Sunday, July 25, 2010

Some lyrics died today, at least fatally wounded


दाढीवाला हॅरीसन...
I look at you all, see the love there that's sleeping
While my guitar gently weeps
या दोन ओळी ऐकल्यावर आपल्याला वाटते अग्गाई काय आर्त गाणे आहे, मग पुढची ओळ येते -
I look at the floor and I see it need sweeping

खल्लास. असला भंपकपणा करतात मेनस्ट्रीम रॉकवाले मधेच. वरील वाक्यातूनही तसा चांगला अर्थ निघू शकतो काढायचा झाल्यास पण सिरीयसनेस गेला की गेलाच. पिंक फ्लॉईड, डीप पर्पल, हू (कधी कधी बिटल्स) सारखे मोजके ग्रुप सोडता बाकी कुणाचे नाव घेतल्यास त्यांचे प्रसिद्ध गिटार सोलोज किंवा ट्यून्स आठवतात , कधी एखाद्या गाण्याचे बोल नाही आठवत.
पण अमेरीकन कंट्री आणि फोक संगीतकारांचे तसं नाही. त्यांची गाणी खणखणीत असतात. सुंदर गाणी, दमदार आवाज असा की आपल्या पोवाड्यांची आठवण यावी.
जॉनी कॅशचे "When the man comes around" ऐका एकदा. बाकी किथ अर्बन, ब्रॅड पेस्ली वगैरे आहेतच.

बॉब डिलनने एलेक्ट्रिक गिटार, ख्रिश्चन गाणी वगैरे प्रकार केले असले तरी तो कंट्री/फोक संगीतकार म्हणूनच ओळखला जातो.(आम्ही त्याला तसे ओळखतो, बाकीचे तसे ओळखत नसले तर गेले उडत).
बहुसंख्यांनी त्याला कवी मानले आहेच. श्रीलंकन पाठ्यपुस्तक समितीला तर त्याची महती इतकी पटली की शेक्सपिअरचा धडा काढून त्याऐवजी डिलनचे गाणे टाकले त्यांनी इंग्लिश पुस्तकात.
मेघनाने खो दिला तेव्हा, डोक्यात पहिले गाणे आले ते म्हणजे "Blowin' in the wind" आणि घात झाला, सेन मॅनने आधीच सुंदर अनुवाद केला. चांगल्या घरातला  मी असा एका क्षणात बेगाणा झालो.
मग एकापाठोपाठ एक डिलनची गाणी आठवली. Bear with me here, गाण्यांची जंत्री दिल्याशिवाय माझे समाधान होणार नाही.
"Tangled up in blues", "Mr. Tambourine Man", "Ballad of thin man", "All along the watchtower", "Hurricane", "Like a rolling stone", "Knocking on heaven's door", असंख्य, मी दमलो नाही पण जनता बोर व्हायची प्रमाणाबाहेर. ही गाणी आठवल्यावर त्यांचे अनुवाद करायचीपण अट आहे हे आठवले आणि मग सगळा पचका. डिलनच्या गाण्यांचे भाषांतर करणे मला झेपणारे नाही.
अशी गडबड झाल्याने माझ्याकडे माहेरी जाण्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून मी गपचूप आपल्या प्रिय लेड झेपलीनच्या गाण्याचा जुना रेडीमेड अनुवाद टाकायचे ठरविले.
‘खो’ला मान द्यायचा असल्याने पण त्याचवेळी आपल्या सुमार क्षमतेची पुरेपूर जाणही असल्याने उपाय हा की - अनुवाद पांढऱ्या शाईत.
वाचकांना विनंती आहे की -
१. त्यांनी प्रथम मूळ गाणे वाचावे, त्याने अस्टॉनीश/अचंबित व्हावे.
२. व्वा काय गाणे आहे ! असे म्हणावे.
३. नंतर रद्दी विकणे, कोडमधे कमेंट टाकणे असली कामे आटपून घ्या आणि मग अगदीच इच्छा झाली तर मी केलेला मराठी अनुवाद वाचा.(मजकून सिलेक्ट केल्यावर काळ्या शाईत दिसेल)
ही नम्रता नव्हे.


