Monday, February 23, 2009

डिकॅफ आणि मी...स्कोप आहे का?

ह्याला बाणेदारपणा म्हणावा का फुकटचा शहाणापणा दाखवणे का आणि काय ते कळत नाही. मी जेव्हा जेव्हा म्हणून जरा बऱ्यापैकी ३/५ स्टार हॉटेलमधे उतरतो तेव्हा माझे हटकून तिथे भांडण होते [तु मध्यमवर्गीय असल्याने तुला श्रीमंत लोकांचा सुप्त तिरस्कार आहे असे माझा श्रीमंत मित्र म्हणतो - असू शकेल, काय सांगता येत नाही]
छपरी रेटमधे छपरी हॉटेल मिळाले असेल आणि तिथे गरम पाणी आले नाही तर मी चकार शब्दसुध्दा नाही काढणार. पण मॅरिऑटमधे नळ सुरु करुन ३० सेकंदाच्या आत गरम पाणी आले नाही तर मला जमदग्नीचा अवतार धारण करावासा वाटतो. असो. यावेळेला मात्र मी भांडणे गरजेचे होते असे अजूनही वाटते आहे मला. अजूनही तसे वाटणे महत्वाचे आहे कारण बरेचदा भांडण झाल्यावर अर्ध्याअधिक तासाने मला माझी चूक कळून येते आणि मंग लय वंगाळ वाटतुया.

झाले असे की, तिसरा/चौथा दिवस होता हॉटेलमधला आणि मी संध्याकाळी आलो तेव्हा हॉटेलवाले खोली मस्त स्वच्छ करुन गेले होते पण त्यांनी कॉफीमशिनजवळ फक्त डिकॅफचे पाकिट ठेवले होते - मला डिकॅफिनेटेड एकपण पेय आवडत नाही. काय अर्थ असतो का डिकॅफिनेटेड चहा/कॉफीमधे? शिवाय अमेरिकेत डिकॅफिनेटेड कॉफी पिणे म्हणजे ऍमस्टरडॅमला जावून पाईपमधून ‘तंबाखु’ ओढण्यासारखे आहे. [खरेतर हे असे एकेरी अवतरण चिन्हे टाकणाऱ्यांचा मला प्रचंड राग येतो, का आम्हा वाचणाऱ्यांना ह्या चिन्हांशिवाय कळत नाही का त्या शब्दावरचा स्ट्रेस आणि त्याचे महत्व, सगळे काय तुम्हालाच कळते का? पण लिहिण्याच्या ओघात माणूस टाकतो असली चिन्हे आणि मीपण असे एकदा केले होते याचा पुरावा म्हणून ठेवतो तसेच हे वाक्य]

मूळ राहिलेच बाजुला -
तर मी लॉबीमधे खाली गेलो तेव्हा कॉउंटरवरच्या मनुष्याला माझ्या खोलीमधे कॉफीचे पाकिट पाठवायला सांगितले. असे नाही की नवीन मागणी आहे, रोज कॅफिनेटेडे/डिकॅफिनेटेडे दोन्हीपण प्रकारची पाकिटे ठेवायचे ते. शांतपणे हो म्हणेल आणि पाठवेल की नाही तर पठ्ठ्या म्हणाला, "आज एक दिवस डिकॅफिनेटेडे प्या !" मला एकदम सुपरफाश्ट राग आला आणि येतानाच प्रचंड प्रमाणात आला, एवढा की माझ्या कपाळावर उठून दिसणारी शीर असती तर ती टण्‌टण्‌ उडाली असती त्या वेळेला. त्याला म्हणालो की, पाठवणार का नाही ते सांगा फक्त, मी काय प्यावे, काय नाही हे सांगु नका. त्यावर तो मनुष्य म्हणाला, मी असेच म्हणालो एवढे चिडण्यासारखे काय आहे
...etc etc लांबड लागली, शेवट त्या मनुष्याने आटपते घेतले नाहीतर मी आपला रामबाण उपाय काढणारच होतो, मॅनेजरला बोलवा, त्याच्याशीच बोलीन मी आता :)

ईंग्लिशमधे भांडणे खूप अवघड असते राव, थेट पिक्चरमधल्यासारखी वाक्ये येतात तोंडात, त्यात फक वगैरेचा जोरदार वापर असल्याने दैनंदिन भांडणात निरुपयोगी आहेत ती. आपल्याला ईंग्लिशमधे भांडण करणे खूप जड जाते हे माहित असूनही केवळ कॉफीच्या विशुध्द प्रेमाखातर निग्रहाने भांडलो मी. बाकी कुणाला नाही तरी at least कॉफीप्रेमी अमेरिकन पब्लिकला तरी माझा अभिमान वाटायला पाहिजे.

12 comments:

Bhagyashree said...

coffee premi american che mahit nahi, pan coffee premi indian la vatla ho abhiman! :D

decaf kasli pyaychi coffee.. mi nahi ajun vatyala gele..
neways mast post! english madhunch kay mala hinditunhi bhandta yet nahi! :(

Maithili said...

dhamaal aahe post. kharetar tuzya posts vachoon vaatat naahi ki tula chidata aani bhandata yet asel.

Yawning Dog said...

थँक्स भाग्यश्री, चुकुनपण पिउ नकोस डिकॅफ. बरोबर आहे तुझे - हिंदीत भांडणे पण अवघड आहे. मी एकच डायलॉग मारतो हिंदी भांडणात - ऐसा नही करनेका रे :)

@मैथिली, हा हा पोस्टवर जावू नकोस ग, पार शिव्या देवून भांडायचो पूर्वी, मस्त मारामारीपण - मोस्ट्ली मीच मार खायचो :)

Anonymous said...

वा! तुझी शैली एकदम झोकदार आहे! आणि कॉफी विषयीची आणि इतर टाईपची मतंही एकदम पटली!

Surendra said...

आज पहिल्यांदा हा blog वाचला. फ़ॅन झालो राव! आईशप्पथ.

ऋयाम said...

"Wat the XXXX!"

/O/!!

ekdam barobar!
english madhala kahi waparata yet nahi ho....

Unknown said...

yawning dog.. Aisa nahi karneka re, baburav apte style ka!?! :D

Yawning Dog said...

ha ha, ho mazya dolyasamor ale chitra ke baburav apate stylemadhe mhanato ahe ase :)

Unknown said...

mastay lihilayes.. :)

"शिवाय अमेरिकेत डिकॅफिनेटेड कॉफी पिणे म्हणजे ऍमस्टरडॅमला जावून पाईपमधून ‘तंबाखु’ ओढण्यासारखे आहे." agdi khara!!

Nile said...

Asalya madhya ratri tujhi afalatun बाष्कळ बडबड (stress dila nahi ha!) vachun dhaal aali, pan tujhya coffee premane maashi shinkali raav! Mala vatat hote tu hi Amrutatulya-walach asanar!

Yawning Dog said...

Navat kay aahe -
arre me tevdhacch chaha premee pan ahe, pan kali coffeesudhha mastach asatr :)

Dk said...

hahaha mala tuza abhimaan aahe kaarn tu kooofee saathee bhaandlaas ladh mitra ladh. (btw kaahee madat laagli tar saang mi maayboli marathit, raashtrbhaashaa hindit aani vyvhaarbhaashaa engrjeet kadheehee bhaadnu shkto! :D maazzee bhaandaaychee bhaashaa (streess olkh bar ka) atishy samrudh aahe!