Tuesday, March 24, 2009

हिरवळ

मुद्दा अतिशय गंभीर आहे. समाजाच्या सर्व थरातील लोकांना भेडसावणारा हा एक ज्वलंत सामाजिक आणि रासायनिक प्रश्न आहे. पण सामान्य लोकांमधे ‘हा एक महत्वाचा प्रश्न आहे ऍन्ड इट्स रिअली भेडसविंग अस’ अशी जाणीवच निर्माण झाली नाहिये मूळी.
मी ती करुन देणारे आज - आस्क नॉट वॉट समाज कॅन डू फॉर यु, आस्क वॉट यु कॅन डू फॉर समाज.

मुद्दा असा आहे की, आज बऱ्याचश्या बागांमधे हिरवळीवर बसू देत नाहीत. हिरवळीवर बसू नये, हिरवळीवर चेंडू खेळू नये अशा पाट्या लावल्या असतात आणि आमच्यासारखी जनता अशा बागांमधे तिकिट काढून जाते.
ह्याला काय अर्थ आहे? बागेत हिरवळीवर नाही बसायचे तर कुठे बसायचे? हिरवळीवरुन नाही पळायचे तर कशावरुन पळायचे?

हिरवळ खराब होते म्हणजे काय? रस्ते, छत्र्या, चपला काहीच वापरु नयेत मग. बाकड्यांवरच बसायचे असले तर आम्ही बस स्टँडवर जाउन बसु, शाळेत अजुन एक वर्ष नापास होउ.
नुसती छान हिरवळ बघुन काय करायचे आहे? ऍनिमल प्लॅनेट लावून घरी बघू हवी तेवढी.
हिरवळीवर कॅच कॅच खेळायचे नाही तर काय सिमेंटच्या रस्त्यांवर खेळायचे, आं?

आम्ही जास्त काही बोलणार नाही, आमचे काम झाले आहे. पुढचा विचार व कृती करणे समाजाच्या हातात आहे. पण लहानपणापासूनच सगळ्यांचा विचार करायची वृत्ती असल्याने सर्वसमावेशक असा उपाय पण सांगून ठेवतो -

बागेत असा एक भाग ठेवावा जिथे क्वालिटी हिरवळ असेल आणि तिला फक्त बघत बसावे लोकांनी.
दुसरा युजेबल भाग ठेवा जिथे आमच्यासारखे मनसोक्त धावतील, लोळतील, कोलांट्याउड्या खातील, एरवी घरी सोडतो ते झेल डाय(डाईव्ह) मारुन घेतील.
आत्ताच पैजेवर सांगतो, आमच्या भागात जास्त जनता असेल - एक दिवसपण आमच्या भागाचे पाप्युलेसन कमी असले तर...तर दुसऱ्या दिवशी जाउन शेपूट सरळ करुन यीन हां.
*
आज अचानक आठवायचे कारण म्हणजे उद्यानविषयक बडबड सुरु होती आणि ऑफिसमधल्या लोकांशी चर्चा करताना जाणवले की लोकांना याचे काहीच वाटत नाही, सगळ्या जणांनी गृहितच धरले आहे की हिरवळीवर बसायचे नसते. तेव्हा मी जनजागरण करायचे ठरवले आणि तडक इथे आलो. तडकफडक येताना एक शेरपण सुचला -

अगर कुचलते भी है हम,
तो कुचलते है अफसोससे

अरे ये चंद सिक्कोवाले बागबॉं क्या जाने
अरे ये चंद सिक्कोवाले बागबॉं क्या जाने

शगुफ्त है हरियाली,
मासूम मुस्कुराहटोंसे

फाजलीसाब की जय !
***

10 comments:

Sonal Waikul M.D.(Alt.Med.) said...

kasal mast lihitos re tu? tujhya 'kantalya' war tar mi fidach aahe. inspire howun mi suddha kantalyawar ek post takal majhya blogwar...itka contagious kantala aahe tujha. mastach.(sonalwaikul.wordpress.com / mi-sonal.blogspot.com)

Maithili said...

Kase kaay suchate re tula he sagale? atta mazi shabdanchi potadi kharech rikami hot chalaliye. chaan, sunder, sahee, mastch, dhammal vaigare lihoon kantaloon gele mi.
BTW tuze mat matr 100% patale han mala. ashi ek vegli hirval paahije jyavar khelata, dhavata yeyil.

Nile said...

Tumhi bhalatech gambhir disata mhanun ek upay suchavato, baag-wanana ek changle pustak gheun dya gavatavar, Mul problem ha chukiche gavat chukichya thikani lavlyane hot ahe. ;)

Unknown said...

पुण्यातल्या हिरवळीविषयी लिहिलयस कां? आमच्या मुंबईत खुशाल हिंडू देतात हिरवळीवर.

Unknown said...

पुण्यातल्या हिरवळीविषयी लिहिलयस कां? आमच्या मुंबईत खुशाल हिंडू देतात हिरवळीवर.

Bhagyashree said...

mastach! :)

punyathi hindu detat he tula mahitich asel.. fakt tithe hajaar patyaa astat, ani tithe koni laksh det nahi! :D :)

Yawning Dog said...

ho ho mitraho, amchya punyaat pan hindu detaat hiravaleevar...major taathavde udyanatlee nimmi hirval amchyach mitramandalini tudavalee ahe.

Me ameriket amachya gharajaval ahe tya udyanat patya pahilya anee excite zalo.

He pravrutee ugra roop dharan karu naye mhanun me adheech ,marathit pan lihun thevale ;)
***

Maithili - Thanks :)

NKA - "Mul problem ha chukiche gavat chukichya thikani lavlyane hot " ha ha ha saheech,m barobar ahe

deep: punyatlya hirvaleevar nahiye...var lihilyapramane amchya ithe eka baaget suru kele anee balach me generic karun lihile ahe

Bhagyashree - Baroabr ahe aplyakade detat hindu bindhast. me actually punyat pati pan nahee pahilee, lavlee taree kon vicharto tyana :D

Sagalyana thanks for comment :)

Bhitri Bhagu said...

कसं काय सुचतं तुला अश्या विषयावर लिहायला हा प्रश्न मला भेडसावत आहे. (रियली भेडसाविंग मी) :)
हे हिरवळीवर न बसू देण्याचं लोण पुण्यात पण आलं आहे बरं का! सिंहगड रोड वर पु. ल. देशपांडे उद्यानात हिरवाळीवर बसू देत नाहीत. या बागेला तिकिट पण आहे. खुप छान आहे बाग, मला हे मान्य आहे कि हिरवळीवर बसून काही खायला तुम्ही मनाई करा. पण बसू द्या ना!
एका खुप मोठ्या सामाजिक आणि रासायनिक प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल धन्यवाद.

सखी said...

क्वालिटी हिरवळ :) काय शब्द आहे!!!
आता बाग म्हटली की ती लोकांसाठी असत, त्यातही हे करु नका...ते करु नका. धन्य आहेत अगदी!

Dk said...

पुण्यातल्या हिरवळीविषयी लिहिलयस कां? आमच्या मुंबईत खुशाल हिंडू देतात हिरवळीवर> i la he mala maahiteech navhte. tu jaagtiik patliichyaa hirvalivar boltoys na? hehe