Monday, May 11, 2009

अप्रतिम चित्र - चित्र ऑफ द मंथ

"मिशन कंटाळा ब्लॉग रीव्हँप" अंतर्गत, कंटाळलेल्या आणि सुस्त माणसाचे चित्र शोधत होतो. आणि हे चित्र मिळाले! मिळाले म्हणजे काय, बघताक्षणी मुलगी जशी क्लिक झाली म्हणतात ना तसे क्लिकच झाले.
मी भित्रट असल्याने व कोणी कॉपीराईट इश्यू काढायला नको म्हणून परंपरेप्रमाणे लगेच त्याची एक कॉपी केली(वाट लावली).

कंटाळ्याच्या हेडरवर ते ताणले गेल्याने पूर्ण दिसत नाहिये म्हणून इथे टाकून ठेवतो कारण चित्राचा कागद आठवड्याच्या आत हरवणार हे निश्चित. लॅपटॉपवरचा फोटो चुकुन डिलीट होणार किंवा महिनाभरात लॅपटॉपच गंडणार etc etc.


काय सुंदर चित्र आहे, म्हणजे मी काढलेले चित्र नव्हे. छान आहे ती चित्रातली कल्पना -
सेंट्रल थीम, मध्यवर्ती कल्पना, बुनियादी खयाल, κεντρικός θέμα !
बघुन डोळ्यात पाणी यायचे बाकी होते अक्षरश:

साधा वाटतो चित्रातला माणूस - पण मूर्तिमंत कंटाळा आणि आळस आहे हा मनुष्य.

निरखून बघितल्यास लक्षात येईल की तो काहीच करत नाहीये या क्षणी.
१. पुस्तक आहे: वाचत नाहिये.
२. सिगारेट आहे: ओढत नाहिये, बोटात अडकली आहे नुस्ती म्हणून आहे.
३. पाणी/ज्युस/दारु आहे: नुसता ग्लास आहे बाजुला, पीत नाहिये.
४. समोर टिव्ही नाहीये.
५. झोपला नाहीये, डोळे उघडे आहेत, शून्यात नजर आहे.
श्वासोच्छवास चालू आहे म्हणून जिवंत आहे म्हणायचे. [त्याचा काहीतरी विचारपण चालू असेल आणि तंद्री लागली असेल असे वाटल्यास ते साफ चूक आहे. तंद्री बिंद्री असले काय नसते, या चित्रात तरी नाही ऍट लीस्ट]

म्हणजे इन शॉर्ट, ‘नुसते बसलाय’ हा मनुष्य.
पी.ल. मधे, दुपारी आई जेव्हा हाक मारायची आणि विचारायची की, लोळतोयस का आणि काय करतोयस? तेव्हा "नाही गं लोळत नाहीये, बसलोय आपला" असे उत्तर द्यायचो मी.
हेच ते बसणे.
***

6 comments:

साळसूद पाचोळा said...

कंटाळा आणि आळस ..... interesting subject????

Bhagyashree said...

lol sahi ahe ha manus! mast jamlay chitra!

Anonymous said...

पुह (Pooh) पण मला याचमुळे आवडतो. झाडाला टांगलेल्या एखाद्या झोळीत मस्त अर्ध्या उघड्या टमाट्या पोटावर हाथ ठेवुन मस्त झोपलेला असतो. खाली मधाचे एक भांडे पडलेले दिसते ज्यावरुन कळते की स्वारीने पुर्ण भांडे संपवले आहे आणि आता जरा वामकुक्षी चालु आहे. त्याच्या चेहऱ्यावरचे समाधानाचे भाव बघतच बसावेसे वाटतात.

Anonymous said...

पुह (Pooh) पण मला याचमुळे आवडतो. झाडाला टांगलेल्या एखाद्या झोळीत मस्त अर्ध्या उघड्या टमाट्या पोटावर हाथ ठेवुन मस्त झोपलेला असतो. खाली मधाचे एक भांडे पडलेले दिसते ज्यावरुन कळते की स्वारीने पुर्ण भांडे संपवले आहे आणि आता जरा वामकुक्षी चालु आहे. त्याच्या चेहऱ्यावरचे समाधानाचे भाव बघतच बसावेसे वाटतात.

Unknown said...

तुम्ही खरंच थोर आहात! कंटाळा हा आणि असाच एक विषय घेऊन इतका विविधांगी विचार करताना तुम्हाला कंटाळा कसा येत नाही? (ह.घ्या.)

सर्किट said...

thorr..thorr.. :)