Down by the seaside (Page/Plant)

Down by the seaside.
See the boats go sailin'
Can the people hear,
What the little fish are sayin'

Oh, oh, people turned away. Oh, people turned away

Down in the city streets,
see all the folk go racin', racin'
No time left, to pass the time of day

People turned away. People turned away
So far away, so far away
See how they run, see how they run, see how they run, see how they run.

Do you still do the twist
Do you find you remember things that well
I wanna tell you... Some go twistin' every day
though sometimes it's awful hard to tell
Out in the country, hear the people singin'
Singin' 'bout their progress, knowin' where they're goin'

Oh, oh, oh, oh, people turned away
Yes, the people turned away

Sing loud for the sunshine,
pray hard for the rain
And show your love for Lady Nature.
And she will come back again
The people turned away
people turned awayदूर किनाऱ्यावरी, शीडे उभारली
नांगर उठवून, गलबते हाकरली,
कोणी ऐकता का, कुजबुज मासुळ्यांची
कोणी ऐकता का, हाक मासुळ्यांची

हरवलात तुम्ही सारे, विसरलात तुम्ही सारे

दूर त्या पेठांमध्ये अन्‌ गावठाण्यांत
बघा ते धावणारे, धाव धाव धावणारे
एकमेकाला गाठणारे, धाव धाव धावणारे

हरवलात तुम्ही सारे, विसरलात तुम्ही सारे

स्मरते का तुम्हाला, गोलगोल गिरकी
घेता का अजुनी, तशी स्वच्छंद गिरकी
नजर चुकवतात अजुनी काहीजण
आहे त्यांना अजुनी स्मरण
संकोचतात आणि लपवतात जरी
आहे त्यांना अजुन स्मरण

गाती गोडवे, प्रगतीचे सारे
गावोगावी जणू, चैतन्याचे झरे
प्रत्येकाला हवेत, बदलाचे वारे

हरवलात तुम्ही सारे, विसरलात तुम्ही सारे

गा सूर्यस्तोत्रे अन्‌ गा वर्षागान
करा सृष्टीदेवतेला प्रेमविनवणी
मिळेल अजुनही वरदान...

हरवलात तुम्ही सारे, विसरलात तुम्ही सारे*

डिलनची वाट लावल्याशिवाय राहवत नाहीये, नाहीतरी म्हातारंच झालयं लेकाचं.
डिलननेच लिहिलेले पण जॅनिस जॉप्लिनच्या आवाजात ऐकलेले गाणे आठवले. सरळसाधे, सरधोपट म्हणतात तसे गाणे आहे.  गाणे साधे असले तरी नेहमीप्रमाणे जनतेने त्याचे अनेक अर्थ लावले आहेत.


Dear landlord


Dear landlord
Please don’t put a price on my soul
My burden is heavy
My dreams are beyond control
When that steamboat whistle blows
I’m gonna give you all I got to give
And I do hope you receive it well
Dependin’ on the way you feel that you live

Dear landlord
Please heed these words that I speak
I know you’ve suffered much
But in this you are not so unique
All of us, at times, we might work too hard
To have it too fast and too much
And anyone can fill his life up
With things he can see but he just cannot touch

Dear landlord
Please don’t dismiss my case
I’m not about to argue
I’m not about to move to no other place
Now, each of us has his own special gift
And you know this was meant to be true
And if you don’t underestimate me
I won’t underestimate you
घरमालक, ओ मालक,
माझ्यावर वॉरंट नका हो काढू
डोईवर हीss जबाबदारी आणि
उराशी स्वप्न हीss भलीथोरली
आमची तऱ्हाच अशी निराळी,
खरं सांगतो -
फेडेन देणी ऐपतीनुसार
मारली एकदा बेल कंडक्टरने की
फेडेन देणी तुमच्यामाझ्या ऐपतीनुसार

घरमालक, ओ मालक,
नीट लक्ष देवून ऐका, माझं म्हणणं
तुमच्याही माहीतेयत अडीअडचणी आणि व्यथा
ऐकलेत तुम्ही उपसलेले कष्टाचे डोंगर
चालायचंच, चिक्कार ऐकल्यात अशा कथा
राबराब राबून सगळेच तर जमवतात माया
कोरड्या सुखात कितीसे ते समाधान?

