Wednesday, March 24, 2010

! . !

राज्यातील पोलिसांप्रमाणेच काही विरामचिह्नांवर पण ओव्हरताण आला आहे. विशेषत: चॅटींगफिटींग, ट्विटरफिटर, बझफझ, फेस्बुकफेस्बुक सुरु झाल्यापासून. 
आधी सगळ्या विरामचिह्नांचे उत्पादन सिंगलटन पॅटर्नमधे व्ह्यायचे. आता म्हणजे एका वट्ट्यात कमीत कमी चार तरी असतातच

पूर्वी -
उद्‍गारचिह्न.getInstance() काय परत करायचे
!
आता -
!!!!!!!!!!.
काही धरबंदच नाही.

me: Hi
xyz: Hi !!!!!!

म्हणजे एकावेळी शंभर ! वापरू नयेत असे नाही. तसेच प्रसंग असले तर वापरावेत. तसेच मीन्स त्या ग्रॅव्हिटीचे प्रसंग.

सेवक: देवकीचा आठवा मुलगा जिवंत आहे
कंस: काय? WTF !!!!!!!!!!
कंस: बातमी पक्की आहे का?
सेवक: हो महाराज.
कंस: dude, I'm totally screwed !!!!

अशावेळी ठीक आहे हो. रोजच्या हायबायला होलसेलमधे पन्नासदा !!!!! लिहीण्यात काय पॉईंट आहे?
आमचे एक निरीक्षण आहे की, असले प्रकार मुली जास्त करतात.

फ्लर्टींग टीप -
मुलगी: hi !!!
मुलगा: हाय हाय.
आजकाल ही टीप परीणामकारक आहे का नाही माहीत नाही. पूर्वी वापरायचो मी, सुरुवातीपासून मूड सेट करायला बरे जाते. (काहीच्या काही मवालीपणा आहे असे कुणाला वाटल्यास, जेनेरेशन गॅप आहे आपल्यात)

उद्‍गारवाचकचिह्न असे सुपरलोडेड अवस्थेत आहे तर तिकडे पूर्णविराम बेंचवर आहे. लोक देतच नाही पूर्णविराम. आयटीवाल्यांनी तर आपल्या कागदपत्रांमधे पूर्णविरामालाच पूर्णविराम देउन टाकला आहे. काल एक पन्नासपानी डॉक्युमेंट वाचले त्यात एकही पूर्णविराम नव्हता !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
एकेछप्पन मधून सोडल्यासारखे वाटते !
जनाची नाही मनाची म्हणून आख्खा निबंध संपल्यावर शेवटी तरी एक कॉमन टिंब टाकून द्यायचे की (मीठासारखे). वाचकांनी लागेल तसे शब्दानंतर, अक्षरांवर स्वत: टाकून घ्यावे. कटकट मिटली.
तर, एकही पूर्णविराम नव्हता. वाचून झाल्यावर मी डीप ईफेक्ट यावा म्हणून आढ्याकढे बघितले मग डोळे मिटले. ‘ती पन्नास पाने’ आणि ‘पूर्णविराम’ यांचे नाते, हे ‘महाराष्ट्र’ आणि ‘मराठी’ यांच्या नात्यापेक्षा काही वेगळे आहे का असा मनातल्या मनात खल केला आणि नंतर डोळे उघडून जोरात श्वास घेतला. विचार करत असतानापण मी एकेरी अवतरणचिह्नांसकटच विचार केला.

