च्या नुसार reasonable आहे. त्यातही pattern आहेच, तो शहाण्या माणसारखा नाही वागू शकत, कायम तिरकीच चाल.
जेव्हा मला एखादि गोष्ट वाटते तेव्हा ति ‘वाटते’ याचा ट्रिगर १०० टक्के मागच्या एका गोष्टीत असतो. लहानपणापासून आपले वाटणे, त्याच्यावर आजूबाजूच्या प्रतिक्रिया, त्यांच्यावर प्रति-प्रतिक्रिया
ह्या साखळीतून मला नंतर कधीतरी काय वाटावे ह्याचा उगम होतो
. Finally our emotions/consciousness is a function of parents' genes, visible/audible events, past experience and environment
. कुठल्यातरी एका पिक्चरमधे भारी वाक्य होते - "I hate that you can predict me even when I decide to be unpredictable"
शिवाय आपण तरी खरोखरच स्वतंत्र विचाराचे आहोत का नाही देव जाणे, का आपण पण huge data crunching multi-functional organic module आहोत?
असो, इन शॉर्ट माझे म्हणणे, consciousness machines बनवणे is possible, कदाचित पोरेबाळे जन्माला घालतो तेव्हा आपण consciousness machine लाच जन्म देत असतो.
तुझे शेवटचे वाक्य पण १०० टक्के पटले -
"Someday we might achieve.........मग यंत्र मारून टाकोत की काही होवो...काय फरक पडतो?".
Exactly, काय फरक पडतो if machines take over. शिवाय आपण मशिन्स म्हणतो म्हणून ती मशिन्स, खरेतर they'll be just another species which survived. कदाचित मशिन्स नंतर आपल्याला देव म्हणून पूजतील !
जरा जास्तच बडबड झाली, हे असले विषय न संपणारे आहेत राव.
saheb aapla mail id dyaach aata.
आज एक एक पोस्ट वाचत मागे मागे येत आहे. ही चर्चा महा भयन्कर हुशार माणसांनी केलेली आहे. राहवत नाहीये comment टाकल्यावाचुन.
अनिकेत, भन्नाट analysis.
YD, शेवटचा point, "शिवाय आपण तरी ....module आहोत? " is amazing. हा viewpoint म्हणजे ज्याने already 'artificial concious' machines तयार केलेली आहेत त्या producer ला एइकु गेला तर त्याला सुद्धा exactly तशीच भिती वाटेल. or maybe this is a view point of an alien or someone who is already studying as intelligent machines from somewhere in the universe....
I am still amazed at the depth of this discussion.
aniket, can I get the url of your blog?
Ho Sonal, shevatachya pointvarchya tuzya matashee 100% agree !
*
Aniket lihit nahee blog ata, delete kela lekachyane :(
Post a Comment