गृहशोभिकासारखे एखादे व्यवसायशोभक किंवा व्यवसायशोभेश असे मासिक असते तर मी त्यात खालील सदर चालवले असते.
भूभूचा सल्ला - आपले रेटींग हाय्येस्ट ठेवून काम मात्र कमी करण्यासाठी काही टिप्स. (बर्याच अनप्रोफेशनल आहेत)
१. ईमेल -
१.१ आपल्या साहेबांपासून वरच्या चेनमधील प्रत्येकाच्या अतिफालतू मेलला सुद्धा तात्काळ उत्तर द्यावे. लगेच उत्तर तयार नसले तरी, हं, बघतो मी काय करता येईल ते, मार्ग काढू आपण काहीतरी असे उत्तर द्यावे. पुढचं पुढं.
१.२ आपल्या पिअर लेव्हलच्या लोकांच्या मेलला एक रिमांयडर आल्याशिवाय उत्तर देवूच नये - अगदीच रिमांयडर आले तर उत्तर लिहिताना, शंभरदा सॉरी म्हणावे आणि मग उत्तर द्यावे, इतके आर्जव आणि करुण भाव पाहीजे की रिमांयडर पाठवणार्याला अपराधी वाटावे.
१.३ आपल्या खालच्या लोकांच्या मेलला आयुष्यात कधी उत्तर देवू नये. (अपवाद सुट्टी मंजूर करणे, आणि अगदीच ज्याच्याशिवाय एखाद्याचे पूर्ण काम अडेल असे मेल )
१.२ आणि १.३ चा फायदा असा की, त्यातल्या निम्म्या मेलचे रिमांयडर येत नाही. लगेच उत्तर आले नाही म्हणजे लोकांना वाटते याला माहित नसेल, हा बिझी असेल. कधीकधी लोक मेल पाठवयची घाई करतात, मेल पाठवल्यावर त्यांचे त्यांना उत्तर मिळाले असते. कधी त्यांनी पण आपलं एक चेकबॉक्स टीक केल्यासारखं आपल्याला मेल टाकला असतो. थोडक्यात अनोळखी नंबरवरून फोन आल्यावर पहिला फोन कधीच घ्यायचा नाही तसे. खरंच गरज असेल तर करती दुसरा फोन.
खूप काम कमी होते. आणि एक म्हणजे कोणी कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला कितीही उद्धट प्रश्न विचारले तरी ईमेलमधे अतिशांत रहावे. ही एक गोष्ट मला आयुष्यात जबरदस्त जमली आहे. उपहास वगैरे वापरू नये, खटासी महाखट तर सोडाच. समोरच्याने शिव्या घातल्यातर, मी समजू शकतो असे का म्हणतो आहेस तू, आमच्या परीने आम्ही प्रयत्न करतोय/केला, महाप्रचंड क्षमा करा. परत तेच - समोरचा शांत होतो आणि वरिष्ठ काय समजूतदारपणा दाखवला म्हणून कौतुक करतात.
२. चॅट/मॉक/आयएम/मेसेजिंग - तुम्ही काय म्हणता ते, मूळ चॅटींग
ईमेलसारखेच आहे याचे पण. साहेबलोकांच्या हायला लगेच हाय. बाकी लोकांच्या बाबतीत एक महत्त्वाचे म्हणजे, त्यांना चॅटवर उत्तर द्यायचे पण जमाना झाल्यावर, आणि जमले तर बरेचदा ते अवे झाल्यावर. पन्नास टक्के वेळेला त्यांचा काय रिस्पॉन्स येत नाही परत. शिवाय बरेचदा आता जरा मिटिंगला जायचे आहे, व्हाय डोन्ट यू सेंड मी अ मेल अबाउट धिस असे म्हणावे आणि मग ईमेलवाला पाथ घ्या.
३. मिटींग्ज
मगाससारखेच.
३.१ वरिष्ठांची प्रत्येक मिटींग ॲक्सेप्ट करा. रात्रीबेरात्रीपण करा गरज पडल्यास. दुसर्यादिवशी उशीरा जावा वाटल्यास.
३.२ आपल्या पिअरच्या आणि खालच्यांची प्रत्येक मिटींग एकतर डिक्लाईन किंवा टेन्टेटीव स्वीकारा. ॲक्सेप्ट नाहीच, काहीही होवो. जायचे तर जावा, पण एन्व्हाईट टेन्टेटीवच स्वीकारा.
हे थोडेसे जॉर्ज कॅस्टॅन्झाटाईप आहे, पण भारी ईफेक्ट येतो याने. एकतर पिअर आणि खालील जनतेकडून अगदी गरज असेल तरच मिटींग इन्व्हाईट येते, आणि वरिष्ठ प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टीसाठी बोलवायला लागतात. याला कोणी हांजी हांजी करणे असेही म्हणू शकते पण असे केल्याने ॲक्च्युअलमधे फिजीकली हांजी हांजी न करता हांजी हांजी ईफेक्टचा लाभ मिळतो.