पूर्णविरामाची अशी उपेक्षा केली असताना याच डॉक्युमेंट्मधे एवढ्या आकृत्या होत्या की पार डॉक्युमेंट्‌री वाटावी. हव्या तिथे काढाव्यात की आकृत्या पण उगा दोन ओळीत समजेल त्यासाठी आकृती कशाला पाहिजे?
Step 3 - Customer provides his address details. पण नाही.
एक लंबवर्तुळ काढून त्यात मधे कस्टमर असे लिहायचे तिथून एक बाण जाणार एका चौकोनाकडे, त्या चौकोनात मधे ऍड्रेस डिटेल्स. बाणावर लिहिले आहे प्रोव्हाईडस. पुणे युनिव्हर्सिटीत ज्याने कुणी युएम्‌ल विषय सिलॅबसमधे टाकला त्याने असल्या आकृत्या पाहील्या तर जावून झाडाखाली रडत बसेल बिचारा.
फळा वापरणे, आकृत्या काढणे हे पक्के ठसले आहे सॉफ्टवेअर ईंजिनीअर लोकांच्या मनावर. "समजायला सोप्प जातं" हे एक आवडते वाक्य. बोंबला. सोप्प्या गोष्टीसुद्धा कशाला सोप्प्या करून सांगायला पाहिजेत.
एखाद्या वाक्यात आठपेक्षा जास्त शब्द असले आणि त्यात तीन टेक्निकल शब्द आले तर चोहूबाजूंनी आरोळ्या -
बोर्ड, बोर्ड
Use the board naa, it's easy that way
शो एन द डायग्रॅम रे.
या आकृत्या जीवशास्त्रात असल्या त्रास द्यायच्या. कसा मस्त सूड उगवतात लोक आता. भोग आहेत हो, काय करणार.

तांत्रिक माहितीवाली कागदपत्रे वाचणे कधीकधी मनोरंजक असते. आमच्या एका मित्राला कुठल्याही टेबलच्या कॉलमचे वर्णन लिहायचे म्हणजे घोर अपमान वाटायचा.
Why should I write the description? I'll create DB table, I'll create the column but description of the column? Give me a secretary then I'll give you detailed description. असे म्हणायचा तो कायम.
सेक्रेटरी मिळाली नाही पण वर्णनाशिवाय बिल्ड पास होईना तेव्हा त्याने एक सर्वसमावेशक सोल्यूशन तयार केले. नावाआधी ‘द’ लावायचा.
Column - Id
Description - The Id

असेच सुरू राहीले तर अजून पाचेक मिनीटांनी मी जावामधून जोक सांगेन एखादा.

लोकांचे चॅट्वरचे स्टेटस मेसेजेस हाही एक भारी विषय आहे. काही वाक्ये आठवून आठवून मला मधेच हसू येते. लोकं मनापासून काय काय लिहीतात त्याची चेष्टा करणे बरोबर नाही. पण कलियुग आहे हो.
"बास का?"
"महान"
"प्रेम, प्रेम, प्रेम...बस्स एकच शब्द"
"Don't run behind success...make it run behind you"
"I never lived so there's no question of leaving !!!!"
"हो मी वारा, मी पाऊस - अगं तारा, मीच तुझा मिकीमाउस"

बाकी महान लोकांची वाक्ये, फुटकळ विनोद, संदीप खरेच्या ओळी नियमित असतातच. कार्टूनमधल्या कॅरॅक्टरचे चित्र प्रोफाईल इमेज आणि त्याच्या तोंडची वाक्ये स्टेट्समधे टाकणारे महाभागही आहेत. मूळात सर्व कंपन्यांनी एकत्र येवून एक नियम केला पाहिजे की काय लिहावे तिथे आम्ही. कन्फ्यूजन आहे हो.
सुरुवातीला जेव्हा ही सोय झाली तेव्हा आम्ही लायब्ररीत जावून आईनस्टाईनची वाक्ये शोधून आणली होती. नंतर कळाले की आपल्याविषयी काहीतरी लिहायचे असते. त्याहीनंतर कळाले की आपल्या सध्याच्या अवस्थेविषयी काहीतरी लिहायचे असते. म्हणजे ‘मॅरीड विथ टू ब्यूटिफूल किडस’ नव्हे, मानसिक अवस्था.
तेव्हापासून वर्षभर मी पकलोय, Bored, च्यायला हेच स्टेटस मेसेजेस टाकायचो.

