फार फार वाईट्ट म्हणजे..ट ला ट ला ट असे हजारो ट, वाईट वाटले. हा शेवटचा सीझन असेल असे आधीच सांगितल्याने मी ते मनात ठेवूनच पाहत होतो - बहुतेक केलीने पण ते मनात ठेवूनच यावेळचे विषय निवडले होते, एकसुध्दा भारी विषय सोडला नाही - सिगारेट कंपन्या, औषध कंपन्या, खाजगी तुरुंग सगळ्यांना धारेवर धरले, आणि नेहमीच्य स्टाईलमधे ऍलनने a-z सगळे खटले जिंकले. शेवटचा भाग तर अफलातूनच होता.
श्या, यावर काय लिहायचे अजुन, कुणी कान पकडला नाहिये लिहीच म्हणून पण ४ शब्द अर्पण वगैरे करायची भावना आहे मनात.
विनोद, सद्यपरिस्थिती, सत्यपरिस्थिती, आणि साहजिकता यांचा सुरेख मिलाप आहे यात [आयला हे फारच अलंकारिक होते आहे यार] मनात साहजिकपणे ज्या गोष्टी येतात पण उघड बोलू शकत नाही त्या तर झाडून सगळ्या असायच्या ऍलन शोअरच्या क्लोजिंग्जमधे - जावूदे झेपत नाहीये याच्यावर लिहिणे
.
फार मस्त मालिका होती, तिला एकुणच cynical look होता, प्रचंड विनोदी व अर्थपूर्ण होती ती आणि ती संपली - मला वाईट वाटले, खल्लास्स्स, गेम ओव्हर.
कधी कधी प्रचंड confuse होतो मी - मला ‘ऍलन शोअर’ व्यक्तिरेखा जास्त आवडते का ‘जॉर्ज कस्टॅंझा’? गारंबीच्या बापूमधला बापू जास्त आवडतो का राधा या प्रश्नाएवढाच जटिल आहे हा प्रश्न.
***
कुणी सांगितली आहे तुलना करायला - आम्ही करणार, काय म्हणणे आहे?
***