Monday, January 5, 2009

बोधकथा - २

क्रमांक एकची रटाळ आणि फालतू बोधकथा आहे ही - पण लिहिण्याशिवाय पर्याय नाही, जह्‌न में बात है तो हम बयॉं जरुर करेंगे. खरे तर माणूस असता तरी चालले असते या गोष्टीत पण मांजरे आहेत, मला मांजरे आवडत नाहीत तरीपण आहेत, माहित नाही का ते.



कथेचे नाव
विचारल्याने होत आहे रे

कथा

बन्या बोका नुकताच भारतात जुन्या ऑफिसमधे जावून परत अमेरीकेत आला आणि चम्या उत्सुकतेने त्याला हकिकती विचारत होता. फुटकळ घडामोडी सांगुन झाल्यावर बन्याने महत्त्वाच्या विषयाला हात घातला - तिथल्या प्रत्येक मांजरीची सविस्तर माहिती आणि सद्यपरिस्थिती सांगितली ( सद्यपरिस्थिती म्हणजे सध्या एकटी आहे, का बोक्याबरोबर चोरुन फिरते, का थेट लग्न करुन पूर्णपणे बोकील झाली आहे).
सगळ्या मांजऱ्या संपल्यावर बन्याने एक उसासा टाकला. बन्या आता कोणाची माहिती सांगणार हे चम्याला माहित होते आणि चम्या कुणाची माहिती ऐकायला एवढा आतुर आहे हे बन्याला माहित होते.
‘सुरु’
"सुरुचे अजुन लग्न झाले नाही आणि सध्या तिने कुठल्या बोक्याला वरलेले नाही, ही पक्की बातमी आहे", हे ऐकुन चम्याचा जीव २ लिटर दुध मावेल एवढ्या मोठ्या भांड्यात पडला. ज्याक्षणी तो पडला त्याचक्षणी चम्याचे मन भूतकाळात गेले - १ वर्ष मागे.
चम्या भारतात असतान तो आणि सुरु एकाच बसने ऑफिसला जायचे, सुरु त्याच्यानंतर ५-१० मिनीटांनी चढायची बसमधे. कधी ती एक बाक पुढे तर कधी एक बाक मागे, अगदी क्वचितच त्याच्याशेजारी - क्वचितच म्हणजे आख्ख्या वर्षात मोजुन दोनदा त्याच्याशेजारी बसली होती ती. चम्याला ती प्रचंड आवडायची - तिचे साधे दिसणे, कायम एखादे पुस्तक वाचणे, बसमधे असताना कायम फोनवर म्यांव म्यांव ‘न’ करणे, तिची प्रत्येक अन्‌ प्रत्येक गोष्ट चम्याला आवडायची. योगायोगाने ऑफिसच्या १० मजली इमारतीमधे सुरु नेमकी चम्याच्याच मजल्यावर बसायची - चम्या नेहमी वेळ साधुन ती असेल तेव्हाच दूध प्यायच्या खोलीत जायचा.
एकुण काय तर he adored her relentlessly and madly.
वर्ष सरले, फ्लॅशबॅकपण संपला. चम्याने हा भूतकाळ स्वतःच्या मनःपटलावर पाहिला असला तरी चम्याच्या हिरव्या डोळ्यांमधे बन्याने सिनेमास्कोप आवृत्ती पाहिली आणि संपल्यावर नेहमीचा प्रश्न विचारला - तु तिच्याशी साधी ओळख तरी का नाही करुन घेतलीस - संपूर्ण १ वर्ष होते तुझ्याकडे !

अजुनही बरेचदा चम्या तिचा विचार करायचा आणि जवळजवळ रोजच माउनेट वर तिचे प्रोफाइल बघायचा.
*
नाताळच्या सुट्टीमधे चम्या अमेरीकेतले प्रसिध्द असे एका भव्य नदीचे खोरे बघायला गेला - निसर्गाचे ते विराट आणि अद्‌भुत रुप पाहुन मार्जारकुळातल्या कोणाही सर्वसामान्य जीवाच्या मनात, निसर्गापुढे आपण किती छोटे आहोत वगैरे विचार आले असते. पण चम्याच्या मनात तसे काही आले नाही. त्याला वाटले, नुसते मनातल्या मनात लव-म्याव,लव-म्याव असे कुढत बसण्यात काय अर्थ आहे, घरी जावुन तडक सुरुला मैत्रीसाठी निरोप पाठवायचा आणि तिने स्वीकारल्यास थेट लग्नाचे विचारायचे.
घरी येउन त्याने माउनेट उघडले, तिला निरोप पाठवायला तिच्या प्रोफाइलवर गेला, पण...
प्रोफाइलवर तिचे स्टेटस ‘एकटी’ नव्हते. कोणीतरी बोक्याबरोबर तिचे लग्न ठरले होते.
चम्या म्हणाला "माउउची जय" आणि त्याने सुरुचा विषय कायमचा संपवला - फुल फ्लेड्ज्ड प्रेम नसल्याने त्याला फार त्रास नाही झाला पण खंत नक्कीच वाटली.

*
तात्पर्य
०. कल करे सो आज कर.
१. मुखदुर्बळपणा सोडावा.
२. पालकांनी आपापल्या मुलांना, फक्त मुलांच्या किंवा फक्त मुलींच्या शाळेत घालू नये. मुलामुलींच्या एकत्र शाळेत शिकल्यास एकमेकांशी बोलण्याचा आयुष्यभराचा संकोच कमी होतो.
३. वेळ असताना कामे करावीत उगाच पुढे ढकलू नयेत.
४. प्रेमाच्या बाबतीत जास्त दिवस लाजु नये, संधी कधी मिळेल याची वाट न पाहता संधी निर्माण करावी.
५. माणूसघाणे असु नये. चम्याची माई कायम सांगायची त्याला, वारंवार भेटणारी माणसे असल्यास ओळख असो वा नसो, स्मितहास्य द्यावे - सुरु कदाचित त्या स्मितहास्याचीच वाट पाहत पाहत वैतागली असेल.

***

5 comments:

Maithili said...

Dada tuzya babtit asale kahi ghadalay ka???

Yawning Dog said...

नाही हो नाही, काल्पनिक आहे.
बोधकथा -१ माझ्या बाबतीत घडली होती ३-४ वर्षांपूर्वी.
पण २ नाही - वय उलटून गेले असले काही होण्याचे आता :)

ऋयाम said...

कथा १ अजुन वाचा्याचि आहे..
हि तर लय बेश्ट्च आहे बघ..
पन ओफ़िस्मधे वाचताना पन्चा अनि इत होते ना भावा :)

कन्टाळा ब्लोग वाचुन मनात विचार आला हो्ता कि साहेब मग कन्टाळा घालवायला काहि ्लिहित नसतिल का?

हे वाचुन उत्तर मिळाले. लयच भारि...
कन्टाळ्पुर्ण जगात असले भारि ब्लोग्स आहेत, हे कस्ल भारि आहे..

लिहिते रहो. हम वाचते रहेन्गे...

Yawning Dog said...

Thanks re Thanks !

पन्चा अनि इत :D

कंटाळा ऍक्च्युली माझा जास्त आवडता ब्लॉग आहे- कंटाळाच आवडता आहे तर ब्लॉगची काय कथा :)

Dk said...

e chmya he style aavdli mala kutrya an manjaraanaa aaplya kathet ghaalaaychee mi pan aataaa ti dhaapnaar! :)