४. नेहमीचे काम, कोड डिलीव्हरी, टेस्टींग, एस्टीमेटस वगैरे
कोडींग, एस्टीमेट्स यात काहीही तडजोड करू नका. एस्टीमेट् कमी करायचे नाही म्हणजे नाहीच, काय वाट्टेल ते होवो. १ व २ मुळे आपली इमेज खूपच रिजनेबल माणूस आहे अशी झाली असते त्यामुळे शक्यतो काही अडचण येत नाही. पण एखादा अगदीच अडला व म्हणला हे एस्टीमेट्स खूप जास्त आहेत तर हात वर करावेत, माझ्याकडून पाहिजे तर हे असे, रिस्क घेणारी लोकं तशीही नोकरीत कमी असतात उगाच एखाद्याच्या एस्टीमेस्ट्सच्यापेक्षा कमीत काम पूर्ण करायचे आव्हान शक्यतो कोणी स्वीकारायचे नाही. अगदीच कोणी माईकालाल निघाला असा तर त्याला बिन्धास्त करू द्यावे, पूर्ण सहकार्यही करावे. वेळेच्या आधी गोष्टी होतच नसतात, अधेमधे काहीतरी शंभर नवीन सिनारिओ लफडी येतात, तेपण नीट करावे. सर्वच्य सर्व कोपर्याकोपर्यातले सिनारिओ रोज या माईकालालला सांगावे, हेपण हॅंडल कर, तेपण कर, मग मधेच परफॉर्मन्स रन्स कर वगैरे सगळे मेलवर नम्रपणे सुचवावे. व सगळे सुचवताता, अपटू यु हां, मी आपलं सांगितलं असं ॲटीट्यूड असावं. शेवट एकतर आपण दिलेल्या एस्टीमेट्च्या आसपासच होतं ते काम, माईकालालपण नरमतो तोवर.
५. लष्कराच्या भाकर्या
५अ. हे महामहत्वाचे. बर्याचदा अशी संधी चालून येते की, तुम्हाला एखाद्या कामाची पूर्ण जबाबदारी नसते पण केवळ सल्ला मागितला जातो. अश्या सुसंधी सोडू नका. शंभर उपाय सुचवा. एखादातरी चालतोच. फुकटचं कौतुक, शिवाय तुम्ही काही कोणांच क्रेडिट घेत नाही आहात, त्यांनीच तुम्हाला सल्ला मागितला होता.
५ब. (श्रीयुत सर्किट यांच्या सौजन्याने)
आपल्या मालकाला कुणी काय ॲक्शन आयटम देतयं का यांवर चौफेर डोळा ठेवावा. त्याने मदत न मागताही व्हाॅलंटीयर करावं. गडी उपकार विसरणार नाही. त्यातून जर त्या कामाची डेडलाईन ऊद्यावर असेल तर डबल ईफेक्ट येतो. हे करताना आपली स्वत:ची कामं बोंबलली किंवा हाताखालचे करवदले तरी बिंदास चालू रहावं.
असलं सगळं दहा-पंधरा वर्ष नोकरी झाल्यावर अंगवळणी पडतं. मनातल्या मनात असे अल्गोरिदम बनतात, बारक्या मुलांची मनं अशी नसतात.
3 comments:
भाऊ, खत्रा जालीम !!
अजून एक : आपल्या मालकाला कुणी काय ॲक्शन आयटम देतयं का यांवर चौफेर डोळा ठेवावा. त्याने मदत न मागताही व्हाॅलंटीयर करावं. गडी उपकार विसरणार नाही. त्यातून जर त्या कामाची डेडलाईन ऊद्यावर असेल तर डबल ईफेक्ट येतो. हे करताना आपली स्वत:ची कामं बोंबलली किंवा हाताखालचे करवदले तरी बिंदास चालू रहावं.
(४ब नंबरने टाक)
Jabardast !!!
Seriously, very important point, I've done this so many times !
Updated the original post.
(It's only few of us like you and me, who really care about average middle class white collar workers, so we must keep on sharing the such gems)
Thanks !
;-)
त्याला स्लाईडस् बनवून देताना पहिल्या स्लाईडवर मुद्दाम आपलं नाव टाकू नये. आपलं नाव खोडून त्याचं टाकायच्या गिल्टी फीलिंग पासून त्याला वाचवावं. आपला निरपेक्षपणा खरा किती सापेक्ष आहे हे फक्त आपल्यालाच माहीत ;-)
Post a Comment