Monday, November 10, 2008

गाजरवाणे प्रकार

फक्त मिथुन, बाळकृष्णा किंवा रजनीकांतच महाफालतु स्टंट्स करतात असे समजण्याचे कारण नाही...

"shoot'em up" पिक्चर पहा - त्यात हिरो सदैव गाजर खात असतो, प्रत्येक मारामारीच्या सीन मधे न चुकता गाजराचा वापर करतो, त्याच्या अंधाऱ्या घरात गाजराचे छोटेसे शेत पण आहे, "गाजरची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली" ही म्हण जगतोय तो अक्षरश:
एका दृष्यात तर हाईट आहे - हिरोच्या हातातून पिस्तूल पडते आणि गुंड त्याच्यावर एकदम जवळून पिस्तूल रोखतो...आपल्या हिरोने काय करावे - गुंडाच्या तोंडात तो आडवे गाजर घालून जोरदार दणका देतो...गाजर गुंडाच्या तोंडातून आरपार जावून डोक्याच्या मागून बाहेर !

मला तर वाटते, डायरेक्टरने नेत्रविकार होउ नयेत म्हणून गाजराला नवस बोलला असावा, तसे असेल तर गाजरच्या वतीने मी सांगतो, त्यालाच काय त्याच्या पुढच्या ७ पिढ्यांना कधीही दूरचा नंबर पण लागणार नाही।

shoot'em up मधले ए टू झेड सगळे गाजरवाणे प्रकार:
http://www.youtube.com/watch?v=hbeiQaISGA4

4 comments:

Bhagyashree said...

gajarwane prakar!! :)))

nuktach sapdlay ha blog.. hastiy nusti! :) sahi blog!

Deepak said...

सही....
मला अजुन एक नमुना सापडलाय... http://ishare.rediff.com/filevideo.php?id=116558
तसा हा रजनी आणि मिथुनदांचा गुरु शोभेल... ना?

भुंगा...

Yawning Dog said...

हा हा, ह्या लिंकवरचा व्हिडिओ पण अचाट आहे !

veerendra said...

अहो तुमच्या या पोस्ट्ने चाळवून मि हा पिच्चर पाहिला ! फार भन्नाट नाही म्हणणार पण हॉलीवूड च्या मानाने विचित्र आहे ! एकदा डोक व वेळ बाजूला काढून [एकट्याने (A)] पहाच !