स्टेट्‌स मेसेज टीप:
कुठल्याही वाक्याला स्टेट्‌स मेसेज बनवायचे असल्यास त्याच्यानंतर तीन टींबे द्यावीत.
"Waiting for" हा स्टेट्‌स मेसेज नाही पण
"Waiting for..." हा आहे.
मंग लेका, लय आधीपासून माहीतेय आपल्याला.

चला, संमेलनानिमीत्त समारोप करु -
आज भाषा किती बदलते आहे. या जगात केवळ बदलच उनबदलेबल आहे. भाषेमुळे मनुष्यही बदलत आहे. हेच पाहा ना, २०१० साली केलेला एक अभ्यास असे दाखवितो की, पंधरा ते पस्तीस या वयोगटातील माणसे मनातल्या मनात हसायचे झाल्यास LOL म्हणतात. स्पृहणीय आहेत हे बदल, तुम्हीपण अंगीकारा, पण समतोल राखा, एकीकडे ! ला झिजेपर्यंत वापरायचे आणि पूर्णविरामाला वाळीत टाकायचे हे योग्य नाही. हे आम्ही विरामचिह्नांच्या भल्यासाठी नाही मानवजातीच्याच भल्यासाठीच सांगत आहोत. उदाहरणच द्यायचे झाले तर आज सारकॅजमचा वापर इतका पोचला आहे की, नुकतेच एका कंपनीने सारकॅजमच्या चिह्नाचे पेटंट घेतले. अधिक संशोधनाअंती असे लक्षात आले की एका इथिओपीन भाषेत सुरुवातीपासूनच हे चिह्न वापरले जायचे. यातून काय बोध घेता येईल? असे वापर विसरलात तर तुम्हालाच परत कष्ट करुन नव्याने जुन्या गोष्टी शोधायला लागतील. तेव्हा use them responsibly.

**

१. उदाहरण देण्यासाठी कंस या महाभारतकालीन राजाच्या नावाचा वापर करण्यात आला आहे. त्याचा गोल, चौकटी अथवा महिरपी कंसाशी कसलाही संबंध नाही. सार्धम्य वाटल्यास...योगायोग...!!!

***

38 comments:

Raj said...

LOL!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! masta re!!!!!!!!!!!!!!!!!

:D :D kans, purnaviram bench war lai bhari!

Anonymous said...

वा! फारच छान ब्लॉग आहे!
किंवा....वा!!!! फारच छान ब्लॉग आहे!!!!!!!
स्टेट्स मेसेजेस बद्दल तर अगदी बरोबर आहे तुमचं निरीक्षण!
आजच नवनवीन स्टेटस मेसेज टाकून कंटाळा आला म्हणून संदीपच्या गाण्याच्या ओळी सोडून दिल्या, "कंटाळ्याचा देखिल आता कंटाळा येतो" आणि आजच हे पोस्ट वाचलं! सगळ्यात आधी तो मेसेज काढून टाकला, लाजेस्तव....!!!!!!

छोटा डॉन said...

नेहमीप्रमाणे अ-फ़ा-ट आहे !!!
एकंदरीत मानवी वर्तणुकीचा व त्या अनुषंगाने मानवी संस्कॄतीचा जो धावता आढावा घेतला आहे त्याला तोड नाही ;)

बाकी ह्या गहन प्रकरणात आमच्या आवडत्या "हम्म" ला विसरलात त्याबद्दल निषेध !!!

बाकी लेख क-ड-क आहे हे वरती लिहले आहेच

- छोटा डॊन

हेरंब said...

"हो मी वारा, मी पाऊस - अगं तारा, मीच तुझा मिकीमाउस" हा हा हा !!!!!!!!

पोस्ट नेहमीप्रमाणेच जबरेश, बेफाट !!!!!!!!!!!

अरेच्या, पूर्णविराम द्यायचे राहूनच गेले की म्हणून शेवटी हे ..........

Samved said...

OMG!!!!!!!!!
Hmmmmmmm

ic u +ing the id :)

Nile said...

>> हो मी वारा, मी पाऊस - अगं तारा, मीच तुझा मिकीमाउस

हा हा हा! मस्त!

Dhananjay said...

