Wednesday, November 12, 2008

ब्रेक ऑन थ्रू

दिवसभर डोके फोडूनसुद्धा जर प्रोब्लेम सुटला नाही की संध्याकाळी घरी निघून येताना आईशप्पथ उदास वाटते - शेतकरी किंवा सावकार झालो असतो तर बरे झाले असते असे वाटते - एकदा चुकुन घरी असे बोललो होतो आणि शेतकऱ्यांची हेटाळणी करतोय म्हणून बाबा सुपर भडकले, उदास मनाचा निरुपद्रवी हुंकार समजून सांत्वन करणे वगैरे राहिले बाजूला !

अशा देवदास परिस्थितीमधे माणसाने "जिम मॉरिसन" ला ऐकावे. मूड चांगला होतो असे काही नाही, पण माझे तरी मन एकदम शांत होते. त्याचा आवाज, ऐकताना तो समोर उभा आहे आणि फक्त माझ्या एकट्यासाठी एवढ्या आर्ततेने गात आहे असे वाटते, हि कवितापण त्याने पूर्वी कधी लिहिली नव्हती आत्ताच हे शब्द पहिल्यांदा एकत्र आलेत असे वाटते. आज एकदाच, परत नाही ! जादुगाराच्या पुंगीचे सूर कसे सगळया मुलांना संमोहित करत गेले तसे त्याच्या कवितेमधले शब्द मला आपल्याकडे ओढतायत असे वाटते.(हो तो कविताच गातो, गाणी नाही)
'व्हेन द म्युझिक इज ओव्हर' च्या सुरुवातीला जेव्हा 'कम ऑन' म्हणून तो एक आवाज टाकतो तेव्हा किंवा 'दि एंड' संपल्यावर पूर्ण ब्लॅंक होतो मी. 'क्रिस्टल शिप' 'वेटिंग फॉर सन' 'शामन्स ब्ल्यूज' 'ब्रेक ऑन थ्रू' 'लाईट माय फायर' ऐकले की तर बास, सगळे अचानक निर्जीव झाले आहे असे वाटते, माझा आणि जगाचा संबंध संपतो.

जिम मॉरिसन च्या बाबतीत एक तर अप्रतिम किंवा महाफालतू - तळ्यात मळ्यात नाही. तो असंबध्द लिहितो, बेसूर गातो, कविता नसून ड्रग्जच्या नशेत खरडलेले शब्द आहेत असे समजणारे लोक तर पोत्याने मिळतील. प्रत्येक अन प्रत्येक ओळीचा अर्थ लावत, शब्दांची संगती लावत अन सूर पारखत बसतात आणि मग फडतूस आहेत म्हणतात.
फारच सेंटि झाले आहे हे सर्व

7 comments:

अनिकेत भानु said...

जिम मॉरिसन वैराग्य येतं जबरदस्त! ’फक्त माझ्या एकट्यासाठी एवढ्या आर्ततेने गात आहे असे वाटते" - अगदी अगदी. "असंबध्द लिहितो, बेसूर गातो, कविता नसून ड्रग्जच्या नशेत खरडलेले शब्द आहेत असे समजणारे लोक तर पोत्याने मिळतील" म्हणतात त्यांना थोडा शंकराचा प्रसाद देऊन बसवाव "The end" लावून. अकरा मिनिटाच्या शेवटी चांगलं का वाईट काहीच बोलणार नाहीत - चांगल्यावाईटाच्या पलीकडे गेले असतील.

Eddie Vedder आणि नुसरत फते अली खान चं "The long road" ऐकलंयस का - तेही जबर आहे. तू म्हणतोस त्या मूड मधलं माझं आवडतं.

मला स्वत:ला metal बिटल पेक्षा Doors, Floyd वगैरे psychadelic जास्त आवडतं...पण त्याहून जास्त blues आणि classic folk rock. Bob Dylan फार्फ्फार आवडतो...

ह्या विषयावर केवढंतरी लिहीण्यासारखं आहे. जाऊदे.

काही सेंटी बिंटी नाही...सॊल्लिड लिहीलंय.

-अनिकेत

Unknown said...

chhan lihlay...

jim morrison la mi eikla nahiye. ata gani eikavishi vattayt.

mage ekda raj ne hi tyachya the end var lihla hota.. http://rbk137.blogspot.com/2008/06/end.html

Yawning Dog said...

Thanks Aniket.
हो ना, 'the long road' पण out of the world आहे
Bob Dylan विषयी तर आपण पामर काय़ बोलणार...

Raj said...

खूपच मस्त वाटले पोस्ट वाचून. माझिया पंथाचा आणखी एक भेटला :) याबद्दल भाग्यश्रीचेही अनेक आभार.

जिम मॉरिसनची गाणी ऐकल्यावर मलाही असाच अनुभव (out of the world experience) येतो. आणि त्याचे नेमके कारण अजूनही सापडलेले नाही. शेवटचे म्हणणेही पटले. अशा गाण्यांचा अर्थ लावून किंवा समीक्षा करून त्यातला सर्व आनंद जाईल असे वाटते.

पोस्टचे पहिले वाक्य फारच आवडले. मलाही बरेचदा असेच वाटते, फरक इतकाच की मला म्याकडोनाल्डमध्ये काम करावेसे वाटते. :)

तू मस्त लिहीतोस, असेच लिखाण चालू ठेव!

Abhijit Bathe said...

YD - आज पहिल्यांदाच तुझा ब्लॉग वाचला. इथेच कमेंट लिहिण्याचं कारण म्हणजे - latest पासुन मागे जात इथपर्यंत आलो आणि मग परत oldest पासुन पुढे वाचत इथे पोचलोय. सही लिहितोस तु - keep it up. एवढ्या कमी शब्दांत एवढं इंटरेस्टिंग आणि consistently लिहिणं (ईमानदारीत) आपल्याला झेपत नाही. सही है बाप!

Yawning Dog said...

माझं जरा जास्तच कौतुक केलेस रे अभिजीत, एक्दम ‘कसचं कसचं’ म्हणावं इतके :)
बाकी तुझा ब्लॉग वाचला आणि दांडी गुल !
[खून का बदला खून म्हणून कौतुक नाही, मनापासून :)]

Dk said...

bole to jim bhai ko aiknaach pdenga
bhau tuza e mail id vagaire denaar ka? mine is kuldeep1312@gmail.com if possible add me on gtalk :)