Thursday, May 28, 2009

टर्मिनेटर सॅल्व्हेशन

टर्मिनेटर सॅल्व्हेशन

प: "पुढची १५ मिनीटे, हे गाढव येणाऱ्या पिक्चरांच्या जाहिराती दाखवणार. आमच्यासारखे महागाढव त्या बघुन परत नवीन पिक्चरला येणार"

फ: "ईंग्लिश पिक्चरमधे मध्यांतर का नसते? नेहमीची कारणे नकोत - लांबी कमी असते, लिंक तुटता कामा नये"

ब्रुस विलीसच्यासरोगेटसपिक्चरची जाहिरात. फारच भारी जाहिरात एकुण.

प: "वॉचमनच्या वेळेस आपण वूल्व्हरीनची जाहिरात पाहिली, वूल्व्हरीन बघायला आलो तेव्हा टर्मिनेटरची पाहिली. आता टर्मिनेटरच्यावेळी सरोगेटस. धिस इज एंडलेस, थांबवले पाहिजे हे आपण"

फ: "काहीतरी कॉन्स्पिरसी थेअरी आहे याच्यामागे - आपल्याकडे मध्यांतर असते"

ब: प आणि फ, साल्यांनो, एकाने तरी हात काढा की खुर्चीच्या हॅंडरेस्टवरचा. सगळीकडे तेच, गाडीत, विमानात, थिएटरमधे. "handrests are supposed to be shared by passengers, आपापल्या हद्दीत हात ठेवला पाहिजे, तुम्ही लोक..."

प + फ: ओ मास्तर, चुकले आमचं. भाषण बंद करा पण.

प: पण सिरीयसली यार, आपण हे थांबवले पाहिजे, दर वेळेला नवीन प्रोमो, नवीन प्लॅन्स. पुढच्या वेळेला व्यवस्थित रीव्ह्यू बघूनच यायचे.

ब: वॉचमन, वूल्व्हरीन, टर्मिनेटर, सरोगेटस. एक लक्षात घेतलेस का आपण ग्राफिकल नॉव्हेल वरचे पिक्चर बघतो सगळे शक्यतो.

फ: ग्राफिकल नॉव्हेल म्हणजे काय?

टर्मि. सॅ.च्या पाट्या सुरु. ताठ बसतो.

प: गपा रे, पिक्चर सुरु होतोय.

फ: अरे येड्या, तु कशाला सावरुन बसलास? तुला काय पिक्चरमधे काम नाही करायचय आत्ता. शूटिंग झाले त्यांचे आधीच.

ब: हा, हा, हा. शूsssश... खरंच सुरु झाला आता.

प: डायरेक्टेड बाय McG.हा काय प्रकार आहे. फ नेटवर बघ, McG कोण आहे.

फ: आत्ता लगेच?

प: डेटा प्लॅन कशाला घेतलास मग मोबाईलवर?

ब: मोबाईलशी खुडबुड नको रे आत्ता, McG नाव आहे त्या डायरेक्टरचे. चार्लीज अँजेल्स वाला. शांत बसा आणि बघा.
**

आता महत्वाचे काहीतरी लिहायला पाहिजे, सीरीयस एकदम. झंडू बाम नको.
***

5 comments:

Raj said...

एक सुचवणी. स्टार ट्रेक पहावा, चित्ती संतोष निर्माण होईल असे वाटते. :)

अनामिक said...

चित्रपट सुरू होण्यापूर्वी होणारी नेहमीची निरर्थक बडबड आवडली!

Vidya Bhutkar said...

:-) तुझे पोस्ट वाचायला सही वाटतं, खूप जोरात नाही आलं तरी ओठावरची एक रेख हलते आणि हसू येतंच.
-विद्या.

Unknown said...

malahi nirarthak badbad awdli! :D

-भाग्यश्री

आल्हाद said...

अलका किंवा तत्सम थेटरात शेनिमा बघितलेला दिसतोय ..
सिटी प्राइड वगैरे ठिकाणी गेल्यावर सर्व प्रथम १७५ रुपडे कसे भरून काढायचे ह्याचाच विचार जास्त येतो .. :)