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

Dhananjay said...

sorry forgot fullstop.................................

Shardul said...

डीप ईफेक्ट...!

मजा आली :)

रोहन... said...

कसं रे सुचते तूला !!! मस्त आहे एकदम... काम संपले आणि ऑनलाइन आलो तर हसून हसून पुरे वाट!!! ........... (इतके ... आणि !!!! पुरे ना???)

Maithili said...

Bharrriii.......
Kansacha dialaug tar best ch aahe...
aani HE asle prakar muli jast kartat... Nirikshan ekdam barobare!!!!! :)

Kaustubh said...

भारी लिहितोस रे. कडक! :)

ओहित म्हणे said...

जबऱ्या!!

वेगवेगळ्या भागांमधे, लोक आपला आनंद वेगवेगळ्या पद्धतीने दाखवतात. किंवा असं म्हणू की वेगळ्या पद्धतीने बोलून दाखवतात. जसं पुण्यात "महान" म्हणतात, तर कोल्हापुरात "नादखुळा" म्हणतात! यावरपण काही लिही ना! सही मजा येईल तुझ्याकडून यावर वाचायला!

बाकी हा पोस्ट छान झालाच आहे, हे वेगळं सांगायला नकोच.

Jaswandi said...

Sahi re. hehe. bhannatch. :)

Saee said...

:)
You are good!

Anonymous said...

avadale.khoop divasanni.
Great comeback. Tried to avoid any excess usage of signs.

Hope this comment is okay. With all statements with periods.

Anonymous said...

Lets agree to disagree on this that '!' when used multiple times does not make any sense. [रोजच्या हायबायला होलसेलमधे पन्नासदा !!!!! लिहीण्यात काय पॉईंट आहे?
] No offence.
But I took a survey, and I found out that, every hi has its own meaning.

When someone(especially a girl) says[or types]
'HI' means I am shouting/ making it stylish like [yo! hi!]
'Hi' Well this means 'oh. its you.. umhan'[not a very happy one].
'Hi!' 'Normal hi'
'Hi!!!' 'Glad to see you again.'
'Hi!!!!!!!!!!!!' what a nice surprise/ I am just so happy.
'hi' 'eeeksss...its U....not again' and so on and so forth.

And again these symbols change their meaning for different people.

And abt Status messages :
Someone kept his status as 'हर्खुन ट्टुम!' for consecutive four days.

Unknown said...

solid ... khup diwasani...
maja aali wachun...

Unknown said...

hehe.. bharies tu!!

सर्किट said...

gurudevv.. _^_/\_
!!!!!
,,,,......'\;;;:::

सखी said...

तुलाच काय ती आपल्या व्याकरणाची खरी काळजी रे :D
ए खरंच खूप धमाल आली वाचताना. आवडलं आपल्याला, स्पेशली तो चॅट स्टेटस मेसेजेसचा सगळा (पे)रेग्राफ ;)आणि असे स्टेटस मेसेज मुलीच बहुधा ठेवतात या वाक्याशी अगदी सहमत!

prathamesh said...

नद्खुला भाव!
खूप जोरात हसायला आल्यावर ROFLMAO अस म्हणतात का लोक ?

Abhishek said...

.

आल्हाद said...

Ek Number!
Status messages cha observation too good.
"बरं" cha english spelling kaay hota ha hi sanshodhanacha bhaag aahe. It has been spelled as:
bara
burr
bar
barr
aani JAVA madhla joke jaroor saang, mi ABAP madhe hasun dakhven :)

Eshwar G Pawar said...

Lai bhari ki rao.
Mi pan kiti varshanpasun sarvana short writing madhil dosh dakhavanyacha prayatna karatoy. Its a creative and straight to the point.

Anonymous said...

हो मी वारा, मी पाऊस - अगं तारा, मीच तुझा मिकीमाउस solid aahe kaka ekdam...
aani Kans: "Dude, I am screwed!!!" suddha khaaas aahe.
getInstance()....shabdach nahit re majhyakade...kiti punches taaktos ekaweli. Panch aahes ka tu?