घरमालक, ओ मालक,
रागावू नका आणि मला एकदम झटकू नका
भांडत नाही हो मी आणि पळूनही चाललो नाय
ज्याची त्याची दैवी देणगी, ज्याने त्याने ओळखावी
माझी लक्षणं तर केव्हापासनं तुम्हाला ठावूक
ठेवा विश्वास थोडासा या पोरावर
मीही ठेवीन खूपसारा तुम्हावर
*आता पिंक फ्लॉईड घेउ. घेउ म्हणजे घेवूच एकदम त्याला. पिंक फ्लॉईडच्या गाण्यांचे बोल जाम फिलॉसॉफिकल असतात. म्युझिक आणि शब्द दोन्ही मिळून गाण्याला स्वप्नील, मिस्टीक असे रंगरुप देण्यात हे लोक वाकबगार आहेत.(Green is the colour I like, Echos, Time). PF साठी गिल्मर, वॉटर आणि बॅरेट या तिघांनी गाणी लिहिली. पैकी सिद बॅरेट हा लगेच कटला. हा मनुष्य एक दुर्बोध आणि निराश, खिन्नटाईप व्यक्तिमत्व वाटायचा, तशीच त्याची गाणी. एक छोटंसं छान गाणं आहे त्याचे. काही लोकांचे म्हणणे आहे की हे गाणे म्हणजे त्याने स्वत:वर केलेली टीका आहे, काही लोक म्हणतात समाजावर केलेली कॉमेंट्री, काही जण म्हणतात कोकेनच्या अमलाखालील बडबड. मेज्जर Open to interpretation आहे हे गाणे. मी ऐकतो तेव्हा मला विदर्भातल्या आत्महत्यांचा प्रश्न आठवतो.
The Scarecrow

The black and green scarecrow as everyone knows
stood with a bird on his hat and swore
everywhere he didn't care
he stood in a field where barly grows
His head did no thinking, his arms didn't move
exept when the wind cut-a-pup and mice ran
around on the ground
he stood in a field where barley grows
The black and green scarecrow was sadder than me
but now he's resined to his fate 'cause life's not
unkind, he doesn't mind
he stood in a field where barley grows

बुजगावणं - आपलं नेहमीचं मळकट हिरवं
स्थितप्रज्ञासारखे शेतात राखण करत आहे,
डोक्यावर पाखंर बसलीयत !
कर्तव्यदक्ष बुजगावण्याला काय त्याची पर्वा?
बुजगावणं राखण करतयं

टळटळीत उन्हात ताठ
शाळूच्या शेतात आहे ते उभे,
हातापायाची हालचाल नाही
की डोक्यात काही खलबतं नाहीत
क्वचित वारा, कधी उंदीर खुडबुडे
तेव्हांच काय ते हेलकांडे
बुजगावणं राखण करतयं

शाळूच्या शेतातलं हे बुजगावणं
माझ्याहून जास्त उदास त्याच जीणं
पण हल्ली सवय झालीय त्याला
कुणालाही होईल
जीवन अगदीच काही क्रूर नाही
नशीबावर भरवसा ठेवून
बुजगावणं राखण करतयं
माझ्या शाळूच्या शेतात
*

आधी आपण विदर्भाचा संदर्भ दिलात मग शाळूच्या ऐवजी कापूस का नाही वापरला कवितेत? असे कुणी विचारु नका. आमच्या भागात कापूस होत नाही त्यामुळे त्याला आमच्या कवितेत (सध्या) स्थान नाही. लोकांचे देशीवाद, खान्देशीवाद असतात तसा आमचापण देशीवाद आहे हा.
**

भाषांतराच्या या प्रयत्नांवरून "Don't live a champagne life on beer income" ही म्हण आठवली. अंथरुण पाहून पाय पसरावे टाईप हो. हे मात्र मी काही मानलं नाही आज.
**

माझा खो विद्याधर (भिंतीवरला बाबा) आणि सोनल या दोघांना.

***