Tuesday, January 13, 2009

गवार

कविता अर्थातच रद्दड आहे, पण गवारीच्या प्रति व्यक्त केलेल्या भावना प्रामाणिक आहेत.
***

गवार

बारकुळी ती, हिरवी हिरवी,
छान कोवळी,
गवारशेंग मला हवी


कुटाबरोबर वाफवलेली,
छान रटरटीत शिजवलेली,
गवारशेंग मला हवी


भले कितीही गोड मटार,
फोलपटे बेचव त्याची,
पापुद्रयासहित दाण्यांची,
गवारशेंग मला हवी


आडदांड तो फ्लॉवर केवढा,
सात्विक तो श्रावण घेवडा,
दुध्याचा डौलदार आकडा
अहो घ्या ते शेकडा,
घ्या ते शेकडा,
पण गवारीचाच सडा
दारी माझ्या.
गवारीचाच सडा, दारी माझ्या


भरले वांगे
तुम्हीच चापा,
बटाट्याचे रस्से
अखंड ओरपा,
बेत असेल तुमचा तो खास,
मज नाही त्याची आंस


सडसडीत बांध्याची ती,
लवचिक साधीभोळी,
माझी गवार मला हवी


एक डाव खावूद्याना
एक डाव खावूद्याना
मला गवारीची भाजी

***

7 comments:

नंदकिशोर said...

vaa farach chhan ahe tumchi kavita...

Mukul Joshi said...

Bhale kiti hi goD maTar,
FolpaTe bechav tyaachi :-)

Aavadala..

Abhijit Bathe said...

मला ’माझी गवार मला हवी’ हे भयंकर म्हणजे भयंकरच आवडलं! :))))

Jaswandi said...

sahiche rao! :)

Dinesh Gharat said...

कौतुक करायला मी शब्द शोधतोय !



दिनेश.
http://www.sarvottam-marathi-vinod.blogspot.com

Yawning Dog said...

सर्वांना मनापासून धन्यवाद. देव तुमचे सगळ्यांचे भले करो, आणि तुम्हाला भरपूर गवार खायला मिळो :))

Saee said...

Very cute. =)