Yawning Dog said...

@राज - धन्यवाद :)

@अनु - थँक्स, ठेवाहो काहीही स्टेट्स मेसेज, पोस्टमधे लिहीलेले निम्मे प्रकार मीच करत असतो कायम.

@डॉन - थँक्स, हम्म राहीले बरोबर आहे. मीपण कायम हम्म ह्म्म करुन हंबरडे फोडत असतो चॅट्वर.

@हेरंब - थँक्स रे, चिक्कार पूर्णविराम देवून ठेवलेस :)

@संवेद - 10x किंवा thnx :)

@ना.का.आ. - थँक्स

@धनंजय, @कौस्तुभ, @शार्दूल, @रोहन
@मैथिली, @संग्राम - थँक्स :)

@जास्वंदी, @नचिकेत, @योग, @भाग्यश्री
@सर्किट, @सखी, @प्रथमेश - थँक्स :)

@सई - थँक्स.
(I'm silent reader and admirer of Unhalyachee Sutti - too selfish to appreciate publicly :))

@पिलू - हेहेहे, जवळजवळ सगळे पटले मला :)

@अभिषेक - ! (थँक्स)

@डुंप्या - lol, बरंचे जब्बर निरीक्षण आहे, काय स्पेलींग करायचे देव जाणे.

@ईश्वर, @सोनल - थँक्स :)

सर्वांचे आभार.

सागर said...

आवडला रे ब्लॉग तुझा...आपण फ्यान झालो तुझे....

सिद्धार्थ said...

कसलं सही. जाम हसत होतो वाचताना. बाजूचा मल्याळी म्हणतोय का हसतो आहेस वेड्या सारखा? आत्ता त्याला काय सांगू कप्पाळ? त्याला पूर्णविराम देऊन गप्प केला.

Unknown said...

ha ha ha... jamlay!

a Sane man said...

kaDDak... :-)

lay late vachla...paN agadi lol :P

Unknown said...

"हो मी वारा, मी पाऊस - अगं तारा, मीच तुझा मिकीमाउस"

ROFL =)) =)) =))


जबरा रे जृंभणश्वाणा ... =))
लेका पण एक णिरिक्षण मात्र पटले नाही ... "एका" विरामचिन्हाचा वापर बंद झालाय .. पण चॅटिंग , कमेंटिंग किंवा आणिक ठिकाणी मल्टिपल विरामचिन्हांचा वापर होतोच की .... (आता माझंच बघ ना ;) )

- जांभुळझाड

Snehal Nagori said...

khooop diwsanni blogayan kele...

sahi ahe he...

ani arre te parat june shodh lawawe lagtil he ekdam jagatala satya ahe...

pan te bara ahe ki shodhu de ki parat parat tech je shodhatat tyanna nawinch asta ki. shewti sagla gol ahe.

ऋयाम said...

फ़ारा दिवसांनी आलो रे याव्न्या..
लय भारी नेहेमीप्रमाणे.

कंस: dude, I am really screwed > LOL

मला वाटलं होतं, की show on an the board वगैरे इथं जपानातच का काय... :|

UML :)

एन्जॊय!!!

Dk said...

hahahaha !.!.!.!.!.!.!. ;)

Anup Barve said...

WTF...
absolute kalla !!

Anonymous said...

नवीन काहीतरी वाचायला मिळाले बारे वाटले.
आपल्या नावाचे पण असेच काहीतरी अ‍ॅ’स्ट्रॉफी घालून काही निघत असले तर सांगा.
ही पोस्ट वाचल्यापासून खुप गोष्टी वर हा प्रकार (funda) ट्राय करून पाहिला.
खुप मजा आली.
waiting for the java joke.!!!!!! Hope this much is fine.(पूर्णविराम टाकला आहे चाचपून बघावा)..
बाय द वे आपण कोल्हापुर कडचे आहात का?
आपल्या acc'nt (मंग लेका?) वरुन एक छोटासा संशय आला.

Unknown said...

Khup Bhari re...............